Israel’s 50-jet strike stuns Iran cyber attack confirmed
Israel Iran Conflict News Live : मध्यपूर्वेत आणखी एक धक्कादायक युद्धसत्र सुरू झाले असून इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाने टोक गाठले आहे. इस्रायलने इराणमध्ये थेट हवाई आणि सायबर हल्ला करून एकप्रकारे युद्धसदृश स्थिती निर्माण केली आहे. इस्रायली संरक्षण दल (IDF) ने दावा केला आहे की, इराणच्या राजधानी तेहरानजवळील एका सेंट्रिफ्यूज उत्पादन केंद्रावर मोठा हवाई हल्ला करण्यात आला, आणि यामध्ये ५० पेक्षा अधिक लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला.
या हल्ल्यांनंतर इराणमध्ये भयंकर घबराट निर्माण झाली आहे. राजधानी तेहरानमध्ये नागरिक शहर सोडून जाण्याचा प्रयत्न करत असून रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, लोकांनी मोठ्या प्रमाणावर आपत्कालीन सामान घेऊन शहराबाहेर काढता पाय घेतला आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गालंट आणि मंत्री इस्रायल काट्झ यांनी या हल्ल्याची पुष्टी करत इराणविरोधात तीव्र भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. काट्झ म्हणाले, “इराणी राजवटीचा अंत आता सुरू झाला आहे. तेहरानमध्ये वादळ उठले आहे आणि नागरिक मोठ्या संख्येने पळून जात आहेत. हुकूमशाहीची पडझड आता अटळ आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : हायपरसोनिक युद्धात नवा अध्याय; इराणने आपल्या शस्त्रागारातून बाहेर काढले ‘हे’ सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र
⭕️ The IDF struck a centrifuge production site and multiple weapon manufacturing facilities in the Tehran area, key elements of Iran’s nuclear weapons and missile programs.
Over 50 IAF fighter jets targeted:
– A facility for producing centrifuges used to enrich uranium beyond… pic.twitter.com/YXMiKAJWVz
— Israel Defense Forces (@IDF) June 18, 2025
credit : social media
हवाई हल्ल्याबरोबरच, इस्रायलने इराणमध्ये सायबर हल्लाही चढवला आहे. इस्रायल समर्थित हॅकिंग गटाने इराणमधील एका प्रमुख बँकेवर सायबर हल्ला केला असून, आर्थिक व्यवहारात गडबड निर्माण केली गेली आहे. तांत्रिक माहिती उघड करण्यात आली नसली, तरी या हल्ल्यामुळे इराणची डिजिटल प्रणाली कोलमडल्याचे संकेत मिळत आहेत.
IDF च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “तेहरान परिसरातील संवेदनशील सेंट्रिफ्यूज उत्पादन केंद्रावर अत्यंत अचूक हल्ला केला गेला असून, या मोहिमेत ५० हून अधिक लढाऊ विमानांनी विविध लक्ष्यांवर हल्ले चढवले.” हे उत्पादन केंद्र इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग मानले जात होते.
या हल्ल्यांनंतर इराणने इस्रायलच्या मोसाद गुप्तचर संस्थेच्या ५ एजंटना अटक केल्याची माहिती दिली आहे. स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या एजंटांवर इराणची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब करण्याचा आणि सायबर माध्यमांतून देशद्रोही माहिती प्रसारित करण्याचा आरोप आहे.
यासोबतच, इराणने इस्रायलला पुन्हा एकदा कठोर इशारा दिला आहे. तेहरान सरकारने अधिकृत निवेदनात सांगितले की, “इस्रायलने युद्धाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. या हल्ल्याची कठोर किंमत मोजावी लागेल. आमचे प्रत्युत्तर भीषण असेल.” तसेच इराणने तेल अवीवमधील नागरिकांना शहर सोडण्याचा सल्लाही दिला आहे, जो संभाव्य प्रतिहल्ल्याची शक्यता अधिक स्पष्ट करतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Israel War : इस्रायलसाठी अमेरिका घेणार युद्धात उडी; इराणचे अणुतळ उद्ध्वस्त करण्याची कुटील योजना
या घटनांनी मध्यपूर्वेतील तणावाला नवे टोक गाठवले आहे. एकीकडे इस्रायलच्या आक्रमक धोरणामुळे इराणमध्ये अस्थिरता वाढली असून, दुसरीकडे इराणचे पलटवाराचे संकेत चिंता निर्माण करत आहेत. सेंट्रिफ्यूज उत्पादन केंद्राचा नाश, सायबर हल्ला आणि पाच एजंटांची अटक या सर्व घटनांनी येत्या काळात दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगभरातील महासत्तांचे लक्ष आता या संघर्षाकडे वळले असून, याचे संभाव्य जागतिक परिणाम गहिरे असू शकतात.