Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Yemen War : ‘…याची मोठी किंमत मोजावी लागेल’; इस्रायलच्या हल्ल्यांना हुथींचे प्रत्युत्तर

Israel-Yemen War : इकडे इराणसोबतचा तणाव निवळत असताना इस्रायलने हुथींविरोधात मोठी कारवा सुरु केली आहे. परंतु इस्रायलला हुथींविरोधात कारवाई करणे महागात पडले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2025 | 07:50 PM
Israel Yemen War Houthis' Missile Attack On Israel

Israel Yemen War Houthis' Missile Attack On Israel

Follow Us
Close
Follow Us:

Yemen Houthi’s Attack On Israel : जेरुसेलम : इकडे इराणसोबतचा तणाव निवळत असताना इस्रायलने हुथींविरोधात मोठी कारवा सुरु केली आहे. परंतु इस्रायलला हुथींविरोधात कारवाई करणे महागात पडले आहे. इस्रायलने रविवारी (६ जुलै) केलेल्या हल्ल्यानंतर हुथींनी देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरु केली आहे. हुथींनी इस्रायलच्या शहरांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.

यामध्ये इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळाला पुन्हा लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे विमानव्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच इस्रायलच्या अश्कलॉनमधील वीज प्रकल्पांवर देखील हुथींनी हल्ले केले आहेत. यामुळे अमेरिकेला देखील मोठा धक्का बसला आहे. तसेच अमेरिकेने तातडीने इस्रायलला पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली आणि हवाई संरक्षण प्रणालींचा पुरवठा केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- 2030 पर्यंत पाण्याच्या एका थेंबासाठी पण होतील हाल, काय होणार 60 लाख नागरिकांचं? भविष्यातील भाकीत खरे ठरणार?

इस्रायलवर ११ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हुथींचा हल्ला

इस्रायलने येमेनच्या तीन बंदरावरील हुथींच्या ठिकाणांना लक्ष्य केले होते. यामध्ये हुदयदाह, रास इसा आणि सैफावर हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांना हुथींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. हुथींनी इस्रायलवर ११ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षावर केला आहे. यामध्ये इस्रायलच्या अनेक भागांना लक्ष्य करण्यात आले आहे.

हुथीं बंडखोरांचा इस्रायलला कडक इशारा

येमेनच्या हुथीं बंडखोरांचे प्रवक्ते याह्या सारी यांनी इस्रायलला कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना हाणून पाडण्यात आले आहे. तसेच याह्या यांनी दावा केला आहे की, येमेनमधील अनेक शहारांना इस्रायल लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आमच्या सैन्याने त्यांना माघार घेण्यास भाग पाडले आहे.

गाझातून माघार घेण्याचेही इस्रायलला ताकीद

हुथींनी इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळ, अश्दोदा बंद आणि अश्कलॉनमधील विद्युत केंद्रावर हल्ला केला आहे. यासाठी हापरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आहे. तसेच हुथींनी इस्रायलला गाझातून माघार घेण्यास सांगितले आहे. हुथींनी इस्रायलने हमासवर हल्ला केल्यास तसेच येमेनमधील त्यांच्या ठिकाणांना पुन्हा लक्ष्य केल्यास याची मोठी किंमत इस्रायलला मोजावी लागेल असे हुथींनी म्हटले आहे. तसेच त्यांनी केलेले हल्ले हे पॅलेस्टिनी लोकांचे रक्षण करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.

हुथी बंडखोरांची इस्रालविरोधी दहशतवादी योजना

याच वेळी इस्रायलने. हुथीं बंडखोर इस्रायलविरोधी दहशतवादी योजना आखत असल्याचे म्हटले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इस्राली सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. इस्रायलविरोधी कोणत्याही कारवाईला सहन केले जाणार नाही असे इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्रायलचे येमेनच्या बंदरांवर हल्ले; इराणनंतर आता हुथींविरोधात सुरु केले ‘ऑपरेशन ब्लॅक प्लॅग’

Web Title: Israel yemen war houthis missile attack on israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • Israel

संबंधित बातम्या

Israel attack on Gaza : गाझात मृत्यूचा तांडव सुरुच! इस्रायलने पुन्हा सुरु केली जमिनीमार्गे कारवाई, ४१ ठार
1

Israel attack on Gaza : गाझात मृत्यूचा तांडव सुरुच! इस्रायलने पुन्हा सुरु केली जमिनीमार्गे कारवाई, ४१ ठार

Islamic NATO : स्वतःचा ‘नाटो’ बनवणार ‘हे’ इस्लामिक देश; कतारवरील इस्रायली हल्ल्याविरुद्ध Gulf Nations एकत्र
2

Islamic NATO : स्वतःचा ‘नाटो’ बनवणार ‘हे’ इस्लामिक देश; कतारवरील इस्रायली हल्ल्याविरुद्ध Gulf Nations एकत्र

कतारच्या पंतप्रधानांनी घेतली डोनाल्ड ट्रम्पची भेट; इस्रायली हल्ल्याच्या ३ दिवसानंतर अमेरिकेचा केला दौरा
3

कतारच्या पंतप्रधानांनी घेतली डोनाल्ड ट्रम्पची भेट; इस्रायली हल्ल्याच्या ३ दिवसानंतर अमेरिकेचा केला दौरा

‘जसे ग्रेटर इस्रायल, तसेच अखंड भारत…’, India-Pakistan-China एकत्र येण्यावर काय म्हटली पाकिस्तानी जनता?
4

‘जसे ग्रेटर इस्रायल, तसेच अखंड भारत…’, India-Pakistan-China एकत्र येण्यावर काय म्हटली पाकिस्तानी जनता?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.