
uk storm chandra flood alerts ice warning transport disruption january 2026
Storm Chandra UK latest updates 2026 : ब्रिटनमध्ये (Britain)सध्या निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या ‘इंग्रिड’ आणि ‘गोरेट्टी’ या दोन वादळांनंतर आता ‘चक्रीवादळ चंद्रा’ (Storm Chandra) ब्रिटनला धडकले आहे. या वादळाने केवळ मुसळधार पाऊस आणि जोरदार वारेच आणले नाहीत, तर संपूर्ण देशाला बर्फाच्या चादरीत ओढण्याची तयारी केली आहे. ब्रिटनच्या हवामान खात्याने (Met Office) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस देशासाठी अत्यंत कठीण असणार आहेत.
‘चंद्र’ वादळामुळे ब्रिटनच्या दक्षिण आणि पश्चिम भागात विक्रमी पाऊस झाला आहे. यामुळे नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर गेली असून देशात १०० हून अधिक पुराचे इशारे (Flood Alerts) जारी करण्यात आले आहेत. विशेषतः सोमरसेट (Somerset) आणि डेव्हन (Devon) भागात परिस्थिती गंभीर आहे. येथे रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक वाहने पुरात अडकल्याच्या बातम्या समोर येत आहेत. प्रशासनाने लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Red Tape Secret: नेतान्याहूंच्या फोनवर ‘लाल पट्टी’ का? ‘या’ व्हायरल फोटोमागचे इस्रायली ‘कमांडो’ सिक्रेट जगासमोर उघड
मुसळधार पावसानंतर आता ब्रिटनमध्ये बर्फवृष्टीचे संकट उभे ठाकले आहे. उत्तर आयर्लंड, स्कॉटलंड आणि इंग्लंडच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू झाली आहे. हवामान खात्याने ‘बर्फ आणि थंडी’साठी यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत तापमान गोठणबिंदूच्या (0°C) खाली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ओले रस्ते बर्फाच्या थरामुळे अत्यंत निसरडे होतील. हे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरू शकते.
❄️ Storm Chandra to bring heavy snow to Britain Weather alerts issued across UK, with flooding, power cuts and travel chaos expected Find out more ⬇️https://t.co/2aUMGW4i5h pic.twitter.com/zHbnAPSRtC — The Telegraph (@Telegraph) January 26, 2026
credit – social media and Twitter
वादळामुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमधील विमानतळांवरून होणारी डझनावारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. नॅशनल रेलने (National Rail) दिलेल्या माहितीनुसार, रुळांवर झाडे पडल्याने आणि पुरामुळे शुक्रवारपर्यंत रेल्वे प्रवासावर परिणाम होऊ शकतो. लंडन ते ब्रिस्टल आणि वेल्सला जाणारे अनेक मार्ग सध्या बंद आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी अनेक कौन्सिलने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Winter Storm 2026: समुद्राच्या पोटात वाढतोय ‘बर्फाळ राक्षस’! अमेरिकेवर ‘बॉम्ब सायक्लोन’चे संकट; 18 राज्यांत आणीबाणी
एकाच महिन्यात तीन मोठी वादळे धडकल्याने शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘इंग्रिड’ आणि ‘गोरेट्टी’ वादळाने आधीच जमीन ओळीचिंब केली असताना, ‘चंद्रा’च्या पावसाने पुराची तीव्रता वाढवली आहे. प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘इमर्जन्सी किट’ तयार ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Ans: या वादळाचा फटका संपूर्ण यूकेला बसला असून विशेषतः दक्षिण-पश्चिम इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे.
Ans: हवामान खात्याने आणि पर्यावरण संस्थेने संपूर्ण ब्रिटनमध्ये १०० हून अधिक पुराचे इशारे आणि सुमारे २०० पुराच्या सतर्कतेचे संदेश जारी केले आहेत.
Ans: वादळानंतर आकाश स्वच्छ होताच तापमान गोठणबिंदूच्या खाली जाऊन -२ ते -५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.