Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : इराणचे विनाशकारी प्रत्युत्तर! काय आहे ऑपरेशन फतह-ए-खैबर? इस्रायल-अमेरिकेचे दणाणले दाबे

Iran Israel War : मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायलने इराणवर संयुक्तपणे लष्करी कारवाई केली आहे. यामुळे इराणमध्ये संतापाची लाट उसळली असून ऑपरेशन फतह-ए-खैबर इराणने सुरु केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 28, 2026 | 06:30 PM
Middle East War

Middle East War

Follow Us
Close
Follow Us:
  • इस्रायली हल्ल्याला इराणचे विनाशकारी प्रत्युत्तर
  • इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने सुरु केले ऑपरेशन फतह-ए-खैबर
  • अमेरिका-इस्रायलचे दणाणले दाबे
Iran Operation Fatah-e-Khyaber : तेहरान : मध्यपूर्वेतील संघर्ष आता एका धोकादायक वळणावर आला आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपण इराणवर लष्करी कारवाई केली आहे. इराणची राजधानी तेहरानसह अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. तर इराणने देखील या हल्ल्यांना विनाशकारी प्रत्युत्तर दिले आहे. इराणने अमेरिका-इस्रायलविरोधात ऑपरेशन फतह-ए-खबैर सुरु केले आहे.

Iran vs USA Conflict 2026: इराणचा प्रतिहल्ला! बहरीन आणि युएईमधील अमेरिकन तळांवर डागली क्षेपणास्त्र

काय आहे ऑपरेशन फतह-ए-खैबर?

इराणने ऑपरेशन फतह-ए-खबैर अंतर्गत इस्रायलवर खतरनाक बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा केला आहे. तसेच अमेरिकेच्या सात देशांमधील लष्करी तळांवरही हल्ले केले आहेत. यामध्ये फतह शब्दाचा अर्थ विजय आणि खैबर हे सौदी अरेबियाजवळील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. यापूर्वी ७ व्या शतकात मुस्लिम आणि ज्यू समुदायात मोठी लढाई झाली होती. याच युद्धाला फतह-ए-खैबर असे नाव देण्यात आले होते.

ज्युन्या लढाईत प्रेषिदत मोहम्मद पैगंबर यांचे जावई हजरत अली यांनी खैबर किल्ल्याचा अभेद्य दरवाजा उखडून टाकला होता. ज्यामुळे मुस्लिमांना विजय मिळाला होता. सध्या मध्यपूर्वेत अशीच परिस्थिती आहे. इराण हे शिया मुस्लिम बहुल देश आहे तर दुसरीकडे इस्रायल एक ज्यू समुदायी राज्य आहे. यामुळे अमेरिका-इस्रायलविरोधीत मोहिमेला फतह-ए-खैबर नाव देऊन नेतन्याहूंना इतिहासाची आठवण करुन दिली आहे.

अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला

इराणने अमेरिकेच्या बहरीन, कतार, कुवेत, यूएईमधील, जॉर्डनमधील लष्करी तळांवरही हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर युएई, कतार आणि कुवैत यांनी त्यांचे हवाई क्षेत्र तात्पुरते आणि अंशतः बंद केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी दुबई आणि दोहा कडील उड्डाणे रद्द केली आहेत.

याच पार्श्वभूमीवर कतारमधील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना ‘शेल्टर-इन-प्लेस’ (आहे त्या सुरक्षित ठिकाणी राहणे) आणि लष्करी ठिकाणांपासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत.

भारताकडून इराण-इस्रायलमधील नागरिकांसाठी सुचना जारी

मध्यपूर्वेतील बिघडत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेल अवीव आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतीय नागरिकांना इस्रायली अधिकारी आणि होम फ्रंट कमांडने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आणि सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

तर इराणमधील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आणि आुपत्कालीन परिस्थिती दूतावासाशी संपर्क साधण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय दोन्ही देशांतील नागरिकांना प्रवास टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

खामेनेई कुठे गायब ?

याच वेळी तेहरानवरील हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई गायब झाले आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला जात असून त्यांच्या ठावठिकाणाचा कोणालाही पत्ता नाही. खामेनींच्या मुख्यालयाजवळी हल्ल्यानंतर ते अंडरग्राउंड झाले असल्याचा दावा केला जात आहे.

Iran-Israel War: इराणचा ‘अणु’ माज उतरवणार? ‘असे’ आहे इस्रायल-अमेरिकेचे ‘Operation Epic Fury’; पाहा युद्धाचा भीषण चेहरा

Web Title: Middle east war iran israel america trump khamenei operation fatah e khyber

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • Israel
  • Israel Iran war
  • World War

संबंधित बातम्या

Bible Prophecy : केवळ निसर्गचक्र नाही! धार्मिक ग्रंथांतील ‘प्रलयाच्या’ खुणा इस्रायलमध्ये? ‘या’ भविष्यवाण्या झाल्या खऱ्या
1

Bible Prophecy : केवळ निसर्गचक्र नाही! धार्मिक ग्रंथांतील ‘प्रलयाच्या’ खुणा इस्रायलमध्ये? ‘या’ भविष्यवाण्या झाल्या खऱ्या

US Defense : युद्धाच्या वणव्यात शस्त्रसाठा भरून काढण्यासाठी GM आणि Ford मैदानात; ट्रम्प प्रशासनाचा ‘मिशन वेपन’ धमाका
2

US Defense : युद्धाच्या वणव्यात शस्त्रसाठा भरून काढण्यासाठी GM आणि Ford मैदानात; ट्रम्प प्रशासनाचा ‘मिशन वेपन’ धमाका

Lebanon Ceasefire : ट्रम्प निमित्त मात्र, किंगमेकर सलमान! सौदीच्या एका फोनने इस्रायलची बंदूक म्यान; लेबनॉनमध्ये शांतता
3

Lebanon Ceasefire : ट्रम्प निमित्त मात्र, किंगमेकर सलमान! सौदीच्या एका फोनने इस्रायलची बंदूक म्यान; लेबनॉनमध्ये शांतता

Uranium Crisis: ट्रम्पचा ‘युरेनियम दावा’ अवास्तव कल्पना; इराणने पुन्हा उघडपणे उडवली अमेरिकेची खिल्ली, कराराचेही केले खंडन
4

Uranium Crisis: ट्रम्पचा ‘युरेनियम दावा’ अवास्तव कल्पना; इराणने पुन्हा उघडपणे उडवली अमेरिकेची खिल्ली, कराराचेही केले खंडन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.