Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Osman Hadi: बांग्लादेश हाय अलर्टवर! उस्मान हादीचे पार्थिव संध्याकाळी पोहोचणार; तणावजन्य स्थितीत भारताने जारी केली ऍडव्हायजरी

Bangladesh Violence : बांगलादेशात उस्मान हादीच्या मृत्यूनंतर देशभरात हिंसक निदर्शने झाली. मीडिया हाऊस जाळण्यात आले आणि भारतीय उच्चायुक्तालय आणि शेख मुजीबुर रहमान यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 19, 2025 | 01:45 PM
Journalist killed four injured including a policeman in Bangladesh violence India issues advisory

Journalist killed four injured including a policeman in Bangladesh violence India issues advisory

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशातील खुलना येथे पत्रकार इमदादुल हक मिलन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून, भारतीय दूतावासांवर हल्ल्याचे प्रयत्न होत आहेत.
  • वाढता तणाव आणि भारतविरोधी घोषणाबाजी पाहता, भारत सरकारने बांगलादेशातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
  •  ईशनिंदेच्या खोट्या आरोपाखाली हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली असून, चितगाव आणि राजशाही येथील भारतीय कार्यालयांबाहेर लष्कर तैनात करण्यात आले आहे.

Bangladesh violence news today live updates : शेजारील देश बांगलादेश (Bangladesh) सध्या रक्तरंजित हिंसाचाराच्या ज्वालामुखीवर उभा आहे. विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी (Osman Hadi) यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात अराजकता माजली असून, याचे पडसाद आता थेट भारतविरोधी निदर्शने आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या रूपात उमटत आहेत. गेल्या २४ तासांत घडलेल्या घटनांनी केवळ बांगलादेशच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियातील शांतता धोक्यात आली आहे.

पत्रकाराची चहाच्या टपरीवर हत्या

हिंसाचाराची सर्वात भीषण घटना खुलना येथे घडली. शालुआ प्रेस क्लबचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार इमदादुल हक मिलन हे एका चहाच्या टपरीवर बसले असताना, दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. मिलन यांचा जागीच मृत्यू झाला. एका पत्रकाराची अशा प्रकारे दिवसाढवळ्या झालेली हत्या बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ठरली आहे. या हल्ल्यात अन्य काही नागरिकही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भारतीय दूतावास लक्ष्य आणि लष्कराची तैनात

कट्टरपंथी संघटना ‘इन्कलाब मंच’च्या समर्थकांनी आपला मोर्चा आता थेट भारताकडे वळवला आहे. चितगाव येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयाबाहेर मध्यरात्री जमावाने जोरदार निदर्शने केली. कार्यालयावर विटा फेकण्यात आल्या असून तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून चितगाव दूतावासाबाहेर बांगलादेशी लष्कर (Army) तैनात करण्यात आले आहे. राजशाही येथील भारतीय कार्यालयालाही घेराव घालण्याचे आवाहन कट्टरपंथीयांनी दिले असून, शाहबाग परिसरात ‘भारतावर बहिष्कार टाका’ (Boycott India) अशा घोषणा दिल्या जात आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Snow : जगाचा अंत जवळ आलाय? सौदी अरेबियातील बर्फवृष्टीमुळे कालचक्र फिरलं अन् पैगंबरांची ‘ती’ भविष्यवाणी पुन्हा जिवंत

हिंदू तरुणाची ईशनिंदेच्या आरोपाखाली हत्या

हिंसाचाराच्या या आगीत अल्पसंख्याक हिंदू समाजाला जाणीवपूर्वक भरडले जात आहे. मयमनसिंग जिल्ह्यात दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची ‘ईशनिंदे’चा खोटा आरोप लावून जमावाने निर्घृण हत्या केली. हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेल्या भावनांचा फायदा घेत कट्टरपंथी हिंदू कुटुंबांना लक्ष्य करत असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केला आहे. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात दहशतीचे वातावरण आहे.

