Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेतन्याहू प्रथमच भ्रष्टाचाराच्या आरोपांवर साक्ष देणार; ‘या’ तीन वेगवेगळ्या प्रकरणी पंतप्रधानांवर खटला सुरू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भ्रष्टाचाराच्या आरोपांवर पहिल्यांदाच मंगळवारी न्यायालयात साक्ष देणार आहेत. नेतन्याहू यांच्यावर फसवणूक, विश्वासघात आणि लाचखोरी अशा तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोप आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 10, 2024 | 07:20 PM
नेतन्याहू प्रथमच भ्रष्टाचाराच्या आरोपांवर साक्ष देणार; 'या' तीन वेगवेगळ्या प्रकरणी पंतप्रधानांवर खटला सुरू

नेतन्याहू प्रथमच भ्रष्टाचाराच्या आरोपांवर साक्ष देणार; 'या' तीन वेगवेगळ्या प्रकरणी पंतप्रधानांवर खटला सुरू

Follow Us
Close
Follow Us:

जेरुसेलम: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भ्रष्टाचाराच्या आरोपांवर पहिल्यांदाच मंगळवारी न्यायालयात साक्ष देणार आहेत. नेतन्याहू यांच्यावर फसवणूक, विश्वासघात आणि लाचखोरी अशा तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोप लावण्यात आले आहेत. मात्र, नेतन्याहूंनी कोणतेही चुकीचे कृत्य नाकारले आहे. नेतन्याहू यांनी गाझा युद्ध आणि सुरक्षा चिंता यांचा हवाला देत अनेक वेळा खटल्याच्या सुनावणीत विलंब करण्याची मागणी केली होती.

140 लोकांना साक्षीदार म्हणून न्यालयात बोलवले आहे

मात्र, न्यायालयाने सुनावणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव, ही सुनावणी तेल अवीवमधील भूमिगत चेंबरमध्ये होणार आहे. या खटल्यात तीन वेगवेगळ्या प्रकरणांचा समावेश असून, 2020 पासून ही प्रकरणे सुरू आहेत. या खटल्यातील आरोपांनुसार, नेतन्याहू यांनी त्यांच्या बाजूने चुकीच्या माहिती प्रकाशित केल्याच्या बदल्यात काही प्रसारमाध्यमांना राजकीय फायदा करून दिला असल्याचे म्हटले आहे. तसेच महागड्या भेटवस्तू स्वीकारून एका अब्जाधीश हॉलिवूड निर्मात्यास लाभ मिळवून दिला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘भारताविरुद्ध बांगलादेश युनूस सरकार षड्यंत्र रचत असल्याचा पाकिस्तान तज्ञांचा दावा म्हणाले…

या प्रकरणात तब्बल 140 लोकांना साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले आहे. या साक्षीदारांमध्ये नेतन्याहू यांचे माजी विश्वासू सहकारी, विरोधी पक्षनेते यायर लापिड आणि काही प्रमुख मीडिया व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. साक्षीदारांनी रेकॉर्डिंग, पोलिस दस्तऐवज आणि टेक्स्ट संदेश यांसह विविध पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. या प्रकरणाचा अंतिम निकाल 2026 पर्यंत अपेक्षित आहे. निकाल विरोधात नेतन्याहू सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय गुन्हागारी न्यालयाने देखील अटक वॉरंट जारी केले 

याशिवाय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) गाझा युद्धाच्या संदर्भात नेतन्याहू यांच्यावर युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या अपराधाचे आरोप ठेवले आहेत. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने नेतन्याहू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. गाझातील हल्ल्यांमध्ये 44,000 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये माजी संरक्षण मंत्री योव गॅलंट आणि हमासचे माजी कमांडर मोहम्मद दाइफ यांच्याविरोधातही वॉरंट जारी करण्यात आले आहे.

इस्रायलने मात्र आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या आरोपांना फेटाळून लावले आहे. इस्रायलने असे म्हटले आहे की, हे प्रकरण आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. विरोधी पक्षनेते लापिड यांनीही या आदेशाचा निषेध केला आणि हा आदेश दहशतवादाला बळ देणारा असल्याचे म्हटले. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या अटक वॉरंटवर नेतन्याहू आणि गॅलंट यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

2002 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना 

मिळालेल्या माहितीनुसार, 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. हे न्यायालय जगभरातील युद्धगुन्हे, नसंहार आणि मानवतेविरुद्धच्या गुन्हांवर कारवाई करते. 1998 च्या रोम करारावर तयार केलेल्या नियमांच्या आधारे न्यायालयात कारवाई केली जाते. तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायलयाचे मुख्यालय हेग येथे आहे.  ब्रिटन, कॅनडा, जपानसह 123 देश रोम करारानुसार या न्यायालयाचे सदस्य आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – फिलिपाइन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक; 87 हजार लोकांचे स्थलांतर, अनेक उड्डाणे रद्द

Web Title: Israel pm benjamin netnyahu corruption case testify first time nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO
1

जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
2

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
3

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही
4

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.