Japan Earthquake : होंशूच्या किनारपट्टीला ६.२ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का; संपूर्ण परिसरात घबराट पसरली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Japan Earthquake 6.3 Magnitude Honshu : आजचा दिवस जगासाठी भूगर्भीय हालचालींच्या (Earthquake) दृष्टीने अत्यंत भीतीदायक ठरला आहे. एकीकडे जपानच्या होंशू किनारपट्टीवर ६.३ तीव्रतेच्या शक्तीशाली भूकंपाने घबराट पसरवली, तर दुसरीकडे आज (२७ मार्च २०२६) सकाळी भारताचे टोक असलेल्या लडाख आणि शेजारील नेपाळमध्येही जमिनीला धक्के बसले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे आशियाई खंडात सध्या भीतीचे सावट पसरले असून, भूगर्भशास्त्रज्ञ या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या जपानला गुरुवारी आणि शुक्रवारी भूकंपाचे मोठे धक्के बसले. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळच्या सुमारास जपानच्या पूर्व किनाऱ्याजवळील होंशू प्रदेशात ६.३ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू टोकियोच्या ईशान्येस सुमारे ५१७ किलोमीटर अंतरावर उत्तर पॅसिफिक महासागरात ६० किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता इतकी होती की किनारपट्टीवरील रहिवाशांमध्ये पळापळ सुरू झाली. जपान भौगोलिकदृष्ट्या ‘रिंग ऑफ फायर’वर वसलेले असल्याने तिथे असे धक्के वारंवार जाणवतात, मात्र ६ पेक्षा जास्त रिश्टर स्केलची तीव्रता ही नेहमीच धोक्याची घंटा मानली जाते.
Major earthquakes hit the world today: (26.03.2026) ➡️ 6.5 magnitude earthquake hits E of Yamada, Japan 🇯🇵 ➡️ 5.5 magnitude Earthquake hits SW of Ciudad Sandino, Nicaragua 🇳🇮 ➡️ 5.1 magnitude Earthquake hits WSW of El Carmen, Mexico 🇲🇽 ➡️ 5.0 magnitude earthquake hits SE of… pic.twitter.com/QoAcBl5qQ2 — Disaster News (@Top_Disaster) March 26, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : युद्धविराम म्हणजे आत्महत्या! Saudi Arabia आणि UAE आता थेट मैदानात; अमेरिकेला दिलं विनाशाचं निमंत्रण
जपानमधील धक्क्यांची चर्चा सुरू असतानाच, आज शुक्रवारी सकाळी ८:३१ वाजता लडाखमधील लेह भागात ३.९ तीव्रतेचा भूकंप झाला. लडाखमधील भौगोलिक स्थिती पाहता हा भूकंप सौम्य असला तरी डोंगराळ भागात तो चिंतेचा विषय ठरतो. या धक्क्यानंतर अवघ्या एका मिनिटात, म्हणजेच ८:३२ वाजता नेपाळमधील दार्चुला जिल्ह्यात ४.० तीव्रतेचा भूकंप झाला. नेपाळमधील सुदूरपश्चिम प्रांतात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाची मालिकाच सुरू आहे. बैतडी आणि बाझंग जिल्ह्यांमध्येही याचे पडसाद उमटले असून लोक घाबरून घराबाहेर पडले आहेत.
EQ of M: 3.9, On: 27/03/2026 08:31:09 IST, Lat: 36.692 N, Long: 74.382 E, Depth: 10 Km, Location: Leh, Ladakh.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @GSuresh_NCS @ndmaindia pic.twitter.com/1DfQ8TbFjD — National Center for Seismology (@NCS_Earthquake) March 27, 2026
credit – social media and Twitter
केवळ हिमालयीन पट्टाच नाही, तर मंगळवारी संध्याकाळी गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातही ३.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता. जरी या सर्व भूकंपांमध्ये कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली, तरी एकामागून एक होणारे हे धक्के जमिनीखालील टेक्टोनिक प्लेट्सच्या मोठ्या हालचालींचे संकेत देत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Slavery Reparations : ‘आम्ही पैसे देणार नाही!’ ब्रिटनचा आरडाओरडा; पण भारताच्या एका मताने ‘असं’ बदललं जगाचं चित्र
जपान हे देश ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’वर असल्याने तिथे टेक्टोनिक प्लेट्सची सतत घर्षण प्रक्रिया सुरू असते. दुसरीकडे, भारत आणि नेपाळचा हिमालयीन पट्टा हा ‘सिस्मिक झोन ५’ मध्ये येतो, जिथे भारतीय प्लेट सातत्याने युरेशियन प्लेटला धक्का देत आहे. यामुळेच या पट्ट्यात ऊर्जेचे उत्सर्जन होऊन भूकंपाचे धक्के जाणवतात. शास्त्रज्ञांच्या मते, हे लहान धक्के मोठ्या भूकंपाची पूर्वसूचना असू शकतात, त्यामुळे सतर्क राहणे हाच एकमेव पर्याय आहे.
Ans: भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार (NCS) या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे.
Ans: लेहमध्ये सकाळी ८:३१ वाजता (३.९ तीव्रता) आणि नेपाळमध्ये सकाळी ८:३२ वाजता (४.० तीव्रता) भूकंपाचे धक्के जाणवले.
Ans: जपानमधील भूकंप समुद्रात झाला असला तरी, अद्याप कोणत्याही त्सुनामीचा इशारा अधिकृतपणे देण्यात आलेला नाही.






