Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या भूमिगत केंद्रांना केले लक्ष्य; लेबनॉनमध्ये जोरदार क्षेपणास्त्रांचे हल्ले अन् बॉम्बफेक..

Israel-Hezbollah War: हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्त्रायल सातत्याने लेबनॉनला प्रत्युत्तर देत आहे. 7 ऑक्टोबरच्या रात्री हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या तेल अवीव आणि उत्तरी समुदायांवर रॉकेट्स डागले होते. या हल्ल्यांचे प्रत्युत्तर आज इस्त्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या भूमिगत स्थानांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि बॉम्बफेक केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 09, 2024 | 11:51 AM
इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या भूमिगत केंद्रांना केले लक्ष्य

इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या भूमिगत केंद्रांना केले लक्ष्य

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्त्रायल सातत्याने लेबनॉनला प्रत्युत्तर देत आहे. 7 ऑक्टोबरच्या रात्री हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या तेल अवीव आणि उत्तरी समुदायांवर रॉकेट्स डागले होते. या हल्ल्यांचे प्रत्युत्तर आज इस्त्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या भूमिगत स्थानांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि बॉम्बफेक केले आहेत. आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, लेबनॉनमधील या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचे 50 दहशतवादी मारले गेले असल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हे हल्ले केले असून या भीषण हवाई हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचे सहा कमांडर ढेर केले असल्याचे इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे. हिजबुल्लाहचे प्रमुख कमांडर अहमद हसन नाझल, जो बिंट जबेल क्षेत्राचा प्रभारी होता आणि इस्रायलवर हल्ले करत होता, त्याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. याशिवाय गजर सेक्टर प्रमुख हसीन तलाल कमाल, मुसा दिव बरकत, महमूद मुसा कार्निव्ह आणि बिंट जबेल सेक्टर आर्टिलरी प्रमुख अहमद इस्माईल आणि अब्दुल्ला अली डिकीक हे देखील मारले गेले. एवढेच नाही तर इस्त्रायली हवाई दलाने हिजबुल्लाहच्या नासिर, बद्र आणि अझीझ युनिटवर भीषण हल्ले केले आहेत.

हिजबुल्लाहची अनेक ठिकाणे उद्धवस्त

IDF ने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहची अनेक ठिकाणे उद्धवस्त करण्यात आली आहे. हिजबुल्लाच्या अझीझ युनिटचे 50 तळ आणि नासेर युनिटचे 30 तळ इस्त्रायलने उद्ध्वस्त केले आहेत. इ्स्त्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्हटले आहे की, आमच्या हवाई दलाच्या विमानांनी दक्षिणेकडील हिजबुल्लाहच्या भूमिगत केंद्रांवर हल्ले केले आहेत. आता उत्तरेकडील भाग देखील नष्ट करण्याची योजना आखली आहेत.

हे देखील वाचा – हिजबुल्लाहचा इस्त्रायलच्या तेल अवीव आणि उत्तरी समुदायांवर हल्ला; मध्यरात्रीही हल्ले सुरूच

कारवाई सुरूच राहील

इस्त्रायलने दक्षिण लेबनॉनमध्येही जमिनीवर हल्ले सुरू केले आहेत.हगारी यांनी म्हटले आहे की, इस्रायली संरक्षण दल दक्षिण लेबनॉनमध्ये कारवाई सुरूच ठेवतील. हिजबुल्ला या दहशतवादी संघटना संपुष्टात आणली जाईल. उत्तरेकडील रहिवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी परत आणणे हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचे म्हटले आहे. इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, लवकरच लेबनॉनच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर कारवाई सुरू होईल. यामुळे लष्कराने भूमध्य समुद्राच्या 60 किलोमीटर परिसरातील रहिवासी आणि मच्छिमारांना किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

इस्रायलच्या पंतप्रधानांनी हिजबुल्लाचा वरिष्ठ प्रमुख मारला गेल्याची पुष्टी केली

याशिवाय इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहच्या प्रमुख नेता हसन नसराल्लाहचा उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीन गेल्या आठवड्यात इस्त्रायली हवाई हल्ल्यात मारला गेल्याची पुष्टी केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाहचा अफवा असलेला उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीन मारला गेला आहे.

हे देखील वाचा – इस्त्रायलच्या 91 व्या तुकडीचा लेबनॉनमध्ये प्रवेश, डझनभर गावांवर हल्ले; हिजबुल्लाहनेही डागले रॉकेट

Web Title: Isreal targets hezbollahs underground bases also israeli pm confirms senior hezbollah leader dead nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 11:51 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Hezbollah
  • Israel

संबंधित बातम्या

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
1

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
2

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Russia Ukraine war : गाझा संकट सोडवण्याची मोठी हालचाल; Putin-Netanyahu यांच्यात इराण संबंधित सिक्रेट फोन चर्चा
3

Russia Ukraine war : गाझा संकट सोडवण्याची मोठी हालचाल; Putin-Netanyahu यांच्यात इराण संबंधित सिक्रेट फोन चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.