Italy on recognise Palestine only if Hamas excluded, all hostages freed says Giorgoia Meloni
Italy on Palestine : रोम : इस्रायल आणि हमास युद्धामुळे (Israel Hamas War) गाझामध्ये प्रचंड विनाश झाला आहे. अनेक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामुळे पॅलेस्टिनींच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली जात आहे. सध्या यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅलेस्टाइनला स्वंतत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि भारतासह १२ देशांनी मान्यता दिली आहे.
पण अमेरिका, इस्रायल आणि इटलीने याला नकार दिला आहे. यामुळे या अमेरिका आणि इटलीमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांकडून आंदोलने सुरु आहेत. २२ सप्टेंबर रोजी इटलीमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचर झाला होता. यामुळे देशात प्रचंड खळबळ उडाली होती. निदर्शने रोखण्यासाठी पोलिसांनी निदर्शकांवर पोण्याच्या तोफांचा, अश्रुधुराचा, लाठीमाराचा वापर केला. यामुळे इटलीची राजधानी रोम आणि मिलानमध्ये मोठे नुकसान झाले होते.
जॉर्जिया मेलोनींचेही सरकार कोसळणार? इटलीच्या रस्त्यांवर हिंसक निदर्शने सुरु, नेमकं कारण काय?
दरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी पॅलेस्टाईनला मान्यता न देण्याचे कारण स्पष्ट केले आहे. यासाठी त्यांनी दोन अटी ठेवल्या आहेत.
काय म्हणाल्या जॉर्जिया मेलोनी?
सध्या न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रंच्या महासभेचे ८०व्या अधिवेशन सुरु आहे. यामध्ये बोलताना मेलोनी यांनी पॅलेस्टाईनला मान्यता न देण्यामागचे कारण स्पष्ट केले. त्यांना सांगितले का हा निर्णय घेण्यापूर्वी हमासने दोन अटी मान्य कराव्यात यानंतर पॅलेस्टाईनला मान्यता देणार येईल. मेलोनी यांनी हमासला सर्व इस्रायली ओलिसांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे, तसेच पॅलेस्टाईनच्या सरकारी आणि राजकीय प्रक्रियेमध्ये हमासचा सहभागा नसावा अशा दोन अटी त्यांनी ठेवल्या आहेत.
या अटी मान्य झाल्या तरच पॅलेस्टाइनला मान्यता दिली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. याचा उद्देश पॅलेस्टिनींसाठी दिर्घकाळ सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि राजकीय स्थिरता आणणे आहे.मेलोनी यांनी पुढे म्हटले की, पॅलेस्टाइनाला मान्यता देऊन समस्या सुटणार नाही. यासाठी राजकीय अस्थिरता सुनिश्चित करणे आणि हमासला पूर्ण बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. तरच याचा फायदा होईल.
पाश्चात्य देशात निर्माण होत आहेत मतभेद?
भारत, चीन, रशिया, इंडोनेशिया आणि सौदी अरेबिया यांसारख्या आशियाई देशांनी फार पूर्वीपासूनच पॅलेस्टाईनच्या स्वतंत्र राष्ट्राला मान्यता दिली आहे. पंरुत अमेरिका आणि इस्रायलच्या मैत्रीमुळे पाश्चत्य देशांनी यासाठी नकार दिला होता. पण आता हे चित्र बदलताना दिसत आहे.
पाश्चत्य देश ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली आहे. पण अमेरिका, इटली आणि इस्रायलने याला स्पष्ट नकार दिला आहे. यावरुन पाश्चत्य देशांची धोरणे बदलत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक देश आपली स्वतंत्र भूमिका मांडताना दिसत आहे. शिवाय यामध्ये आता अमेरिकेच्या मताला कमी महत्त्व मिळू लागले आहे.
इटलीने का नाही पॅलेस्टाईना मान्यता?
इटलीच्या पंतप्रधा जॉर्जिया मेलोनी यांच्या मते, पॅलेस्टाईनला मान्यता देऊन प्रश्न सुटणार नाही. यासाठी पॅलेस्टाईनमध्ये राजकीय स्थिरता निर्माण करणे आणि हमासला यातून पूर्णपणे वगळणे गरजेचे आहे. यामुळे त्यांना याला नकार दिला आहे.
जॉर्जिया मेलोनी यांनी हमाससोमर कोणत्या अटी ठेवल्या?
मेलोनी यांनी हमासला सर्व इस्रायली ओलिसांची सुटका करण्यास सांगितले आहे. तसेच पॅलेस्टाईनच्या सरकारी आणि राजकीय प्रक्रियेतून हस्तक्षेप न करण्याची मागणी केली आहे.