Kim Jong Un ban words 'Ice-cream' and 'Hamburger' in North Korea
North Korea News in Marathi : प्योंगयोंग : उत्तर कोरिया नेहमीच एक गूढ, रहस्यमयी आणि बंदिस्त देश राहिला आहे. या देशात काय चालले आहे याची कल्पना करणे देखील जवळजवळ अशक्यच आहे. शिवाय उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनाही जगातील सर्वात निर्दयी नेता म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या सख्या काकांना तोफेला बांधून उडवण्याचे आदेश दिले होते. यामुळे उत्तर कोरियामध्येही त्यांची मोठी दहशत आहे. तसेचते त्यांच्या अजीबो गरीब निर्णयासाठी देखील ओळखले जातात.
किंम जोंग ऊन यांचे निर्णय देखील असे असतात की संपूर्ण जगाला त्याच्यावर हासू येईल. असे सांगितले जाते की, किम जोंग ऊनला भीती आहे की पाश्चात्य संस्कृतीमुळे त्यांच्या देशातील लोक त्याच्याविरोधात जातील आणि त्याचे वर्चस्व नष्ट होईल. यामुळे त्यांनी देशात अनेक पाश्चात्य गोष्टींवर बंधने लादली आहेत.
दरम्यान त्यांनी पुन्हा एक विचित्र निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तुम्हालाही हसू आवरणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, किम जोंग ऊन यांनी उत्तर कोरियामध्ये आता Ice-cream शब्द बोलण्यावरही बंदी घातली आहे. त्यांच्या मते, हा पाश्चात्य संस्कृतीचा शब्द असून त्याच्या देशातील लोकांवर चुकीचा प्रभाव पडेल. त्याच्याऐवजी किम यांनी नागरिकांना एसेइकिमो शब्द किंवा ईओरेम्बोसुंगी शब्द वापरायला लावला आहे.
केवळ Ice-creamच नाही Hamburger शब्दही बॅन केला आहे. याऐवजी त्यांनी ‘दाजिन-गोगी-ग्योप्पांह’ म्हणजे ‘डबल ब्रेड विथ ग्राउंड बीफ’ असे म्हणावे लागणार आहे. तसेच कराओके मशीनालही ऑन-स्क्रीन अकॉम्पनिमेंट मशीन असे नाव देण्यात आले आहे.देशातील पाश्चात्य संस्कृतीचे, दक्षिण कोरियाचे कोणेतेही शब्द, चिन्ह, भाषा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. परदेशी बोली हळूहळू पुसली जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे उत्तर कोरियात परदेशी पर्यटन सुरु करण्यात आले आहे. यासाठी उत्तर कोरियाच्या समुद्रकिनारी वॉनसन शहरात एक लक्झपी रिसॉर्टही उभारण्यात आले आहे. मात्र येथे पर्यटकांसाठी टूर गाइड्स ठेवले जाणार आहेत. या टूर गाइड्सला सरकाने निश्चित केलेल्या ठिकाणांवरच लोकांना घेऊन जायचे आहे. तसेच परदेशी शब्द देखील वापरायचे नाही.
उत्तर कोरियामध्ये केवळ यावरच बदी नाही,तर तेथे टीव्हीवर केवळ सरकारी चॅनेल्स चालतात. बाकी इतर कोणतेही शो बघण्यास बंदी आहे. शिवाय लोकांच्या मोबाईल फोनमधील देखील परदेशी अप्स वापरण्यासबंदी आह. असे अनेक निर्णय देशात आहे ज्याची आपल्याला माहिती देखील नसले. यामुळे उत्तर कोरियावर अनेक वेळा मानवाधिकार संघटनांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावाल आहे. मात्र याविरोधात मोठ्या प्रमाणात आवजा उठवण्यात आलेला नाही.