Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kailash Mansarovar: लिपुलेख वाद पेटला! नेपाळने कैलास मानसरोवर यात्रा रोखली; बालेन सरकारने भारत आणि चीनला पाठवले ‘असे’ पत्र

Kailash Mansarovar Yatra:नेपाळच्या बालेन सरकारने लिपुलेख खिंडीतून जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला आक्षेप घेत भारत आणि चीनला पत्र पाठवले असून, त्यामुळे सीमावाद आणखी चिघळला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 04, 2026 | 07:33 AM
lipulekh border dispute nepal kailash mansarovar yatra 2026

lipulekh border dispute nepal kailash mansarovar yatra 2026

Follow Us
Follow Us:
  • लिपुलेखवरून कैलास मानसरोवर यात्रेला विरोध
  • भारत आणि चीनला राजनैतिक पत्र
  • १८१६ च्या सुगौली कराराचा संदर्भ

Lipulekh border dispute Nepal 2026 : आंतरराष्ट्रीय राजकारण आणि शेजारी देशांमधील संबंधांमध्ये सध्या एक अत्यंत संवेदनशील वळण आले आहे. भारताच्या उत्तर सीमेवरील शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळने रविवारी (३ मे २०२६) एक मोठे राजनैतिक पाऊल उचलत भारत आणि चीन या दोन्ही महासत्ता देशांना हादरवून सोडले आहे. नेपाळच्या बालेन सरकारने लिपुलेख खिंडीतून आयोजित करण्यात येणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला ( kailas mansarovar yatra) तीव्र आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशांच्या दूतावासांना एक कडक ‘राजनैतिक निषेध पत्र’ पाठवले आहे. या पत्रामुळे केवळ भारत-नेपाळ नव्हे, तर चीन-नेपाळ संबंधांमध्येही एक नवीन राजनैतिक पेच निर्माण झाला आहे.

लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुराचा वाद

नेपाळ सरकारचा असा ठाम दावा आहे की, लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हा संपूर्ण भौगोलिक प्रदेश नेपाळच्या सार्वभौम भूभागाचा अविभाज्य भाग आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लोक बहादूर पौडेल छेत्री यांनी या निषेध पत्राला दुजोरा देताना स्पष्ट केले आहे की, पूर्वपरवानगीशिवाय त्या प्रदेशात कोणतीही हालचाल किंवा उपक्रम करणे नेपाळला मान्य नाही. नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी देखील माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, हा निर्णय एका व्यक्तीचा नसून नेपाळमधील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या एकमताने आणि सखोल चर्चेनंतर घेण्यात आला आहे. यामुळे नेपाळच्या या भूमिकेवर संपूर्ण राजकीय वर्तुळ एकवटल्याचे दिसून येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sergio Gor: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी ट्रम्पच्या खास दूताला डावलले; ‘या’ कृत्याने अमेरिकेचा अपमान केल्याचा तज्ज्ञांचा आरोप

१८१६ चा सुगौली करार आणि नेपाळचा दावा

नेपाळ आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि तत्कालीन नेपाळ साम्राज्यादरम्यान १८१६ मध्ये झालेल्या ‘सुगौली कराराचा’ (Treaty of Sugauli) दाखला देत आहे. नेपाळमधील अभ्यासक आणि सरकारच्या मते, या करारानुसार महाकाली नदीच्या पूर्वेकडील सर्व भूभाग नेपाळच्या हद्दीत येतो. त्यामुळे लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे क्षेत्र नेपाळच्या नकाशाचा भाग आहेत. भारताने २०२० मध्ये जेव्हा लिपुलेख ते मानसरोवर असा नवीन रस्ता खुला केला, तेव्हापासूनच हा वाद अधूनमधून उफाळून येत आहे. मात्र, यंदा यात्रेच्या हंगामातच हे पत्र पाठवून नेपाळने पुन्हा एकदा या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आणले आहे.

#BREAKING MEA RESPONSE ON COMMENTS MADE BY NEPAL FOREIGN MINISTRY ON THE ISSUE OF LIPULEKH ‘Lipulekh pass has been long standing route for the Kailash Mansarovar Yatra Since 1954’ ‘Such claims are neither justified nor based on historical facts and evidence’ https://t.co/HULJjDrE4O pic.twitter.com/lrKSWDkpPT — Siddhant Mishra (@siddhantvm) May 3, 2026

credit – social media and Twitter

भारत सरकारची भूमिका

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच अनेकदा स्पष्ट केले आहे की, लिपुलेख आणि कालापानीचा परिसर हा पूर्णपणे भारताचा भाग आहे. भारताने बांधलेला रस्ता भारतीय हद्दीतच आहे आणि तो यात्रेकरूंच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रदेशात पायाभूत सुविधांचा विकास करणे हा भारताचा अंतर्गत विषय आहे, असे भारताचे म्हणणे आहे. अशा वेळी नेपाळच्या या निषेध पत्रावर भारत काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

🇮🇳⚡️“India remains open to a constructive interaction with Nepal on all issues in the bilateral relationship”. Statement by India’s Ministry of External Affairs. https://t.co/FIWBK1KPel pic.twitter.com/Qnvzpwf8bV — War Flash (@WarFlash_2630) May 3, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dubai Airport : UAEच्या आकाशात पुन्हा विमानांचा मार्ग मोकळा; युद्धाच्या सावटातून बाहेर येत विमानसेवा पूर्वपदावर

चीनलाही पत्र: राजनैतिक रणनीतीतील बदल

नेपाळच्या या भूमिकेमध्ये एक मोठे स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. यापूर्वी नेपाळने हा सीमावाद प्रामुख्याने भारतासोबत द्विपक्षीय पातळीवर चर्चेत आणला होता. परंतु, यावेळी नेपाळने चीनलाही औपचारिकपणे पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेपाळचे म्हणणे आहे की, दिल्ली आणि बीजिंग या दोन्ही देशांनी या वादग्रस्त प्रदेशासंदर्भातील नेपाळच्या सीमाविषयक संवेदनशीलतेचा आदर केला पाहिजे. कैलास मानसरोवर हे हिंदू आणि तिबेटी बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र असल्यामुळे, यात्रेकरूंच्या सुरक्षेचा आणि प्रवासाचा मुद्दा या भू-राजकीय तणावामुळे अडचणीत सापडला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळने नेमका कशास विरोध केला आहे?

    Ans: नेपाळने लिपुलेख खिंडीतून जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला आक्षेप घेतला आहे.

  • Que: नेपाळ कोणत्या ऐतिहासिक कराराचा संदर्भ देत आहे?

    Ans: नेपाळ १८१६ च्या 'सुगौली कराराचा' संदर्भ देत आहे.

  • Que: या पत्रामुळे कोणावर दबाव निर्माण झाला आहे?

    Ans: नेपाळने भारत आणि चीन या दोन्ही देशांना पत्र पाठविल्याने या दोन देशांसोबतचे राजनैतिक संबंध संवेदनशील बनले आहेत.

Web Title: Lipulekh border dispute nepal kailash mansarovar yatra 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 07:33 AM

Topics:  

  • India China Relation
  • kailas mansarovar yatra
  • nepal

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2026: आंतरराष्ट्रीय स्तरावर नेपाळला मोठा धक्का, नेपाळच्या संघाला करण्यात आले निलंबित; काय आहे कारण
1

FIFA World Cup 2026: आंतरराष्ट्रीय स्तरावर नेपाळला मोठा धक्का, नेपाळच्या संघाला करण्यात आले निलंबित; काय आहे कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.