Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्त्रायलचा येमेनच्या विमानतळावर मोठा हल्ला; WHO प्रमुखांचे प्राण थोडक्यात बचावले, संयुक्त राष्ट्र संतप्त

इस्त्रायली सैन्याने येमेनच्या एका महत्त्वाच्या विमानतळावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO)प्रमुख टेड्रोस अधानोम आणि इतर अनेक अधिकारी थोडक्यात बचावले.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 28, 2024 | 01:14 PM
इस्त्रायलचा येमेनच्या विमानतळावर मोठा हल्ला; WHO प्रमुखांचे प्राण थोडक्यात बचावले, संयुक्त राष्ट्र संतप्त

इस्त्रायलचा येमेनच्या विमानतळावर मोठा हल्ला; WHO प्रमुखांचे प्राण थोडक्यात बचावले, संयुक्त राष्ट्र संतप्त

Follow Us
Close
Follow Us:

सना: इस्त्रायली सैन्याने येमेनच्या एका महत्त्वाच्या विमानतळावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO)प्रमुख टेड्रोस अधानोम आणि इतर अनेक अधिकारी थोडक्यात बचावले. या हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्रंमध्ये रोष निर्माण झाला आहे. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला , जेव्हा सुमारे 300 प्रवाशांना घेऊन असैन्य “एयरबस 320” विमान लँड होत होते. याचवेळी संयुक्त राष्ट्रांचे एक प्रतिनिधीमंडळ त्या विमानतळावर उपस्थित होते.

हल्ल्यांमुळे गंभीर नुकसान 

येमेनमधील मानवीय कामाचे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अधिकारी जूलियन हार्नेइस यांनी या हल्ल्याबद्दल माहिती दिली. हार्नेइस यांनी म्हटले की, या हल्ल्याचा सर्वात चिंताजनक भाग हा होता की हवाईतळावर नियंत्रण टॉवर नष्ट झाले, तेव्हा विमानतळावर ‘यमेनिया एयरवेज’ चे एक विमान उतरत होते. येमेनच्या राजधानी सना येथील अंतरराष्ट्रीय हवाईतळावर या हल्ल्यामुळे विशेषतः “VIP लाऊंज” आणि इतर काही भागांमध्ये गंभीर नुकसान झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- दक्षिण कोरियात राजकीय उलथापालथ; 13 दिवसांत 2 राष्ट्रपतींना महाभियोगातून हटवले, काय आहे संपूर्ण प्रकरण?

VIP लाऊंज च्या 600 मीटर पर्यंत नुकसान

या लाउंजमध्ये डब्ल्यूएचओ चे प्रमुख टेड्रोस अधानोम उपस्थित होते, तसेच अनेक संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी इथेच होते. सुदैवाने, या हल्ल्याच्या दरम्यान विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले गेले. हार्नेइस यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक हल्ला ‘वीआयपी लाउंज’च्या सुमारे 300 मीटर दक्षिणेस आणि दुसरा 300 मीटर उत्तरेस झाला. हल्ल्याच्या वेळेस संयुक्त राष्ट्रांचे पाच सदस्य इमारतीच्या बाहेर होते.

इस्त्रायलवर संयुक्त राष्ट्रांची गंभीर टिका

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यात तीन जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये संयुक्त राष्ट्र मानवीय हवाई सेवा विमानाच्या चालक दलाचा एक सदस्य देखील होता, जो सना येथून बाहेर जाणार्या प्रतिनिधीमंडळाचे सदस्य घेऊन जात होता. जेरुसलेममधील या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रंने इस्त्रायलवर गंभीर टीका केली आहे आणि हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा धोक्यात येण्याची चिंता व्यक्त केली आहे. हल्ल्याच्या संदर्भात इस्त्रायलने अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

इस्त्रायलचे अनेक आघाड्यांवर युद्ध सुरु

इस्त्रायल सेना सध्या विविध मोर्च्यांवर लढत आहे. इस्त्रायली सैन्याचे एकीकडे गाझा आणि लेबनॉनमध्ये हमास व हिजबुल्लाह या दहशतवादी गटांवविरोधात इस्त्रायलचे युद्ध सुरु आहे. तिसऱ्या बाजूल इस्त्रायल सीरियामध्ये बंडखोरांविरोधात मोठी भूमिका बजावत आहे. दरम्यान इस्त्रायलने येमेनमधील हुथी बंडखोरांवरही हल्ले केले आहेत. इस्त्रायल इराण समर्थित हूथी गटाला लक्ष्य करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून इस्रायल आणि हूथींमध्ये संघर्ष सुरू आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना वाहली श्रद्धांजली; म्हणाले, शांत, सौम्य आणि…

Web Title: Israels major attack on yemens airport who chiefs life narrowly escaped nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 01:14 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • world

संबंधित बातम्या

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
1

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
2

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.