फोटो सौजन्य AI
जर्मन प्रसारमाध्यमाला दिलेला मुलाखतीत झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्याशी थेट संवाद साधण्याची भूमिका स्पष्ट केली . त्यामुळे G -२० परिषदेकडे आता केवळ आर्थिक बैठकीऐवजी युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या राजनैतिक घडामोडींचे व्यासपीठ म्हणून पाहिले जात आहे .
झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्यासोबत थेट चर्चा करण्याची तयारी यापूर्वीही व्यक्त केली आहे . युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांच्या नेतृत्वाने प्रत्यक्ष संवाद साधने आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे . आता G -२० सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दोन्ही नेते एकाच ठिकाणी आले . तर भेटीची संधी निर्माण होऊ शकते .
मात्र ही भेट प्रत्यक्षात होईल का , याबाबत अद्याप निश्चितता नाही . पुतीन यांच्या उपस्थितीबाबत रशियानेही यापूर्वी अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही . त्यामुळे झेलेन्स्की यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेची शक्यता वाढली असली , तरी त्याचे रूपांतर प्रत्यक्ष बैठकीत होईल कि नाही , हे पुढील राजनैतिक हालचालींवर अवलंबून आहे .
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध चौथ्या वर्षातही सुरु आहे . युद्धभूमीवरील संघर्षासोबत दोन्ही बाजूंमध्ये राजनैतिक पातळीवरही दबाव वाढत आहे . अमेरिका आणि युरोपीय देशांकडून युद्ध थांबवण्यासाठी विविध मार्गाचा शोध घेतला जात आहे .
झेलेन्स्की यांची भूमिका अशी आहे कि कोणत्याही शांतता चर्चेत युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा आणि सुरक्षेचा विचार झाला पाहिजे . दुसरीकडे रशियाने आपल्या अटींवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे . त्यामुळे पुतीन झेलेन्स्की भेट झालीच ,तर चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यांवर होणार , हा मोठा प्रश्न असेल .
मियामीतील G २० परिषदेला त्यामुळे विशेष महत्व प्राप्त झाले आहे . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पुतीन यांच्या G २० सहभागाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे . रशिया G २० चा सदस्य असल्याने त्याचा सहभाग आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे .
झेलेन्स्की आणि पुतीन एकाच ठिकाणी उपस्थित राहिले , तर युद्धविराम , कैद्यांची सुटका , सुरक्षा हमी आणि भविष्यातील शांतता करार यांसारख्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे . मात्र दोन्ही बाजूंच्या भूमिका अजूनही मोठ्या प्रमाणात वेगळ्या आहेत . त्यामुळे मियामीतील संभाव्य भेट ही युद्ध संपवण्याच्या दिशेने पहिली मोठी पायरी ठरेल कि केवळ राजनैतिक संवादाची सुरवात ,याकडे जगाचे लक्ष लागले आहे .






