फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: सध्या हिंदूंवरील हल्ल्यांमुळे भारत आणि बांगलादेशातील तणाव वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेश आणि पाकिस्तानमधील जवळीक वाढत चालली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच बांगलादेशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध केला जात आहे. तर एककीकडे बांगलादेश भारत सरकारबरोबर व्यापर सुरु ठेवण्याची चर्चा चालू आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानकडून आरडीएक्स आणि टँक शेल्सची खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
बांगलादेश भारताविरुद्ध षड्यंत्र रचत आहे- पाकिस्तानी तज्ञ
पाकिस्तानी तज्ज्ञ साजिद तरार यांनी दावा केला आहे की, बांगलादेश भारताविरुद्ध षड्यंत्र रचत आहे. त्यांनी भारताला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने यावेळी जास्त सतर्क राहण्याची गरज आहे कारण भारताच्या दोन्ही सिमेवर अल-जिहादच्या घोषणा दिल्या जात आहेत. तसेच मोहम्मद युनूस सरकारने पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची ऑर्डर दिलेली आहे. त्यांनी उघडपणे सांगितले आहे की ही शस्त्रे भारतासाठी असण्याची शक्यता आहे.
हजारो टनांची शस्त्रास्त्रांची पाकिस्तानला बांगलादेशाकडून ऑर्डर
40 टन आरडीएक्स, 28 हजार क्षेपणास्त्रे आणि 2 हजार रणगाड्यांचे कवच तसेच 40 हजार तोफखान्याची मागणी बांगलादेश सरकारने केली असल्याचे पाकिस्तान तज्ञ साजिद तरार यांनी म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तानींसाठी लागू असलेल्या व्हिसाच्या महत्त्वाच्या अटी देखील बांगलादेशाने काढून टाकल्या आहेत. साजिद तरार यांनी भूतकाळातील काही बाबींवर लक्ष केद्रींत केले.
त्यांनी मुंबईवर झालेल्या एका दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना म्हटले की, बीएनपी पार्टीच्या काळात लष्कर-ए-तैयबा, मसूद अझहर आणि सज्जाद अफगानी यांनी बांगलादेशाच्या सीमेवरुन हल्ले केले होते. तसेच त्यांनी मुंबई हल्ल्याचा तपास करणारे अधिकारी देखील बांगलादेशाच्या संपर्कात होते असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी काही भारतीय बांगलादेशाच्या बाजूने काश्मीरला पाठिंबा देतील असे म्हटले आहे. शिवाय त्यांनी ISI च्या देखील उल्लेख केला.
बांगलादेशातील हिंदूंवरील होणाऱ्या हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात
भारताने जो बांगलादेश पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त केला, आज त्याच बांगलादेशावर ताबा मिळवलेल्या जमातच्या जिहादींना पाकिस्तान, तिची गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटनांचा पूर्ण पाठिंबा आहे. पाकिस्तान जिहादींना पैसे पाठवतो, आयएसआय भारतविरोधी स्क्रिप्ट लिहिते आणि या जिहादींना पाकिस्तानच्या दहशतवादी तळांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
पाकिस्तानच्या इशाऱ्यावरच बांगलादेशातील जमातचे कट्टरपंथी हिंदुंविरोधी आणि भारतविरोधी वातावरण निर्माण करतात आणि हे सर्व करण्यासाठी मौलानांचं सैन्य उतरवण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावर जमात कट्टरपंथी संपूर्ण नियोजन करून हिंदूंवर हल्ले करत आहेत.






