Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इटलीचा मोठा निर्णय! महिलेवर अत्याचार किंवा तिची हत्या करणाऱ्यांना आता थेट ‘आजीवन कारावास’

Italy femicide Law : जॉर्जिया मेलोनींच्या देशात महिलांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी एका मोठा कायदा मंजूर करण्यात आला आहे. परंतु या कायद्यावर विरोधाकांनी टीका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 26, 2025 | 11:32 AM
Italy femicide law

Italy femicide law

Follow Us
Close
Follow Us:
  • इटलीचा मोठा निर्णय
  • महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी लाग केला नवा कायदा
  • दोषींना मिळणार कठोर शिक्षा
Italy News in Marathi : रोम : काही दिवसांपूर्वी इटलीच्या (Italy) पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्या देशात मोठा गोंधळ उडाला होता. इटतील महिलांवरील अत्याचाराबाबत मोठा धक्कादायक खुलासा करण्यात आला होता. या खुलास्यात सांगण्यात आले होते की, इटलीमध्ये दर सात दिवसाला एका महिलेची हत्या केली जात आहे. या अहवालाने जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान याच्याच पार्श्वभूमीवर इटलीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

जॉर्जिया मेलॉनीच्या राज्यात महिला असुरक्षित? अहवालातून स्री हत्येची धक्कादायक आकडेवारी समोर

इटलिच्या संसदेत महिलांवरील अत्याचाराल रोखण्यासाठी एक महत्वपूर्ण कायदा मंजूर करण्यात आला आहे. खासदारांनी स्री हत्या केवळ हत्या नसून गंभीर गुन्हा असल्याचे मान्य करत या प्रकरणातील दोषींना आता कठोर शिक्षा सुनावली जाणार असल्याचे म्हटले आहे. इटलीमध्ये गेल्या वर्षी २०२४ मध्ये १६६महिलांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये महिलेचा जोडीदार किंवा एक्स जोडीदार आरोपी असल्याचेही आढळून आले होते.

यामुळे इटलीमध्ये अनेक तासांच्या चर्चेनंतर महिलांवरील अत्याचारांविरोधात जन्मठेपेच्या शिक्षेचा कायदा मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान मेलोनी यांचे सरकार आणि विरोध पक्षांनी संयुक्तपणे हा कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार, लिंगावरुन कोणत्याही स्त्रीची हत्या करण्यास आली तर त्याला थेट जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे.

ज्युलियाच्या हत्येने हादरला होता इटली

याशिवाय ज्युलिया नावाच्या महिलेच्या हत्येमुळे संपूर्ण इटली हादरली होती. ज्युलियाला तिच्या एक्स पतीने चाकू भोकसून क्रूरपणे मारुन टाकले होते. नंतर तिचा मतदेह एका पिवशीत भरला आणि तलावाजवळ फेकून दिला होता. या घटनेने संपूर्ण इटलीमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

या प्रकरणानंतर इटलीतील महिलांमध्ये सरकारविरोधात तीव्र रोष वाढला होता. लोकांच्या म्हणण्यानुसार, महिला पंतप्रधान असणाऱ्या देशात अशा गोष्टी घडणे अविश्वसनीय आहे. तीन वर्षापूर्वी पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून जॉर्जिया मेलोनी यांची निवड करण्यात आली होती. यामुळे लोकांना आशा होती की त्यांच्या नेतृत्त्वात देशात महिलांच्या सुरक्षितता आणि समानतेला प्राधान्य दिले जाईल. परंतु मेलोनी सरकार हे आश्वान पूर्ण करण्यात अपयशी ठरले.

कायद्यावर विरोधकांची टीका

इटलीमध्ये आधीपासून महिलांवरील अत्याचार प्रकरणात   तुरुंगवासाची शिक्षा, तर काही प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा नमूद आहे. यामुळे सध्या मेलोनी सरकाच्या या कायद्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. विरोधकांच्या मते, हा कायदा व्यापक असून त्याला न्यायालयात सिद्ध करणे कठीण होईल.

तज्ज्ञांच्या मते इटलीत केवळ कायदा आणण्याचीच गरज नाही, लिंग समानता आणणे महत्त्वाचे आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता शिक्षा वाढवण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध लादणे महत्त्वाचे आहे. लहानपणापासून लैंगिक शिक्षण दिल्यास घरगुती हिंसाचार, लिंगभेद आणि नातेसंबंधातील असुरक्षितता कमी होऊ. पण आजही इटलीच्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षण सक्तीचे करण्यात आलेले नाही.

Italy Ban Burqa-Niqab: ‘आता इटलीत बुरखा चालणार नाही’; मेलोनी सरकारने इस्लामिक कट्टरतेवर आणला कठोर कायदा

💡

Frequently Asked Questions

  • Que: इटलीने महिलांवरील अत्याचाराविरोधात कोणता निर्णय घेतला आहे.

    Ans: इटलीने महिलांवरील अत्याचाराविरोधात एक नवा कायदा मंजूर केला आहे, ज्याअंतर्गत महिलांवर अत्याचार करणाऱ्या किंवा तिची हत्या करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात येईल.

  • Que: मेलोनी सरकारच्या महिलांवरील कायद्यावर काय टीका केली आहे?

    Ans: मेलोनी सरकाच्या या कायद्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. विरोधकांच्या मते, हा कायदा व्यापक असून त्याला न्यायालयात सिद्ध करणे कठीण होईल.

  • Que: तज्ज्ञांनी मेलोनी सरकारला कोणता सल्ला दिला आहे?

    Ans: तज्ज्ञांच्या मते इटलीत केवळ कायदा आणण्याचीच गरज नाही, लिंग समानता आणणे महत्त्वाचे आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता शिक्षा वाढवण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध लादणे महत्त्वाचे आहे. तसेच लैंगिक शिक्षणही अत्यंत महत्त्वाचे आहे.

Web Title: Italy parliment passes law of crime of femicide and punishes it with life in prison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • Italy
  • World news

संबंधित बातम्या

भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं
1

भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं

भारत-कॅनडा संबंधामध्ये नव्या पर्वाची सुरुवात? पंतप्रधान मार्क कार्नी लवकरच भारत दौऱ्यावर येणार
2

भारत-कॅनडा संबंधामध्ये नव्या पर्वाची सुरुवात? पंतप्रधान मार्क कार्नी लवकरच भारत दौऱ्यावर येणार

शत्रूच्या मनात घर करु पाहत आहेत डोनाल्ड ट्रम्प; AI चा शस्त्र म्हणून वापर करत लॉन्च केले ‘Genesis Mission’
3

शत्रूच्या मनात घर करु पाहत आहेत डोनाल्ड ट्रम्प; AI चा शस्त्र म्हणून वापर करत लॉन्च केले ‘Genesis Mission’

Russia Ukraine War : युद्ध थांबवण्याच्या चर्चा… पण रशियाचा युक्रेनवर प्रहार सुरुच; कीववर एका रात्रीत २४९ ड्रोन्सचा मारा
4

Russia Ukraine War : युद्ध थांबवण्याच्या चर्चा… पण रशियाचा युक्रेनवर प्रहार सुरुच; कीववर एका रात्रीत २४९ ड्रोन्सचा मारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.