इस्त्रायलच्या 91 व्या तुकडीचा लेबनॉनमध्ये प्रवेश
बेरूत: एकीकडे हमासने इस्त्रायलवर काल पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. तर दुसरीकडे इस्त्रायल आता लेबनॉनमध्ये सीमा ओलांडून घुसलेल आहे. मिळालेल्या माहितीनुसार इस्त्रायलच्या 91 व्या तुकडीने लेबनॉनच्या सीमा ओलांडत भूमार्गी प्रवेश केला आहे. इस्त्रायलची ही तुकडीने विनाशकारी शस्त्रे घेऊन लेबनॉनमध्ये प्रवेश केला आहे. लेबनीज संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायल लष्कर लेबनॉनच्या सीमावर्ती गावांमध्ये अल-रसमध्ये घुसले असून एकूण 50 जणांची तुकडीने प्रवेश केला आहे.
लेबनीज संरक्षण दलाने म्हटले आहे की, इस्त्रायली सैन्य वेगाने लेबनॉनमध्ये प्रवेश करत असून जोरदार हवाई हल्ले आणि गोळीबार करत आहे. या काळात इस्त्रायल दक्षिण लेबनॉनमधील अनेक गावांवर लक्ष्य करत आहेत. लेबनॉन सीमेवर अनेक इस्त्रायली ड्रोन आणि लढाऊ विमाने, तसेच लढाऊ टॅंकर घेऊन घुसले असून हे भूमार्गी जाणाऱ्या सैनिकांना कव्हर करत आहे. लेबनॉनमध्ये इस्त्रायलची हिजबुल्लाविरोधात कारवाई सुरूच आहे.
हे देखील वाचा- इस्त्रायल-हमास युद्धाची वर्षपूर्ती; रॉकेटहल्ले, बॉम्बहल्ले, विध्वंस अन् आज नवा हल्ला…
हिजबुल्लाहनेही हल्ले करण्यास सुरूवात केली
मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायली सैन्य यारून, अल्मा अल-शाब, अल-वझानी आणि काफरचौबासह अनेक ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हिजबुल्लाहने प्रत्युत्तर देत इस्त्रायच्या सैन्यावर अनेक रॉकेट्स आणि बॉम्ब हल्ले केले आहेत. इस्त्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, 91 व्या तुकडीने हिजबुल्लाहला लक्ष्य करत, स्थानिक ऑपरेशनमध्ये गुंतण्यासाठी दक्षिण लेबनॉनमध्ये प्रवेश केला आहे. तसेच हिजबुल्लाह आणि लेबनॉनला संपुष्टात आणण्याच्या तयारीत आहे.
अमेरिकन कमांडर इस्त्रायलला पोहोचले
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात इस्रायलच्या पॅराट्रूपर डिव्हिजन 98 आणि आर्मर्ड डिव्हिजन 36 ने लेबनॉनमध्ये ग्राउंड ऑपरेशन सुरू केले होते. तसेच इस्त्रायल सरकारने सांगितले आहे की, प्रदेशात तणावादरम्यान अमेरिकन सेंट्रल कमांडचे कमांडर मायकल एरिक कुरिल्ला रविवारी इस्रायलला पोहोचले आहेत. एरिक कुरिल्ला आणि इस्त्रायली चीफ ऑफ जनरल स्टाफ हर्झेई हालेवी यांनी तेल अवीवमध्ये युद्धामुळे झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन केले. त्यांनी म्हटले आहे की, 23 सप्टेंबर रोजी इस्रायलने हिजबुल्लाविरुद्ध कारवाई सुरू केली. या संघर्षात आतापर्यंत किमान दोन हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे