Israel tried to kill the Iran President Iranian news agency makes shocking claim
Iran Israel War News Marathi : तेहरान : गेल्या महिन्यात इस्रायल आणि इराणमध्ये तीव्र संघर्ष झाला. 13 जून रोजी सुरु झालेले हे युद्ध जवळपास 12 दिवस चालले. या युद्धादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे, बॉम्ब हल्ले केले. दोन्ही देश एकामागून एक हल्ले करत होते. दरम्यान या युद्धात इस्रायलने इराणच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार केले. याच संबंधी आणखी एका मोठ्या धक्कादायक माहितीचा खुलासा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 जून रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला होता, ज्यामध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान जखमी झाले होते. इराणी वृत्तसंस्था फार्सने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने तेहरानच्या पश्चिम भागा एक इरामरतीव हल्ला केला होता. इस्रायलने 6 क्षेपणास्त्रे डागली होती. यावेळी इमारतीमध्ये देशाच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा मंत्रिमंडळांची बैठक सुरु होती. या बैठकीत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान देखील सामील होते.तसेच अनेक विरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान या हल्ल्यात इराणचे अध्यक्ष थोडक्यात बचावले होते.
इराणी वृत्त संस्था फार्सने दावा केला आहे की, नसरल्लाह यांच्याप्रमाणे इस्रायल राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांना मारु इच्छित आहे. 1 ऑक्टोबर 2024 रोजी इस्रायलने बेरुमध्ये नसरल्लाहच्या गुप्त बंकरवर हल्ला केला होता. यावेळी हिजबुल्ल्हाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. यामध्ये धुरामुळे गुदमरून नसरल्लाह यांचा मृत्यू झाला.
यावेळी देखील इस्रायलने इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरु असलेल्या इमारतीला लक्ष्य केले. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. परंतु इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान थोडक्यात बचावले. मसूद पेझेश्कियान आपत्कालीन दरवाज्यातून पळून जाण्यात यशस्वी झाले. परंतु त्यांच्या पायाला दुखापत झाली होती.
तसेच राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी 7 जुलै रोजी एका मुलाखतीत, त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, इस्रायलने मलाही मारण्याचा प्रयत्न केले होता, परंतु त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यांनी सांगितले की, इस्रायली सैन्याने त्यांना शोधण्यासाठी गुप्तहेरांची मदत घेतली आणि बॉम्ब हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलकडे इराणी अधिकाऱ्यांच्या प्रत्येक गुप्त ठिकाणांची माहिती होती. यामुळे इराणी अधिकाऱ्यांना इस्रायलला सहज लक्ष्य करता आले. सध्या इस्रायलला ही माहिती कशी मिळाली याचा तपास सुरु आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अनेक लष्करी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा, तसेच अणु शास्त्रज्ञांचा खात्मा झाला आहे. इराणच्या अणु प्रकल्पाविरोधात हे युद्ध सुरु होते. दरम्यान हा संघर्ष निवळला आहे, परंतु यामध्ये अनिश्चितता कायम आहे.