Latest on the Bangladesh violence. I explain on @NDTV as two Newspaper buildings are set ablaze and one senior editor physically assaulted in Dhaka. The violence and mass protests likely to escalate today. Major challenge for Yunus Government. Radicals on rampage. pic.twitter.com/wnAtENk1hl — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) December 19, 2025

credit : social media and Twitter

हादी यांचे पार्थिव ढाक्यात; विद्यापीठात नामांतराचा वाद

सिंगापूरमध्ये उपचार घेत असताना निधन झालेले युवा नेते शरीफ उस्मान हादी यांचे पार्थिव आज संध्याकाळी बांगलादेशात पोहोचणार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे विद्यार्थी संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. ढाका विद्यापीठातील ऐतिहासिक ‘शेख मुजीबुर रहमान हॉल’चे नाव बदलून विद्यार्थ्यांनी तिथे ‘शहीद उस्मान हादी हॉल’ असे पोस्टर्स लावले आहेत. यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि निदर्शकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vijay Mallya : कर्ज बुडवलं पण स्वॅग तसाच! मल्ल्याच्या वाढदिवसाला लंडनमध्ये जमला ‘या’ सर्वच फरार उद्योगपतींचा मेळावा

भारत सरकारची भूमिका आणि ॲडव्हायजरी

बांगलादेशातील बिघडलेली परिस्थिती पाहता, भारतीय उच्चायुक्तालयाने तात्काळ ॲडव्हायजरी जारी केली आहे. बांगलादेशात असलेल्या भारतीय पर्यटकांना, प्रवाशांना आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. अमेरिकन दूतावासानेही हादी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असला तरी, हिंसक मार्गाचा निषेध केला आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात नुकतीच कोणत्या पत्रकाराची हत्या झाली?

    Ans: खुलना येथील शालुआ प्रेस क्लबचे अध्यक्ष इमदादुल हक मिलन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

  • Que: भारतीय दूतावासावर कोठे हल्ला झाला?

    Ans: बांगलादेशातील चितगाव (Chittagong) येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयावर जमावाने विटाफेक आणि तोडफोड केली आहे.

  • Que: भारत सरकारने बांगलादेशातील भारतीयांसाठी काय सूचना दिल्या आहेत?

    Ans: भारताने ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली असून, भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास आणि प्रवास मर्यादित ठेवण्यास सांगितले आहे.

Web Title: Journalist killed four injured including a policeman in bangladesh violence india issues advisory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh News
  • Bangladesh violence

संबंधित बातम्या

Deepu Das: बांग्लादेशात ‘हिंदू तरुणा’ला झाडाला टांगून जिवंत जाळले; उस्मान हादीच्या मृत्यूनंतर कट्टरपंथीयांचा नंगा नाच, पाहा VIDEO
1

Deepu Das: बांग्लादेशात ‘हिंदू तरुणा’ला झाडाला टांगून जिवंत जाळले; उस्मान हादीच्या मृत्यूनंतर कट्टरपंथीयांचा नंगा नाच, पाहा VIDEO

Bangladesh Violence: रक्ताने माखला लोकशाहीचा चेहरा! ‘भारतामुळे’ बांगलादेशात पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; VIDEO VIRAL
2

Bangladesh Violence: रक्ताने माखला लोकशाहीचा चेहरा! ‘भारतामुळे’ बांगलादेशात पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; VIDEO VIRAL

Sharif Osman Hadi: एक गोळी डोक्यात लागली आणि ‘तो’ रक्ताच्या थारोळ्यात; उस्मान हादीच्या हत्येमुळे बांगलादेश हिंसाचाराने पेटला
3

Sharif Osman Hadi: एक गोळी डोक्यात लागली आणि ‘तो’ रक्ताच्या थारोळ्यात; उस्मान हादीच्या हत्येमुळे बांगलादेश हिंसाचाराने पेटला

भारतविरोधी व्यक्तव्यांवर परराष्ट्र मंत्रालय आक्रमक; बांगलादेश उच्चायुक्तांना बोलावून केला निषेध
4

भारतविरोधी व्यक्तव्यांवर परराष्ट्र मंत्रालय आक्रमक; बांगलादेश उच्चायुक्तांना बोलावून केला निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.