Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्ध की घातपात? इराणमध्ये थेट भाजीमंडईत कोसळलं लष्करी हेलिकॉप्टर; ४ जण जागीच ठार, थरारक VIDEO 

US Iran Tenison : अमेरिकेशी तणावादरम्यान इराणमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. इराणच्या लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भयावह अपघात झाला आहे. थेट भाजीमंडईत हेलिकॉप्टर कोसळले असून यामध्ये ४ जण ठार झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 02:38 PM
Army helicopter crashes in central Iran 4 killed video

Army helicopter crashes in central Iran 4 killed video

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणमध्ये भीषण दुर्घटना
  • थेट बाजीमंडईत कोसळलं लष्करी हेलिकॉप्टर
  • 4 जण जागीच ठार
Iran Helicopter Crash : तेहरान : इराणमध्ये एक मोठी भीषण दुर्घटना घडली आहे. इराणच्या इस्फहान प्रांतात दोरचेह भागात मंगळवारी (24 फेब्रुवारी) एक लष्करी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात (Helicopter Crash) झाला आहे. या अपघातात पायलटसह चार जण जागीच ठार झाले असल्याचे वृत्त मिळाले आहे. या अपघाताने इराणमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या खामेनी शहरातील दोरचेह परिसरात एका भाजीमंडईत हे हेलिकॉप्टर कोसळले आहे.

US Iran Tension : युद्धाचा बिगुल वाजला! इराणी नागरिकांच्या फोनवर ‘Wait and See’ चा गूढ संदेश; विनाशाचा संकेत?

इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सध्या या अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली असल्याने भाजीमंडईने देखील पेट घेतला आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निमशन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यात आली आहे. या अपघातात पायलट, सह-पायलट आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आठवड्याभरातील हा दुसरा सर्वात मोठा अपघात आहे.

तज्ज्ञांच्या मते, इराणची हवाई सुरक्षा यंत्रणा खराब असल्याने हे अपघात होत आहे. 1979 च्या इस्रामिक क्रांतीपूर्वी खरेदी केलेली विमाने जुनी असल्याने त्यांचे भाग मिळणे कठीण झाले आहे. यामुळे त्यांची देखभाल कठीण असून अपघाताच्या घटना होत आङे. अमेरिकेच्या धमक्यांमुळे सध्या इराणी सैन्य हाय अलर्टवर असून प्रशिक्षण सुरु आहे.

अमेरिका इराण तणाव

हा अपघात अशा वेळी घडला आहे, जेव्हा इराण (Iran) अमेरिकेतील तणाव लक्षणीरित्या वाढला आहे. दोन्ही देशांत इराणच्या अणु कार्यक्रमांवरुन वाटाघाटी चर्चा सुरु आहे. परंतु अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना इराणचा अणु कार्यक्रम बंद करायचा आहे. परंतु इराणला हे मान्य नाही. यामुळे दोन्ही देशांत तणाव वाढत चालला आहे.

याच तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणच्या भोवती मोठी लष्करी तैनाती केली आहे. तर इराणने देखील अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हल्ल्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी इराणने लष्करी सराव सुरु केला आहे. याच सरावादरम्यान हेलिकॉप्टरचा अपघता घडला आहे. सध्या इराणवर दुहेरी संकट आले आहे. एकीकडे अमेरिकेच्या संभाव्य लष्करी कारवाई आणि दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या अभावामुळे कमकुवत लष्करी ताकद असल्याने इराण चिंतेत आहे.

An Iranian military helicopter crashed in a Dorcheh fruit and vegetable market during a training flight, killing the pilot, co-pilot, and two civilians, state TV reported. pic.twitter.com/jcqgbGjSTp — Open Source Intel (@Osint613) February 24, 2026

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमध्ये कुठे झाले हेलिकॉप्टर क्रॅश?

    Ans: इराणच्या इस्फहान प्रांतात दोरचेह भागात मंगळवारी (24 फेब्रुवारी) एक लष्करी हेलिकॉप्टर थेट भाजीमंडईत कोसळले आहे.

  • Que: इराणच्या हेलिकॉप्टर अपघातात किती जणांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: या अपघातात पायलट, सह-पायलट आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Army helicopter crashes in central iran 4 killed video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • helicopter crash
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

रॉब जेटन बनले नेदरलँड्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान; PM मोदींकडून अभिनंदन
1

रॉब जेटन बनले नेदरलँड्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान; PM मोदींकडून अभिनंदन

कॅनडा सरकार ॲक्शन मोडमध्ये! PM कार्नी यांच्या भारत भेटीपूर्वी मोठी कारवाई; ‘या’ दहशतवाद्याचे नागरिकत्व रद्द
2

कॅनडा सरकार ॲक्शन मोडमध्ये! PM कार्नी यांच्या भारत भेटीपूर्वी मोठी कारवाई; ‘या’ दहशतवाद्याचे नागरिकत्व रद्द

पाकिस्तानसह ‘या’ सहा देशांना मोठा झटका! ब्रिटनमध्ये व्हिसा बंदीची तयारी; लाखो लोकांना हद्दपारही करणार?
3

पाकिस्तानसह ‘या’ सहा देशांना मोठा झटका! ब्रिटनमध्ये व्हिसा बंदीची तयारी; लाखो लोकांना हद्दपारही करणार?

US Iran Tension : युद्धाचा बिगुल वाजला! इराणी नागरिकांच्या फोनवर ‘Wait and See’ चा गूढ संदेश; विनाशाचा संकेत?
4

US Iran Tension : युद्धाचा बिगुल वाजला! इराणी नागरिकांच्या फोनवर ‘Wait and See’ चा गूढ संदेश; विनाशाचा संकेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.