Israel takes revenge on Hamas for the killing of Jewish civilians, 45 Palestinians killed for one Israeli
जेरुसेलम: ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर मोठा हल्ला केला होता. यामध्ये १,२०० न्यू नागरिकांचा बळी गेला. तेव्हापासून हमास आणि इस्रायलच्या सैन्यात संघर्षाला सुरु झाली. गेल्या दीड वर्षापासून या युद्धात अनेकांचा बळी गेला. हे युद्ध आता दिवसेंदिवस आक्रमक आणि विध्वंसक होत चालले आहे. इस्रायलच्या हमासविरोधी कारावाया गाझात सुरुच आहेत. गाझातील इस्रायलच्या कारवाईला जागतिक स्तरवार विरोध केला जात आहे. परंतु इस्रायलने हमासचा नाश होत नाही तोपर्यंत कारवाई सुरुच राहिल असे म्हटले आहे.
सध्या हमासला आणखी एक धक्का बसला आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत ५५, हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच इस्रायलने हमासच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या प्रत्येक ज्यू मागे ४५ पॅलेस्टिनी नागरिकांची हत्या केली आहे. या धक्क्दायक खुलासाने खळबळ उडाली असून इस्रायलच्या लष्करी धोरणांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. परंतु इस्रायलने हे त्यांच्या स्वसंरक्षणासाठी केले असल्याचे म्हटले आहे.
आता ही लढाई अंतिम टप्प्यात पोहचली असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. नुकत्याच केलेल्या कारावईत हमासच्या अनेक ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तसेच हमासच्या अनेक वरिष्ठ कमांडरची देखील हत्या करण्यात आली आहे. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, हमासची ताकद आता कमकुवत होत चालली आहे. इस्रायलने हमासला पूर्णत: नष्ट करण्याचा निर्धार केला होता. हा निर्धार पूर्णत्वास आला असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
सध्याची परिस्थिती अमेरिका इस्रायलला गाझातील कारावाया करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच इराण आणि इस्रायलमधील चर्च्यांही माहिती समोर येत आहे. हा संघर्ष जास्त काळ चालू राहिल्यास पश्चिम आशियात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या गाझात, लेबनॉन, सीरिया आणि येमेनमधील कारवाया वाढत आहे. येथील इराण समर्थित गटांना संपवण्याचा इस्रायलचा प्रयत्न सुरु आहे. परंतु यामुळे प्रादेशिक युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हमासवर कायमस्वरुपी बंदीसाठी इस्रायलचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे लवकरच युद्धबंदी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु दुसरीकडे येमेनमधील हुथी बंडखोरांनी इस्रायलवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांसाठी इस्रायलवर हुथी बंडखोरांचे हल्ले सुरु आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान इराणच्या अणुकार्यक्रम देखील अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचे म्हटले जात आहे. आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थेने संबंधीत अहवाल जारी केला आहे. यामुळेही अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.