Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इस्त्रालयने हल्ल्यांना कारण देणे थांबवावे…’; सीरियन बंडखोर अल-जुलानी यांचा नेतन्याहूंना इशारा

सीरियातील इस्लामिक बंडखोर गट हयात तहरीर अल-शाम (HTS) चे प्रमुख आणि बशर अल-असद सरकारला सत्तेतून हटवण्यात प्रमुख भूमिका बजावणारे अल-जुलानी यांनी इस्रायलविषयी मोठे वक्तव्य केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 15, 2024 | 01:03 PM
'इस्त्रालयने हल्ल्यांना कारण देणे थांबवावे...'; सीरियन बंडखोर अल-जुलानी यांचा नेतन्याहूंना इशारा

'इस्त्रालयने हल्ल्यांना कारण देणे थांबवावे...'; सीरियन बंडखोर अल-जुलानी यांचा नेतन्याहूंना इशारा

Follow Us
Close
Follow Us:

दमास्कस: सीरियातील असदच्या सत्तापालटानंतर इस्त्रायल सतत हल्ले करत आहे. इस्त्रालयने सीरियातील रासायनिक शस्त्रे बंडकोर गाटांच्या ताब्यात लागून नये म्हणून हल्ले केले होते. त्यानंतर देखील हे हल्ले सुरच राहिले. तसेच इस्त्रायलने सीरियाच्या नवीन सरकारला इशारा देखील दिला होता की, त्यांनी इराणला किंवा हिजहुल्लाहला कोणताही पाठिंबा दर्शवला तर याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.

आता कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही- अल-जुलानी

सीरियातील इस्लामिक बंडखोर गट हयात तहरीर अल-शाम (HTS) चे प्रमुख आणि बशर अल-असद सरकारला सत्तेतून हटवण्यात प्रमुख भूमिका बजावणारे अहमद अल-शारा उर्फ अबू मोहम्मद अल-जुलानी यांनी इस्रायलविषयी मोठे वक्तव्य केले आहे. अल-जुलानी यांनी एका मुलाखतीत इस्रायलच्या हवाई हल्ल्यांवर कठोर टीका केली.

त्यांनी म्हटले की, “इस्रायलकडे आता हल्ल्यांचे कोणतेही समर्थन करण्यासारखे कारण राहिले नाही.” त्यांनी इस्रायलच्या नुकत्याच झालेल्या हवाई हल्ल्यांना “सीमारेषा ओलांडणारे” आणि “अन्यायकारक तणावाला चालना देणारे” म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- India-Bangladesh Relations: विक्रम मिसरींचा तिखट वार; अन् बांगलादेशची तलवार म्यान

इस्त्रायलचे हल्ले 

इस्त्रायल गेल्या काही दिवसांपासून सीरियान लष्कराच्या प्रमुख लष्करी क्षमतांवर, रासायनिक शस्त्रसाठे, क्षेपणास्त्रे, हवाई संरक्षण यंत्रणा, तसेच हवाई आणि नौदल तळांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. या हल्ल्यांचा उद्देश हे शस्त्रसाठे शत्रूच्या हाती पडण्यापासून रोखणे होता.

याशिवाय, इस्रायलने गोलन उंचवट्यावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियंत्रणाखालील बफर झोनमध्ये प्रवेश केला. HTS च्या नेतृत्वाखालील बंडखोरांनी दमास्कस घेतल्यानंतर काही तासांतच इस्रायलने हा निर्णय घेतला. इस्रायलने हा भाग तात्पुरता घेतल्याचे सांगितले असून, हा निर्णय सीमावर्ती सुरक्षेसाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले अल-जुलानी? 

अल-जुलानी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे तणाव टाळता येईल आणि सिरियाच्या सार्वभौमत्वाचा आदर राखता येईल असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी इस्रायलचा थेट उल्लेख न करता “कूटनीतिक उपाययोजना” हा सुरक्षेसाठी सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगितले आहे.

तसेच, त्यांनी “अविचाराने घेतलेल्या लष्करी कारवायां”ला टाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, वर्षांभराचे युद्ध आणि संघर्षानंतर सीरियातील सामान्य थकवा आम्हाला नवीन संघर्षांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देत ​​नाही.

2011 पासून युद्ध सुरु 

गेल्या 13 वर्षापासून सीरिया युद्धात होरपळत आहे. 2011 मध्ये असद विरोधात निदर्शने काढण्यात आली. त्यानंतर या निदर्शनांचे गृहयुद्धात परिवर्तन झाले. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी असद सरकाच्या पळून जाण्यानंतर 13 वर्षांच्या संघर्षानंतर देश आता हयात तहरी अल-शाम नावाच्या बंडखोर संघटनेच्या ताब्यात आहे. सिरियाच्या संघर्षानंतर या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इराणमध्ये कठोर हिजाब कायदा; महिलांनी ड्रेस कोडचे उल्लंघन केल्यास मृत्यूदडांची शिक्षा

Web Title: Israel should stop justifying attacks syrian rebel al julani warns netanyahu nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 01:03 PM

Topics:  

  • Israel
  • Syria
  • World news

संबंधित बातम्या

रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा
1

रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
2

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
3

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
4

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.