Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kenya News : ‘कुत्रा आमच्यावर सोडल्यासारखे’; परदेशी व्यापाऱ्यांवर कारवाईने भीतीचे वातावरण

Kenya News : केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी छोट्या व्यवसायांमध्ये परदेशी नागरिकांच्या सहभागावर कठोर कारवाई सुरू केल्यानंतर स्थलांतरित समुदायांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नैरोबीतील अनेक बुरुंडी नागरिक मायदेशी परतण्याची तयारी करत असून, या कारवाईमुळे झेनोफोबियाची चिंता वाढली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 12, 2026 | 05:18 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • रूटो सरकारचा नेमका निर्णय काय ?
  • बुरुंडी नागरिकांमध्ये सर्वाधिक चिंता
  • कारवाईमुळे झेनोफोबियाची भीती वाढली
Kenya News : केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रूटो यांनी देशातील छोट्या व्यवसायांमध्ये परदेशी नागरिकांच्या सहभागावर कठोर कारवाई सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर परदेशी व्यापारी आणि स्थलांतरित समुदायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

छोट्या दुकाने , फेरीविक्री आणि किरकोळ व्यापार करणाऱ्या परदेशी नागरिकांना लक्ष केले जात असल्याने अनेकांनी आपले व्यवसाय बंद करण्यास किंवा देश सोडण्याची तयारी सुरु केली आहे . काही व्यापाऱ्यांनी या कारवाईची तुलना एखाद्या कुत्र्याला आमच्या अंगावर सोडल्यासारखी असल्याचे सांगत परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे .

रूटो सरकारचा नेमका निर्णय काय ?

रूटो सरकारचा दावा आहे कि केनियातील छोट्या व्यवसायामध्ये स्थानिक नागरिकांना प्राधान्य मिळाले पाहिजे . परदेशी नागरिकांनी मोठ्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात व्यवसाय करावा . मात्र कमी भांडवलाच्या फेरीविक्री आणि छोट्या किरकोळ व्यवसायांमध्ये त्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांशी स्पर्धा करू नये , अशी सरकारची भूमिका आहे .

७ सप्टेंबर पासून परेदशी नागरिकांकडून चालवले जाणारे काही छोटे व्यवसाय बंद करण्याची कारवाई सुरु करण्यात आली . त्याचबरोबर सरकारने परदेशी व्यापाऱ्यांच्या परवाने ,वर्क परमिट आणि व्यावसायिक कागदपत्रांची तपासणीही वाढवली आहे . मात्र कायदेशीर कागदपत्रे असलेल्या परदेशी नागरिकांना संरक्षण दिले जाईल , असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे .

Russia-Ukraine War : मियामीत पुतिनला भेटायला झेलेन्स्की तयार! G20 मध्ये थेट चर्चेची तयारी

बुरुंडी नागरिकांमध्ये सर्वाधिक चिंता

या कारवाईचा परिणाम बुरुंडी , काँगो आणि इतर आफ्रिकी देशांमधून आलेल्या छोट्या व्यापाऱ्यांवर जाणवत आहे , नैरोबीतील बुरुंडी दूतावासाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले असून काही जण परत मायदेशी जाण्यासाठी प्रवासाची कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत .

काही स्थलांतरितांना व्यवसाय बंद होण्याबरोबरच छळ किंवा हिंसाचाराची भीती वाटत आहे , त्यामुळे रोजच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे . दुसरीकडे स्थानिक व्यापाऱ्यांमधील काही वर्ग सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत असून , परदेशी नागरिकांमुळे स्थानिक रोजगार आणि छोट्या व्यवसायांवर दबाव वाढत असल्याचा त्यांच्या दावा आहे .

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

कारवाईमुळे झेनोफोबियाची भीती वाढली

सरकारने ही मोहीम परदेशी नागरिकांविरोधात नसून कायद्याचे पालन आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी असल्याचे म्हंटले आहे . परदेशी नागरिकांकडे आवश्यक परवाने आणि कागदपत्रे असल्यास त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी राहील , असेही स्पष्ट करण्यात आले आहे .

मात्र कारवाईची पद्धत आणि निर्माण झालेली भीती यामुळे झेनोफोबिया म्हणजे परदेशी नागरिकांविरोधात द्वेष वाढवण्याची चिंता व्यक्त केली जात आहे . काही नागरिकांना देश सोडण्याचा विचार करावा लागत असल्याने केनियाच्या प्रतिमेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे . सरकारने स्थानिक रोजगारांचे संरक्षण करताना परदेशी नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणे हे आता मोठे आव्हान ठरणार आहे .

 

Web Title: Kenya news like having a dog set upon us crackdown on foreign traders sparks atmosphere of fear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Africa Continent
  • african country
  • Migraine news

संबंधित बातम्या

Cape Verde Accident : केप वर्देच्या फोगो बेटावर भीषण बस अपघात; २५ जणांचा मृत्यू, अनेक मुले-बालकांचा समावेश
1

Cape Verde Accident : केप वर्देच्या फोगो बेटावर भीषण बस अपघात; २५ जणांचा मृत्यू, अनेक मुले-बालकांचा समावेश

Africa Continent: 500 वर्षांनंतर जगाचा नवा नकाशा! आफ्रिका खंड युरोप अन् अमेरिकेपेक्षा मोठा; 164 देशांचा UN मध्ये पाठिंबा
2

Africa Continent: 500 वर्षांनंतर जगाचा नवा नकाशा! आफ्रिका खंड युरोप अन् अमेरिकेपेक्षा मोठा; 164 देशांचा UN मध्ये पाठिंबा

Africa Map Update : आफ्रिकेचा नकाशा बदलणार; UNचा मोठा निर्णय, ‘Equal Earth’ नकाशाला १६४ देशांचा पाठिंबा
3

Africa Map Update : आफ्रिकेचा नकाशा बदलणार; UNचा मोठा निर्णय, ‘Equal Earth’ नकाशाला १६४ देशांचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.