Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narendra Modi Israel Visit: इस्रायलच्या संसदेत मोदींचे भाषण धोक्यात? मुख्य न्यायाधीशांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

विरोधी पक्षांच्या धमक्यांना सभापती अमीर ओहाना यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेते उपस्थित राहिले नाहीत तर आम्ही नेसेटमधील रिक्त जागांवर माजी खासदारांना बसवू, असं म्हटलं आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 24, 2026 | 01:44 PM
PM Narendra Modi Israel Visit: Modi's speech in the Israeli parliament in danger? Opposition aggressive on the issue of the Chief Justice

PM Narendra Modi Israel Visit: Modi's speech in the Israeli parliament in danger? Opposition aggressive on the issue of the Chief Justice

Follow Us
Follow Us:
  • मुख्य न्यायाधीशांच्या आमंत्रणावरून वाद
  • अंतर्गत राजकारणात भारत केंद्रस्थानी
  • दौऱ्याच्या वेळेवरून प्रश्नचिन्ह
PM Narendra Modi Israel Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यापूर्वी सत्ताधारी पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष यांच्यात संघर्ष वाढला आहे. पंतप्रधान मोदी उद्या (२५ फेब्रुवारी) दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतील आणि अध्यक्ष इसाक हर्झोग यांच्याशी चर्चा करतील. पण नरेंद्र मोदी यांच्या इस्त्रायल दौऱ्यापूर्वी नव्या वादाची ठिणगी पडली आहे. इस्त्रायल संसदेतील विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी इस्रायली संसदेत भाषण करणार आहेत. पण इस्रायली संसदेत त्यांच्या भाषणासाठी इस्रायली सरन्यायाधीशांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. याच मुद्द्यावरून इस्रायली विरोधी पक्षनेते यायर लापिड यांनी सरन्यायाधीशांना आमंत्रित करण्याची परंपरा पाळली गेली नाही तर नरेंद्र मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

रॉब जेटन बनले नेदरलँड्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान; PM मोदींकडून अभिनंदन

नेतन्याहू सरकार कठीण परिस्थिती निर्माण करत आहे – विरोधी पक्ष

इस्रायली विरोधी पक्षनेते लापिड यांनी मोदी ज्या संसदीय अधिवेशनात भाषण देतील त्या अधिवेशनात सरन्यायाधीश यित्झाक अमित यांना आमंत्रित करावे, असा आग्रह धरला आहे. हा आग्रह संसदेतील कामकाजात कोणताही व्यत्यय आणण्यासाठी नाही तर, न्यायालयीन परंपरा आणि प्रोटोकॉलचा आदर करण्यातसाठी धरला जात आहे, असे विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे आहे. (International News)

इस्रायली संसद रिकामी राहू दिली जाणार नाही

विरोधी पक्षांच्या धमक्यांना सभापती अमीर ओहाना यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेते उपस्थित राहिले नाहीत तर आम्ही नेसेटमधील रिक्त जागांवर माजी खासदारांना बसवू, असं म्हटलं आहे. तसेच, विरोधी पक्षनेते लॅपिड यांच्या या वर्तनामुळे भारत-इस्रायल संबंधांना हानी पोहोचवत असल्याचा आरोपही अमीर ओहाना यांनी केला आहे. यासोबतच अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मेली आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या भाषणांच्य वेळी न्यायमुर्तींना आमंत्रित का केले गेले नाही, असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

कॅनडा सरकार ॲक्शन मोडमध्ये! PM कार्नी यांच्या भारत भेटीपूर्वी मोठी कारवाई; ‘या’ दहशतवाद्याचे नागरिकत्व रद्द

इस्रायलमधील न्यायिक सुधारणांबाबत सरकार आणि न्यायव्यवस्थेत खोल वाद आहे. जानेवारी २०२५ मध्ये यित्झाक अमित यांची मुख्य न्यायाधीश म्हणून निवड होऊनही, सरकार त्यांना ओळखत नाही. न्यायमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधणे थांबवले आहे आणि त्यांचे नाव अधिकृत राजपत्रातही प्रकाशित झालेले नाही.

 

 

Web Title: Modis speech in the israeli parliament in danger opposition aggressive on the issue of the chief justice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • international news
  • Israel
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल
1

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
2

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत
3

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत

Przewalski Horse : कझाकस्तानमध्ये 200 वर्षांनंतर गवताळ प्रदेशात जन्मला दुर्मिळ घोडा; जागतिक पर्यावरण जगतात आनंद
4

Przewalski Horse : कझाकस्तानमध्ये 200 वर्षांनंतर गवताळ प्रदेशात जन्मला दुर्मिळ घोडा; जागतिक पर्यावरण जगतात आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.