फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: काल 7 ऑक्टोबरच्या रात्री गेल्यावर्षी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ले केले होते. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेल तर 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतरच इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाले. गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्याला काल एक वर्ष पूर्ण झाली. दरम्यान, लेबनॉनमधून काल रात्री इस्त्रायलवर रॉकेट हल्ले करण्यात आणि. यामुळे तेल अवीव आणि इस्त्रायलच्या उत्तरी समुदायंमधील शहरांमध्ये सायरने वाजत होते. इस्रायलमध्ये हमासने प्राणघातक हल्ला केल्याच्या एका वर्षानंतर हा हल्ला झाला.
हिजबुल्लाहच्या इराण समर्थित दहशतवादी गटाने हल्ला केला
इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, पाच रॉकेट्कस तेल अवीववर प्रक्षेपित करण्यात आले. तसेच काही क्षेपणास्त्राचा देखील हल्ला करण्यात आला. सध्या इस्त्रायल या हल्ल्याबाबत तपास करत असल्याचे लष्करी सैन्याने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहच्या इराण समर्थित दहशतवादी गटाने हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. इस्त्रायलने दावा केला आहे की, या दहशतवादी गटाने तेल अवीव आणि हर्झलिया दरम्यान असलेल्या ग्लिलोट सैन्य तुकडीवर हे हल्ले केले.
मध्यरात्री देखील हिजबुल्लाहचे हल्ले सुरूच राहिले
इस्त्रायल संरक्षण दलाने म्हटले आहे की, हिजबुल्लाहच्या रॉकेट हल्ल्यांमुळे या प्रदेशात प्रचंड नुकसान झाले असून हिजबुल्लाह एका मागून एक इस्रायली नागरिकांवर हल्ले करत आहेत. काल मध्यरात्री देखील हिजबुल्लाहचे हल्ले सुरूच होते. IDF ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या हल्ल्याच्या पहिल्या वर्धापन दिनादिवशीच रॉकेट प्रक्षेपण “ऑक्टोबर 8 च्या एक तासापूर्वी” हल्ला झाला. तसेच अनेक भागांमध्ये या हल्लांमुळे आग पसरलेली आहे. या हल्ल्यात कोणती जिवीतहानी झाल्याची पुष्टी अद्याप इस्त्रायलने केली नाही. IDF ने पुष्टी केली की लेबनॉनमधून उडवलेले अंदाजे पाच रॉकेट IAF द्वारे रोखले गेले आहेत. तसेच या हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून, इस्त्रायली सैन्याने बेरूतमधील हिजबुल्लाहच्या “गुप्तचर मुख्यालयावर” हल्ले केले. केले आहेत.
कुटूंबीयांना श्रद्धांजली देण्यास लोक जमले होते
इस्रायलमध्ये नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांची कुटुंबे आणि मित्र हल्ल्याच्या ठिकाणी जमले होते. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यात येथे सुमारे 400 लोक मारले गेले होते. याच वेळी हल्ह्यात शहीद झालेल्या आपल्या परिवारातील कुटूंबीयांना श्रद्धांजली देण्यास लोक जमले होते. दरम्यान हमासने आणि हिजबुल्लाहच्या इराण समर्थित दहशतवादी गटाने इस्त्रायलवर हल्ले केले. ज्यामुळे येथील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरलेले आहे.
इस्त्रायलच्या 91 व्या तुकडीचा लेबनॉनमध्ये प्रवेश
एकीकडे इस्त्रायलवर हमास आणि हिजबुल्लाहचे इस्त्रायवर हल्ले सुरू असताना दुसरीकडे इस्त्रायलच्या 91 व्या तुकडीने लेबनॉनच्या सीमा ओलांडत भूमार्गी प्रवेश केला आहे. इस्त्रायलची ही तुकडीने विनाशकारी शस्त्रे घेऊन लेबनॉनमध्ये प्रवेश केला आहे. लेबनीज संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायल लष्कर लेबनॉनच्या सीमावर्ती गावांमध्ये अल-रसमध्ये घुसले असून एकूण 50 जणांची तुकडीने प्रवेश केला आहे.