
nsa ajit doval visit canada ottawa security khalistan issue february 2026
NSA Ajit Doval Canada visit February 2026 : भारत (India) आणि कॅनडा (Canada) यांच्यातील संबंधांवर साचलेली बर्फ आता वितळू लागली आहे. भारताचे ‘जेम्स बाँड’ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल (Ajit Doval) पुढील महिन्याच्या सुरुवातीला कॅनडाची राजधानी ओटावा येथे जाणार आहेत. हा दौरा केवळ औपचारिक नसून, कॅनडाच्या भूमीवरून भारताच्या विरोधात कारवाया करणाऱ्या खलिस्तानी घटकांना चाप लावण्यासाठी हा एक मोठा ‘मास्टरस्ट्रोक’ मानला जात आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSIA) नॅथली ड्रोविन यांनी दिल्लीला भेट दिली होती. त्या भेटीच्या सहा महिन्यांनंतर आता अजित डोभाल स्वतः कॅनडात जात आहेत. २०२३ मध्ये हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी लावलेल्या आरोपांमुळे दोन्ही देशांतील संबंध टोकाला पोहोचले होते. मात्र, कॅनडात सत्तांतर झाल्यानंतर आणि मार्क कार्नी पंतप्रधान बनल्यानंतर भारतासोबतचे नाते सुधारण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Xi Mingze : चीनची ‘राजकुमारी’ सांभाळणार सत्तासूत्रे? शी जिनपिंग यांच्या मुलीच्या राजकीय प्रवेशाची संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा
अजित डोभाल यांच्या या दौऱ्यात भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट असेल. पंजाबमध्ये फुटीरतावाद पसरवण्यासाठी कॅनडाच्या भूमीचा वापर करणाऱ्या खलिस्तानी संघटनांवर लगाम घालणे, हा भारताचा प्राथमिक मुद्दा आहे. याव्यतिरिक्त:
#cdnpoli #Breaking #Dhurandhar
Ajit Doval, India’s National Security Advisor will visit Ottawa next month to exchange intelligence and discuss security measures.
India’s Commerce Minister @PiyushGoyal and Finance Minister @nsitharaman Nirmala Sitharaman are also likely to visit… pic.twitter.com/ktjfh9df9j — Sameer Kaushal 🇨🇦❤🇮🇳 (@itssamonline) January 26, 2026
credit – social media and Twitter
अजित डोभाल यांच्या भेटीमुळे मार्चमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याची पार्श्वभूमी तयार होणार आहे. कार्नी यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यात भारत आणि कॅनडामध्ये युरेनियम पुरवठा, नागरी अणुऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि महत्त्वपूर्ण खनिजे यांबाबत सुमारे १० अब्ज डॉलर्सचे करार होऊ शकतात. विशेषतः युरेनियमच्या १० वर्षांच्या दीर्घकालीन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत उत्सुक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Conflict 2026: विनाशाचे सुंदर आरमार! काय आहे ट्रम्प यांचे इराणला जेरीस आणणारे ‘मिशन अब्राहम लिंकन’?
कॅनडाची RCMP (Royal Canadian Mounted Police) आणि भारताची NIA (National Investigation Agency) सध्या सातत्याने संपर्कात आहेत. डोभाल यांच्या दौऱ्यामुळे या दोन्ही एजन्सींच्या ‘इंटरऑपरेबिलिटी’ (Interoperability) मध्ये सुधारणा होईल. दोन्ही देशांनी मान्य केले आहे की, कोणत्याही देशाला दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या घटकांसाठी आपली भूमी वापरू देऊ नये.
Ans: सुरक्षा सहकार्य मजबूत करणे, खलिस्तानी अतिरेक्यांच्या हालचालींवर चर्चा करणे आणि पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या आगामी भारत दौऱ्याची तयारी करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
Ans: जून २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी आणि मार्क कार्नी यांच्या जी-७ शिखर परिषदेतील भेटीनंतर आणि ऑगस्टमध्ये हाय-कमिशनर्सच्या पुनर्नियुक्तीनंतर संबंध सुधारण्यास सुरुवात झाली.
Ans: सुरक्षा, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, आणि मार्चमध्ये होणाऱ्या युरेनियम व एआय (AI) करारांच्या अटींवर या दौऱ्यात सविस्तर चर्चा होईल.