फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या असून डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा एकदा बहुमताने यशस्वी झाले आहेत. ट्रम्प यांचे दुसऱ्यांदा पुनरागमन झाले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर आपले पहिले भाषण दिले या भाषणात त्यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. ट्रम्प यांनी समर्थकांचे आभार मानले. तसेच त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी सर्वातोपरी प्रयत्न करू असे म्हटले.
‘माझे सर्वस्व अमेरिकेला समर्पित’
या दरम्यान त्यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या आपल्या प्रसिद्ध घोषणेचा पुनरुच्चार करत ट्रम्प यांनी केला. त्यांनी म्हटले की, “माझे प्रत्येक श्वास अमेरिकेसाठी आहे. मी माझा संपूर्ण वेळ अमेरिकेला समर्पित करण्याचा प्रयत्न करेल.” तसेच त्यांनी अमेरिकन नागरिकांसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी सतत लढण्याचे आश्वासनही त्यांनी अमेरिकन जनतेला दिले. “जोपर्यंत आम्ही आपल्या मुलांसाठी सुरक्षित आणि समृद्ध अमेरिका निर्माण करत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
एलॉन मस्क यांचे मानले आभार
डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला मजबूत करण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यांनी सीमांचे संरक्षण, शिस्तबद्ध प्रशासन, आणि राष्ट्रीय हिताची भावना पुन्हा जागृत करण्याचा संकल्प व्यक्त केला. याव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी उद्योगपती एलोन मस्क यांचे आभार मानले. निवडणुकीत मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि आर्थिक मदतीबद्दल त्यांनी मस्क यांचे कौतुक केले. मस्क यांनीही ट्रम्प यांना उत्साहाने पाठिंबा दिला होता.
इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले –
डोनाल्ड ट्र्म्प यांच्या विजयाबद्दल त्यांना जगभरातून शुभेच्छा मिळत आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी या विजयाला ‘इतिहासातील सर्वात मोठे पुनरागमन’ म्हणत इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संबंधांना नव्या उंचीवर नेण्याची आशा व्यक्त केली आहे. नेतन्याहू यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “प्रिय डोनाल्ड आणि मेलानिया, ऐतिहासिक पुनरागमनाबद्दल अभिनंदन! व्हाईट हाऊसमध्ये तुमचे परतणे अमेरिकेसाठी नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. इस्रायल-अमेरिका संबंधांत ही एक नवीन बांधिलकी असेल.”
Dear Donald and Melania Trump,
Congratulations on history’s greatest comeback!
Your historic return to the White House offers a new beginning for America and a powerful recommitment to the great alliance between Israel and America.
This is a huge victory!
In true friendship,… pic.twitter.com/B54NSo2BMA
— Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) November 6, 2024
स्रायल-अमेरिका संबंधांत अधिक दृढता वाढेल
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातही त्यांनी इस्रायलचे उघड समर्थन केले होते. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय ट्रम्प यांच्या नेतृत्वात घेतला गेला होता. हा निर्णय इस्रायलसाठी एक महत्त्वाचा पाऊल ठरला. नेतन्याहूंच्या मते, या विजयाने इस्रायल-अमेरिका संबंधांत अधिक दृढता येईल. या निवडणुकीने अमेरिकन राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांत महत्त्वपूर्ण बदल घडवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.