पुन्हा एकदा ट्र्म्प सरकार! विजयाबद्दल कमला हॅरिस आणि जो बायडेन यांनी दिल्या शुभेच्छा
वॉश्गिंटन: अमेरिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. अनेक महिन्यांच्या राजकारणानंतर अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. अमेरिकेची महासत्ता दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती आली तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा पराभव झाला. यानंतर डोनाल्ड ट्र्म्प यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.तसेच उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि जो बायडेन यांनी देखील आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. त्यांनी आपला पराभव स्वीकारत डोनाल्ड ट्र्म्प यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.
भविष्यासाठी सतत कार्यरत राहण्याचा निर्धार
कमला हॅरिस यांनी पराभवानंतर आपल्या पहिल्या भाषमात म्हटले की, माझे हृदय भरून आले आहे. तसेच तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. निवडणुकीचा हा निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे नसला तरी आम्ही हा पराभव मान्य करते. निवडणूक लढवताना आम्ही संपूर्ण देशाच्या विश्वासाने काम केले आणि त्याच जिद्दीने काम करत राहू.” असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी अमेरिकेच्या नागरिकांना आश्वस्त केले की, हा संघर्ष थांबणार नाही. त्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत कार्यरत राहतील असा निर्धार कमला हॅरिस यांनी व्यक्त केला.
डोनाल्ड ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा
कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी, ट्रम्प यांच्या टीमला सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेत आवश्यक ती मदत करण्यास आपण सज्ज आहोत आणि एक शांततापूर्ण परिवर्तन साध्य करण्यासाठी काम करणार आहोत असे त्या म्हणाल्या. हॅरिस यांचा हा प्रतिसाद लोकशाही प्रक्रियेबद्दलच्या त्यांच्यावरील दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.
बायडेन यांनी केले कमला हॅरिस यांचे कौतुक
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही कमला हॅरिस यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे गुणगान केले. ट्विटरवर बायडेन यांनी एक पोस्ट करत याबाबत म्हटले की, “कमला हॅरिस या खऱ्या अर्थाने लोकसेवक आहेत. त्यांच्यात प्रामाणिकपणा, धैर्य आणि चारित्र आहे. त्यांनी अमेरिकेच्या लोकांसाठी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. या निवडणुकीत त्यांनी संपूर्ण योगदान दिले याचा मला अभिमान आहे.”
Tomorrow is Election Day.
If you didn’t vote early, make sure you know where your polling place is for tomorrow: https://t.co/Hy8C4mIL2M.
I know @KamalaHarris can beat Donald Trump, but you have to vote. pic.twitter.com/iSfVCcQrBq
— Joe Biden (@JoeBiden) November 4, 2024
बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले
बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच त्यांनी व्हाईट हाऊस येथे त्यांच्याशी लवकरच भेटण्याची तयारीही केली आहे. ट्रम्प यांच्या टीमकडून या कॉलचे स्वागत करण्यात आले असून आगामी सत्ता परिवर्तनासाठी दोन्ही बाजूंनी सहकार्याची तयारी दर्शवली जात आहे.
हे देखील वाचा- Donald Trump Victory: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी हे आठ लोक ठरले ‘ट्रम्पकार्ड’