Israel Syria war israel and Syria agrees to Ceasefire says American ambassador
जेरुसेलम : इस्रायल आणि सीरियामध्ये पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी उडाली आहे. बुधवारी १६ जुलै रोजी इस्रायलने केलेल्या दमास्कवरील हल्ल्यानंतर परिस्थिती अधिक बिघडली आहे. इस्रायलने सीरियाच्या दमास्कसमध्ये हल्ला करुन संरक्षण मंत्रालय आणि लष्कर मुख्यालय उद्धवस्त केले होते. सीरियातील ड्रुझ या अल्पसंख्यांक समुदायाचे संरक्षण करणे हा या हल्लाचा उद्देश होता.
याच दरम्यान तुर्कीतील अमेरिकेचे राजदूत टॉम बॅरेक यांनी इस्रायल आणि सीरियामध्ये युद्धबंदी झाली असल्याचे म्हटले. बॅरेक यांनी सांगितले की, तुर्की, जॉर्डन आणि शेजारी देशांच्या पाठींब्याने दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली. दरम्यान टॉम बॅरेक यांनी सांगितले की, “आम्ही ड्रुझ, बेदुइन आणि सुन्नींना शस्त्रे टाकून इतर अल्पसंख्यांकांमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. त्यांनी या समुदायांना शांतता आणि समृद्धीपणे एकटूजट होऊन नवीन सीरियन ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान बुधावरी सीरियाची राजधानी दमास्कमध्ये हल्ला केला होता. ड्रुझ समुदायाचे संरक्षण करण्याचा या हल्ल्याचा उद्देश होता. तसेच इस्रायलने सीरियाच्या दक्षिणेकजील सैन्याला माघार घेण्याचा इशाराही दिली. परंतु यांनंतर मोठा संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर अमेरिकेने यामध्ये हस्तक्षेप करत हिंसाचाराचे गैरसमज म्हणून वर्णन केले. तर सर्वांनी युद्धबंदीस सहमती असल्याचे जाहीर केले.
BREAKTHROUGH —— Israeli Prime Minister @Netanyahu and Syrian President Ahmed al-Sharaa @SyPresidency supported by the U.S.A. @SecRubio have agreed to a ceasefire embraced by Türkiye, Jordan and its neighbors. We call upon Druze, Bedouins, and Sunnis to put down their weapons and…
— Ambassador Tom Barrack (@USAMBTurkiye) July 18, 2025
यापूर्वी सीरियन अधिकारी आणि ड्रूझ समुदायाने युद्धबंदीची घोषणा देखील केली होती. अनेक दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष थांबवण्यात आला होता. परंतु यानंतरही इस्रायलने सीरियावर हल्ला केला होता.
सीरियामध्ये १४ जुलै ड्रुझ आणि बेदुइन समुदायांमध्ये तीव्र संघर्ष झाला. यामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडोहून अधिक गंभीर जखमी झाले होते. या संघर्षासाठी सीरियाच्या नवीन अल-दुलानी सरकारला जबाबदार धरण्यात आले होते. दमास्कक ते स्वेडा माहामार्गावर ड्रुझ समुदायाच्या व्यापाराचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संघर्ष उफाळला होता.