Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mexico Violence: मेक्सिको पेटलं! ड्रग्ज माफिया ‘एल मेंचो’च्या मृत्यूनंतर हिंसाचाराचा भडका; भारत सरकारने जारी केली अ‍ॅडव्हायजरी

India Issues Advisory for Mexico: एल मेंचोच्या हत्येनंतर, मेक्सिकोमध्ये हिंसक निदर्शने सुरू झाली, भारतीय दूतावासाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचा आणि स्थानिक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 23, 2026 | 02:27 PM
india issues travel advisory for mexico violence el mencho dead helpline numbers

india issues travel advisory for mexico violence el mencho dead helpline numbers

Follow Us
Follow Us:
  • भारतीय दूतावासाचा इशारा
  • हेल्पलाइन नंबर जारी
  • जागतिक सतर्कता

India advisory for Mexico violence 2026 : मेक्सिकोचा (Mexico) कुख्यात ड्रग्ज सम्राट आणि जगातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार ‘एल मेंचो’ (नेमेसियो ओसेगुएरा सर्व्हेंटेस) मेक्सिकन सुरक्षा दलांच्या हातून मारला गेल्याने संपूर्ण मेक्सिकोमध्ये अराजकता माजली आहे. या कारवाईचा सूड घेण्यासाठी त्याच्या ‘जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल’ (CJNG) च्या सदस्यांनी अनेक राज्यांमध्ये धुमाकूळ घातला असून ठिकठिकाणी जाळपोळ आणि गोळीबार सुरू आहे. या भीषण परिस्थितीची गंभीर दखल घेत, भारत सरकारने मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या आणि तिथे पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सुरक्षा सूचना (Advisory) जारी केली आहे.

भारतीय दूतावासाचा ‘घरून न निघण्याचा’ सल्ला

मेक्सिकोमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर अधिकृत पोस्ट करत भारतीयांना सतर्क केले आहे. दूतावासाने म्हटले आहे की, “मेक्सिकोच्या विविध भागांत लष्करी आणि सुरक्षा कारवाया सुरू असल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत आपल्या घरात किंवा सुरक्षित ठिकाणीच राहावे.” विशेषतः जलिस्को, तामौलिपास, मिचोआकन, ग्वेरेरो आणि नुएवो लिओन या राज्यांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी अत्यंत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak-Afghan War : भारताने पाकिस्तानला सुनावलं अन् तालिबाननेही उपसली हत्यारं; ‘त्या’ एका व्हिडिओने सीमेवर रणकंदन

हेल्पलाइन आणि आपत्कालीन संपर्क

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीय दूतावासाने २४/७ हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. मेक्सिकोमधील कोणत्याही भारतीयाला संकटाच्या वेळी मदत हवी असल्यास त्यांनी +52 55 4847 7539 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच स्थानिक पातळीवर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘911’ वर कॉल करण्याचे सुचवण्यात आले आहे. दूतावासाने भारतीयांना विनंती केली आहे की त्यांनी आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना फोन किंवा सोशल मीडियाद्वारे आपल्या सुरक्षिततेची माहिती सतत देत राहावी.

🇮🇳 Embassy in Mexico Issues Advisory for Indians Indian nationals have been urged to “seek shelter” and minimise movement outdoors. They have also been asked to “avoid areas around law enforcement activity.” https://t.co/pQAntmZJ0F pic.twitter.com/EUznAob49l — RT_India (@RT_India_news) February 23, 2026

credit – social media and Twitter

प्रवास टाळा आणि सतर्क राहा!

दूतावासाने स्पष्टपणे बजावले आहे की, कायदा अंमलबजावणी संस्था कार्यरत असलेल्या भागात जाणे पूर्णपणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे किंवा अनावश्यक प्रवास करणे सध्या टाळणेच हिताचे आहे. स्थानिक मीडिया आणि अधिकृत सरकारी सूत्रांवर लक्ष ठेवून ताज्या घडामोडींची माहिती घेत राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. केवळ भारतच नाही, तर अमेरिकेनेही आपल्या नागरिकांसाठी ‘लेव्हल ४’ चा अलर्ट जारी केला असून आपल्या नागरिकांना मेक्सिको सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.

Dear all Indian nationals in Mexico: There are ongoing security operations and related road blockages and criminal activity, Indian nationals in Jalisco State (areas of Puerto Vallarta, Chapala, and Guadalajara), Tamaulipas State (areas of Reynosa and other municipalities),… — India in México (@IndEmbMexico) February 22, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Threat : जगातील सर्वात मोठी ‘रॉकेट तोफ’ सज्ज; किम जोंग-उनची ‘ती’ गर्जना ऐकून दक्षिण कोरियाची झोप उडाली

एल मेंचोचा खात्मा आणि आंतरराष्ट्रीय दबाव

अमेरिकेने मेक्सिकोवर ड्रग्ज कार्टेल्स संपवण्यासाठी अनेक वर्षांपासून दबाव आणला होता. एल मेंचो हा अमेरिकेसाठी सर्वात मोठी डोकेदुखी होता, कारण त्याच्या टोळीने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर ‘फेंटानिल’ या अमली पदार्थाची तस्करी केली होती. जरी मेक्सिकन सरकारने अमेरिकन लष्करी हस्तक्षेप नाकारला असला, तरी या ताज्या कारवाईत अमेरिकन गुप्तचर संस्थांनी मोलाची भूमिका बजावली असल्याचे बोलले जात आहे. सध्या मेक्सिकोच्या रस्त्यांवर लष्कर आणि गुन्हेगारांमध्ये युद्ध सुरू असून परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत सरकारने मेक्सिकोतील भारतीयांसाठी कोणता हेल्पलाइन नंबर जारी केला आहे?

    Ans: मेक्सिकोमधील भारतीय दूतावासाने आपत्कालीन मदतीसाठी +52 55 4847 7539 हा क्रमांक जारी केला आहे.

  • Que: मेक्सिकोमधील कोणती राज्ये सध्या सर्वात जास्त धोकादायक आहेत?

    Ans: जलिस्को (प्वेर्टो वल्लार्टा, ग्वाडालजारा), तामौलिपास, मिचोआकन, ग्वेरेरो आणि नुएवो लिओन या राज्यांमध्ये हिंसाचार सुरू आहे.

  • Que: भारतीयांना नेमका काय सल्ला देण्यात आला आहे?

    Ans: भारतीयांना घराबाहेर न पडण्याचा, अनावश्यक प्रवास टाळण्याचा, स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचना पाळण्याचा आणि सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: India issues travel advisory for mexico violence el mencho dead helpline numbers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Drug Mafia
  • Drugs Case
  • international news
  • New Mexico

संबंधित बातम्या

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
1

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?
2

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.