Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…

श्रीलंकेच्या नौदल आणि संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या इराणी जहाजावर एकूण १८० लोक स्वार होते. पाणबुडीतून डागलेल्या टॉर्पेडोने जहाजाला लक्ष्य केले, ज्यामुळे जहाजाचा मोठा भाग समुद्रात बुडाला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 04, 2026 | 08:43 PM
श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! (Photo Credit- X)

श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ!
  • रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त
  • ८० जणांचा मृत्यू तर…
Iranian Ship Submarine Attack: श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर एका इराणी जहाजावर पाणबुडीद्वारे भीषण हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जहाजावरील सुमारे ८० जणांचा मृत्यू झाला असून, १०० हून अधिक लोक समुद्रात बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे हिंद महासागरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून श्रीलंकेच्या लष्कराने मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

पाणबुडीचा हल्ला आणि जीवितहानी

श्रीलंकेच्या नौदल आणि संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या इराणी जहाजावर एकूण १८० लोक स्वार होते. पाणबुडीतून डागलेल्या टॉर्पेडोने जहाजाला लक्ष्य केले, ज्यामुळे जहाजाचा मोठा भाग समुद्रात बुडाला. आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, ३२ जणांना सुखरूप वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. उर्वरित ६८ जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाची जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली आहेत.

https://t.co/PiqQpVIrMu pic.twitter.com/Wc1e0B0um7 — Department of War 🇺🇸 (@DeptofWar) March 4, 2026

बचाव मोहिमेसाठी श्रीलंकेचे नौदल सज्ज

जहाजावरून संकटकालीन संकेत मिळताच श्रीलंकेच्या नौदलाने तात्काळ बचाव पथक रवाना केले. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “इराणी जहाजाकडून तातडीचा मदतीचा संदेश प्राप्त झाला होता. त्यानंतर विनाविलंब बचाव मिशन सुरू करण्यात आले. आमचे पहिले प्राधान्य समुद्रात अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवणे हे आहे.” वाचवण्यात आलेल्या ३२ जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Israel Iran War: “नाव किंवा ठिकाण काहीही असो, खात्मा निश्चितच…”, इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला इस्रायलची धमकी

श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकेचा दावा

श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांनी या घटनेवर अधिकृत भाष्य करताना सांगितले की, “बुडणाऱ्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारांसाठी किनाऱ्यावर आणले गेले आहे.” या हल्ल्याचे स्वरूप पाहता श्रीलंकेने या घटनेला चोख प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्याची जबाबदारी अमेरिकेने घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. तथापि, हे व्यापारी जहाज होते की लष्करी रसद पुरवणारे जहाज, याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता श्रीलंका आणि भारतीय उपखंडाच्या समुद्रात उमटू लागल्याने संरक्षण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

पुढील तपास आणि प्रादेशिक सुरक्षा

श्रीलंकेच्या सागरी हद्दीत झालेला हा हल्ला आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे उल्लंघन असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यानंतर हिंद महासागरातील इतर व्यापारी जहाजांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही तासांत श्रीलंका सरकार यावर अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

US Iran War : इराणशी युद्धात अमेरिका संपणार? अवघ्या १० दिवसांचाच शस्त्रसाठा शिल्लक; होणार महाभयंकर विनाश

Web Title: Iranian ship spotted on radar off sri lankan coast destroyed in submarine attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.