Italy Plane Crash Video: रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांवरच कोसळले विमान; क्षणार्धात आग अन्...; इटलीत घडला भीषण अपघात
Plane Crash: सध्या जगभरात विमान अपघातांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहेत. इटलीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. इटलीमध्ये देखील एक विमान क्रॅश झाले आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इटलीमधील एका रस्त्यावर वाहने धावत दिसत आहेत. त्याचवेळी एक विमान त्या ठिकाणी क्रॅश झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
इटलीमध्ये एक प्लेन क्रॅश झाले आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. एका रस्त्यावरून अनेक वाहने धावत आहेत. त्याचवेळी हे विमान तिथे क्रॅश झाले आहे. क्रॅश होताच हे विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. यामध्ये विमानातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान अचानक गाड्यांवर पडल्याने काही वाहने देखील या अपघातामध्ये सापडले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, या विमानातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अन्य दोन जाणे जखमी असल्याचे समजते आहे. जखमी लोकांना शेजारील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आला. दरम्यान विमानातून दोन की अधिक प्रवासी प्रवास करत होते का? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे हा अपघात नेमका कशामुळे घडला आहे हे तपास झाल्यावरच कळू शकेल.
🚨 BREAKING: Tragedy in Italy — A plane has crashed onto a highway near Brescia, colliding with several vehicles. At least 2 people confirmed dead. pic.twitter.com/iT3JRquCpX
— War Doctrine (@wardoctrine_) July 23, 2025
रशियामध्ये देखील विमानाला अपघात
आज रशियामध्ये देखील मोठा अपघात विमान घडला आहे. अंगारा एअरलाइन्सचे विमान चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते, परंतु त्यांचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. आता रशियन माध्यमांनी दावा केला आहे की विमानाचे अवशेष सापडले आहेत. यामध्ये ५० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.
सायबेरियातील अंगारा एअरलाइन्सचे हे विमान सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. त्याच्या शेपटीच्या क्रमांकावरून ते १९७६ मध्ये बांधले गेले असल्याचे दिसून येते. बचाव पथक हेलिकॉप्टरद्वारे विमानाचा शोध घेत होते, तेव्हा विमानाचा पुढचा भाग जमिनीवर जळताना दिसला. हे पाहून बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले, असून या घटनेचा देखील तपास सुरु करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी बांग्लादेशमध्ये देखील शाळेच्या परिसरात वायुसेनेच्या विमानाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान भारतात देखील एअर इंडियाच्या विमानाला काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये मोठा अपघात झाला होता. यामध्ये २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यामधून एक प्रवासी सुखरूप बचावला होता.