सौदी अरेबियातील एक अनोखे दृश्य, वाळवंटी पर्वतावर पसरली बर्फाची चादर; पैगंबरांची भविष्यवाणी खरी ठरत आहे का? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Saudi Arabia snowfall December 2025 : सौदी अरेबिया (Saudi Arabia) म्हणजे डोळ्यासमोर येते ते अथांग वाळवंट आणि अंगाची लाहीलाही करणारा सूर्यप्रकाश. पण सध्या या वाळवंटाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. उत्तर सौदी अरेबियातील ताबुक (Tabuk) आणि जबल अल-लॉज (Jabal Al-Lawz) या पर्वतीय भागात निसर्गाचा एक अजब चमत्कार पाहायला मिळत आहे. या भागात झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे डोंगरदऱ्या बर्फाखाली गाडल्या गेल्या आहेत. हे फोटो सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले आहेत की अनेकांना हे ‘एआय’ने (AI) तयार केलेले फोटो वाटत आहेत.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी आणि सौदी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भागात तापमानाचा पारा उणे ४ अंशांच्या खाली गेला आहे. ट्रोजाना हाईलँड्स आणि ताबुकच्या परिसरात केवळ बर्फच पडला नाही, तर मुसळधार पावसाने ओढे-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. या पावसामुळे वाळवंटातील कोरड्या जमिनीला ओलावा मिळाला असून तिथे हिरवळ उगवू लागली आहे. हे दृश्य स्थानिक लोकांसाठी जितके आनंददायी आहे, तितकेच ते जगासाठी चिंतेचे आणि कुतूहलाचे कारण ठरले आहे.
First snowfall of year blanketed high altitude regions of Saudi Arabia this week as temperatures dropped sharply, creating rare winter scenes across elevated areas pic.twitter.com/S2opHXCPcz — Daily Sabah (@DailySabah) December 18, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Deepu Das: बांग्लादेशात ‘हिंदू तरुणा’ला झाडाला टांगून जिवंत जाळले; उस्मान हादीच्या मृत्यूनंतर कट्टरपंथीयांचा नंगा नाच, पाहा VIDEO
सोशल मीडियावर या बर्फवृष्टीचा संबंध थेट इस्लाम धर्मातील पैगंबर मुहम्मद यांच्या भविष्यवाणीशी लावला जात आहे. एका हदीसनुसार (Sahih Muslim), पैगंबरांनी म्हटले होते की, “जोपर्यंत अरबी द्वीपकल्प (Arabian Peninsula) पुन्हा एकदा कुरणे आणि नद्यांनी भरलेला होत नाही, तोपर्यंत कयामत (जगाचा अंत) येणार नाही.” सौदीत वाढलेला पाऊस, बर्फवृष्टी आणि त्यामुळे वाळवंटात वाढणारी हिरवळ हे या भविष्यवाणीच्या दिशेने पडलेले पाऊल असल्याचे अनेक मुस्लीम बांधव मानत आहेत. त्यांच्या मते, निसर्गातील हा बदल ‘अंतिम काळ’ जवळ आल्याचा संकेत आहे.
❄️ Aerial view of snowfall covering Jabal Al-Lawz, northwest of Tabuk 🇸🇦
Captured on December 17, 2025, showcasing one of Saudi Arabia’s most breathtaking winter scenes. 🎥 Aerial footage: Abdul Salam Al-Sharif Nature at its finest in the Kingdom. ❄️✨#SaudiTimes #JabalAlLawz… pic.twitter.com/9oo01VbTLD — Saudi Times (@sauditimes_en) December 18, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: रक्ताने माखला लोकशाहीचा चेहरा! ‘भारतामुळे’ बांगलादेशात पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; VIDEO VIRAL
दुसरीकडे, हवामान तज्ज्ञ या बदलाकडे जागतिक हवामान बदलाचा (Global Climate Change) परिणाम म्हणून पाहत आहेत. भूमध्य समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि हवेतील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही बर्फवृष्टी होत आहे. जर अशाच प्रकारे पाऊस आणि बर्फवृष्टी होत राहिली, तर सौदी अरेबियाचे कृषी क्षेत्र पूर्णपणे बदलू शकते. सौदी ग्रीन इनिशिएटिव्ह (Saudi Green Initiative) अंतर्गत तिथे आधीच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जात आहे. धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक बदल या दोन्हींच्या केंद्रस्थानी सध्या सौदी अरेबिया आले असून, हा बदल जगासाठी शुभ ठरेल की अशुभ, हे काळच ठरवेल.
Ans: उत्तर सौदी अरेबियातील ताबुक (Tabuk), जबल अल-लॉज आणि अल-जौफ या भागात प्रचंड बर्फवृष्टी झाली आहे.
Ans: एका हदीसनुसार, अरबी वाळवंट पुन्हा हिरवेगार होणे हा 'कयामत' (जगाचा अंत) जवळ आल्याचा संकेत मानला जातो, म्हणून लोक या बर्फवृष्टीला त्याशी जोडत आहेत.
Ans: होय, सौदीच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात उंचीमुळे हिवाळ्यात अधूनमधून बर्फ पडतो, मात्र अलीकडच्या काळात त्याचे प्रमाण हवामान बदलामुळे वाढले आहे.






