हमासचे इस्त्रायलवर रॉकेट्स हल्ले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: आज 7 ऑक्टोबरच्या रात्री गेल्यावर्षी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ले केले होते. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेल तर 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतरच इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाले. गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाली. दरम्यान आज पुन्हा एकदा हमासने इस्त्रायलवर हल्ला केला आहे. हमासने इस्त्रायलच्या तेल अवीव आणि गाझासीमेजवळ रॉकेट्स डागले आहेत. इस्त्रायली लष्कराने या घटनेची माहिती दिली.
इस्त्रायल लष्करी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हमासने गाझामधील अनेक भागांवर हल्ले केले आहेत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जिवितहानी झाली असल्याची माहिती अद्याप इस्त्रायली लष्कराने दिलेली नाही. इस्रायलच्या इतिहासात आजचा दिवस सर्वात काळा दिवस होता असे मानले जात आहे. आज इस्त्रायलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशवासियांनी रॅली काढली आणि शोकसभा आयोजित केल्या होत्या. याच वेळी हमासने हे रॉकेट डागले. या हल्ल्याने गाझामध्ये पुन्हा एकदा युद्धाला सुरूवात झाली आहे.
कुटूंबीयांना श्रद्धांजली देण्यास लोक जमले होते
आज इस्रायलमध्ये नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांची कुटुंबे आणि मित्र हल्ल्याच्या ठिकाणी जमले होते. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यात येथे सुमारे 400 लोक मारले गेले होते. याच वेळी हल्ह्यात शहीद झालेल्या आपल्या परिवारातील कुटूंबीयांना श्रद्धांजली देण्यास लोक जमले होते. दरम्यान हमासने इस्त्रायलवर हल्ला केला. ज्यामुळे येथील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरलेले आहे. मात्र याबाबत इस्त्रायल सरकारचे पुढेच पाऊल काय असेल याबाबत अजून कोणतीही माहिती नाही.
अनेक ठिकाणी युद्धबंदीच्या मागणी साठी लोक रस्त्यावर
इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाल्या नंतर 40 हजार पॅलेस्टिनी समर्थकांनी देखील युद्धबंदीची मागणी केली आहे. पॅलेस्टिनी समर्थकांनी गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांवर होणारे हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पॅरिस, रोम, मनिला केपटाऊन आणि इतर अनेक शहरांमध्ये देखील मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. युद्धात पीडित झालेल्या लोकांमध्ये नेतान्याहू सरकारबद्दल नाराजी आहे. 7 ऑक्टोबर हा देशाच्या 76 वर्षांच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता असे मानले जात आहे. सध्या तिसरे महायुद्ध सुरू होण्याची धग वाढली आहे.