Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Afghan War : ट्रम्प यांचा ग्रीन सिग्नल अन् पाकिस्तानचा अफगाणवर हल्ला? वॉशिंग्टनमध्ये ठरला ‘गेम प्लॅन’!

Pak-Afghan War : सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तीव्र युद्ध सुरु आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण आहे. याच वेळी या युद्धामागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 28, 2026 | 07:20 PM
Pakistan Afghanistan War

Pakistan Afghanistan War

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान अफगाणिस्तान तणावात पुन्हा वाढ
  • ट्रम्प यांच्या भेटीनंतर हल्ला झाल्याचा दावा
  • पाक-अफगाण युद्धाची सुत्रे अमेरिकेतून फिरली?
Pakistan-Afghanistan War News in Marathi : इस्लामाबाद/काबूल : गेले काही दिवस पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) सीमेवर अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये खुले युद्ध सुरु असून परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.

Pak-Afghan War : पाक-अफगाण युद्धात ट्रम्प यांचा हस्तक्षेप; दोन्ही देशांच्या ‘खूनी खेळा’वर दिला मोठा इशारा

तालिबान सैन्य पाकिस्तानच्या अंतर्गत भागांमध्ये घुसून ड्रोन हल्ले करत आहे. आतापर्यंत इस्लामाबादजवळील फैजाबाद लष्करी छावणी, नौशेरा येथील लष्करी मुख्यालय, जमरुद येथील लष्करी टाउनशिप आणि अबोटाबादमधील लष्करी छावण्यांवर हल्ले केले आहेत. तर यापूर्वी पाकिस्तानने देखील अफगाणिस्तानवर हल्ला करत २४७ तालिबानी सैनिकांना ठार केले आहे. तसेच अनेक दहशतवादी अड्ड उद्ध्वस्त केल्याचाही दावा केला आहे. यामुळे सध्या दक्षिण आशियात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी तालिबानविरोधात थेट खुले युद्ध पुकारले आहे. मात्र या युद्ध सुरु होण्याच्या वेळेवरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा दावा करण्यात आला आहे. पाक-अफगाण युद्धाची सुत्रे अमेरिकेतून फिरली असल्याचा दावा केला जात आहे. अफगाण पत्रकार बिलाल सरवरी आणि अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे की, हे युद्ध अशा वेळी होत आहे जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ ( Shehbaz Sharif ) अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते.

गेल्या आठवड्यात झालेल्या या भेटीनंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने अफगणास्तानच्या सीमेत घुसखोरी करत काबूल, कंधार आणि जलालाबाद यांसारख्या शहबांवर बॉम्ब हल्ले केले. यामुळे अमेरिकेच्या सांगण्यावरुन पाकिस्तानने अफगाणविरोधात युद्ध पुकारले का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या एअरबेससाठी ट्रम्प यांची मोठी रणनीती

अफगाण पत्रतार बिलाल सरवरी याने दावा केला आहे की, बग्राम एअरबेस या युद्धामागचे मोठे कारण आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा सत्तेत आल्यापासून त्यांनी बग्राम एअरबेस परत मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानशी झालेल्या युद्धात अमेरिकेने हा लष्करी तळ सोडला होता. ही अमेरिकेची सर्वात मोठी चूक होती असे ट्रम्प यांचे मत आहे.

ट्रम्प यांच्या मते, या लष्करी तळावर चीनची नजर आहे आणि दक्षिण आशियातील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेला हा तळ पुन्हा हवा आहे. हा एअरबेस परत देण्यास तालिबानने नकार दिला होता. यामुळे तालिबानवर दबावासाठी अमेरिका पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून गेम खेळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला शांतता प्रस्थापित करायची असल्यास अमेरिका मध्यस्थीसाठी तयार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Tonight, Pakistani military strikes reportedly targeted multiple locations across Afghanistan, including Kabul, Kandahar, Paktia, Ningarhar, and Kunar. In Kabul, neighbourhoods such as Wazir Akbar Khan, Arzan Qemat, Darul Aman, Khushal Khan, and areas near Kabul airport were… pic.twitter.com/vcmY6S8keo — BILAL SARWARY (@bsarwary) February 26, 2026

PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष का वाढला आहे?

    Ans: पाकिस्तानने अलीकडे केलेल्या तालिबानवरील बॉम्ब हल्ल्यामुळे पाक-अफगाण संघर्ष पेटला आहे.

  • Que: पाक-अफगाण संघर्षात अमेरिकेचा उल्लेख का होत आहे?

    Ans: तज्ज्ञांचे मते, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ अलीकडे अमेरिका दौऱ्यावर गेले होते. या भेटीनंतर काही तासांतच अफगाणिस्तानवर हल्ला झाल्याने पाक-अफगाण युद्धामागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा केला जात आहे.

  • Que: बग्राम एअरबेस का चर्चेत आहे?

    Ans: बग्राम एअरबेस हा अफगाणिस्तानमधील महत्वाचा लष्करी तळ आहे. अफगाणिस्तानशी झालेल्या युद्धात अमेरिकेने हा तळ सोडला होता. परंतु आता ट्रम्प यांना हा लष्करी तळ पुन्हा हवा आहे. यावरुन पाकिस्तानच्या माध्यमातून तालिबानवर दबाव आणला जात असल्याचा दावा केला जात आहे,

Web Title: Pakistan afghanistan war 2026 us donald trump and shehbaz sharif meet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Afghanistan-Pakistan Conflict
  • Donald Trump
  • Pakistan News

संबंधित बातम्या

US-Venezuela: जागतिक इतिहासातील सर्वात मोठा करार! व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण; ट्रम्प यांची घोषणा
1

US-Venezuela: जागतिक इतिहासातील सर्वात मोठा करार! व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण; ट्रम्प यांची घोषणा

PoK Politics : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सत्तांतर; PML-Nचे इफ्तिखार गिलानी नवे ‘पंतप्रधान’
2

PoK Politics : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सत्तांतर; PML-Nचे इफ्तिखार गिलानी नवे ‘पंतप्रधान’

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप
3

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप

Islamabad : इस्लामाबादमध्ये काळीज पिळवटणारी घटना; रुग्णालयात एसीच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 15 नवजात बालकांचा मृत्यू
4

Islamabad : इस्लामाबादमध्ये काळीज पिळवटणारी घटना; रुग्णालयात एसीच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 15 नवजात बालकांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.