Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दरवर्षी थोडं थोडं बुडतंय ‘हे’ विमानतळ, पण जगातलं सर्वोत्तम! जपानचं कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ धोक्यात

Kansai International Airport : १९९४ मध्ये जेव्हा हे उघडण्यात आलं, तेव्हा जगातल्या काही अत्याधुनिक विमानतळांपैकी याची गणना झाली. पण गेल्या काही वर्षांत त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 12, 2025 | 04:29 PM
Japan's Kansai Airport is sinking yearly yet it's ranked among the world's best

Japan's Kansai Airport is sinking yearly yet it's ranked among the world's best

Follow Us
Close
Follow Us:

Kansai International Airport : जगात एक असं विमानतळ आहे जे दरवर्षी थोडं थोडं समुद्रात बुडतंय, पण तरीही ते ९१ शहरांशी सतत विमानसेवा देतं. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही खरी गोष्ट आहे जपानच्या कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळाची! ओसाका खाडीच्या मध्यभागी दोन कृत्रिम बेटांवर बांधलेलं हे भव्य विमानतळ जपानच्या अभियांत्रिकी चातुर्याचं एक उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं. १९९४ मध्ये जेव्हा हे उघडण्यात आलं, तेव्हा जगातल्या काही अत्याधुनिक विमानतळांपैकी याची गणना झाली. पण गेल्या काही वर्षांत त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण, हे विमानतळ दरवर्षी जमिनीत खोल खोल जात आहे – म्हणजे समुद्रात बुडत आहे!

१२ मीटरपेक्षा जास्त बुडालं आहे विमानतळ!

‘द स्ट्रेट्स टाईम्स’च्या अहवालानुसार, या कृत्रिम बेटाचा पृष्ठभाग आतापर्यंत ३.८४ मीटरने खाली गेला आहे आणि एकूण विमानतळ १३.६ मीटर बुडालं आहे. ८ वर्षांतच तब्बल १२ मीटर जमिनीत खोल गेलं आहे. हे ऐकून अभियांत्रिकीतील तज्ञही चिंतेत आहेत. हे विमानतळ ज्या मऊ समुद्रकाठच्या जमिनीत बांधलं गेलं आहे, ती माती आणि खालचं समुद्राचं दाब त्याला सतत खाली ओढत आहे. त्यात भर म्हणून, वाढती समुद्राची पातळी, हवामान बदल, वादळं, नैसर्गिक आपत्ती  हे सगळं त्याच्या संकटात भर घालतंय.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशियाचा वाढता धोका युरोपसाठी गंभीर! अमेरिकन जनरल म्हणाले NATOला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची गरज

संकटात असलं तरी दर्जा कायम!

या सर्व संकटांमुळे कान्साई विमानतळाचं भविष्य धोक्यात असलं, तरीही त्याचा दर्जा अजूनही जागतिक स्तरावर टिकून आहे. २०२४ मध्ये, याला जगातलं सर्वोत्कृष्ट सामान हाताळणारे विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलं. गेल्या १० वर्षांहून अधिक काळ एकही बॅग हरवलेली नाही, हे या विमानतळाचं एक अभूतपूर्व यश आहे.

वादळामुळे बंद, पण पुन्हा सज्ज

२०१८ मध्ये आलेल्या जेबी वादळात कान्साई विमानतळाला तात्पुरते बंद करावं लागलं होतं. प्रचंड पावसामुळे पूर आला आणि सर्व यंत्रणा ठप्प झाल्या. पण जपानी अभियंते आणि शास्त्रज्ञांनी तातडीने काम करत विमानतळ पुन्हा सुरू केलं. आजही अनेक अभियंते सतत त्याला स्थिर ठेवण्यासाठी आणि बुडण्याचा वेग कमी करण्यासाठी उपाय करत आहेत.

भूस्खलनाचा वाढता वेग

२०२४ मध्ये मिळालेल्या आकडेवारीनुसार, बेटाच्या पहिल्या भागात दरवर्षी सरासरी ६ सेमी जमिनीचा खालचा झुकाव नोंदवला गेलाय, तर दुसऱ्या भागात तो २१ सेमी आहे. याचा अर्थ हा आहे की विमानतळ हळूहळू पण सातत्याने समुद्रात बुडत चाललाय.

आंतरराष्ट्रीय संपर्क टिकवून

या संकटातही हे विमानतळ ९१ आंतरराष्ट्रीय शहरांशी जोडलेलं आहे. लाखो प्रवासी दरवर्षी येथे ये-जा करतात. जपानच्या ओसाका शहरासाठी आणि संपूर्ण आशियासाठी हे विमानतळ एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे, जपान सरकार आणि विमानतळ प्रशासन यासाठी विशेष योजना आखत आहेत – नवीन तंत्रज्ञान, जमिनीचं मजबुतीकरण, आणि दीर्घकालीन शाश्वत उपाययोजना राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेच्या टॅरिफमुळे जग संतप्त, पण ‘या’ देशाचा हुकूमशहा म्हणतो ‘धन्यवाद ट्रम्प!’

 संकटातलं यशस्वी उदाहरण

कान्साई विमानतळ ही एक चेतावणी आहे की निसर्गाच्या विरोधात तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी त्याला मात देण्यासाठी सतत सजग राहावं लागतं. पण याच वेळी, हे एक प्रेरणादायी उदाहरणही आहे की संकटातही दर्जा, शिस्त, आणि गुणवत्ता टिकवता येते. हे विमानतळ बुडत असलं तरीही जगातलं एक सर्वोत्तम विमानतळ म्हणून त्याचं नाव आजही टिकून आहे, आणि कदाचित भविष्यात अधिक सुरक्षित, अधिक स्थिर रूपात आपण त्याचं पुन्हा कौतुक करणार आहोत!

Web Title: Japans kansai airport is sinking yearly yet its ranked among the worlds best

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • airport
  • international news
  • Japan
  • navarashtra special story
  • special story

संबंधित बातम्या

Bengaluru एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी अन् आज 42 उड्डाणे रद्द; देशातील अनेक विमानतळांवर…
1

Bengaluru एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी अन् आज 42 उड्डाणे रद्द; देशातील अनेक विमानतळांवर…

Highest Debt Country : जागतिक अर्थव्यवस्थेला कर्जाचा विळखा; जाणून घ्या 2025 मध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी देश कोणते आहेत
2

Highest Debt Country : जागतिक अर्थव्यवस्थेला कर्जाचा विळखा; जाणून घ्या 2025 मध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी देश कोणते आहेत

Most Expensive Cigarettes: कोणत्या देशात विकली जाते सर्वात महाग सिगारेट? किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित
3

Most Expensive Cigarettes: कोणत्या देशात विकली जाते सर्वात महाग सिगारेट? किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित

K visa : चीनने जगभरातील बुद्धिमान लोकांवर लावली बोली; मोफत घरे, चांगले पगार आणि मोठा निधी देण्याचा नेमका हेतू काय?
4

K visa : चीनने जगभरातील बुद्धिमान लोकांवर लावली बोली; मोफत घरे, चांगले पगार आणि मोठा निधी देण्याचा नेमका हेतू काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.