Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महात्मा गांधींच्या वारसदार खाणार जेलची हवा; तब्बल सात वर्षांचा तुरुंगवास, नेमकं प्रकरण काय?

महात्मा गांधीजींची पणतू आशिष लता रमागोबिन यांना सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने फसवणुकीच्या आरोपाखाली ही शिक्षा सुनावली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 15, 2025 | 12:22 PM
Mahatma Gandhi's great-granddaughter jailed for 7 years in 3.22 crore fraud case

Mahatma Gandhi's great-granddaughter jailed for 7 years in 3.22 crore fraud case

Follow Us
Close
Follow Us:

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महात्मा गांधीजींची पणतू आशिष लता रमागोबिन यांना सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने फसवणुकीच्या आरोपाखाली ही शिक्षा सुनावली आहे. आशिष ही लता गांधी यांची नात इला गांधी यांची मुलगी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डरबन न्यायालयात सुनावणी सुरु होती. त्यांच्यावर एका व्यावसायिकाला फसवल्याचा आरोप होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel-Iran War : युद्ध आणखी पेटले! इस्रायलचा इराणच्या संरक्षण मंत्रालय आणि अणु मुख्यालयांवर भीषण हल्ला

 एस. आर महाराज या व्यावसायिकाची फसवणूक

आशिष लता रमागोबिन  यांच्यावर व्यावसायिक ए. आर. महाराज यांनी सुमारे ६.२ मिलियन रॅंड म्हणजेच सुमारे ३.२२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. हा आरोप सिद्ध झाला असून त्यांना या आरोपाखाली सात वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

रामगोबिन यांनी दावा केला होता की, भारतातून रुग्णालय समूहासाठी आयात केल्या जाणाऱ्या तीन कंटेनरमध्ये लिनेनसाठी माल आणला जात आहे. यासाठी कस्टम ड्युटी आणि आयात शुल्क भरण्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे, खोटे चलन, खरेदी आदेश आणि बॅंकेचे बनावट कागदपत्रे सादर केली होती.

आशिष लता रामगोबिन लता यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

एसआर महाराज यांनी त्यांच्या गांधी कुटुंबातील पार्श्वभूमीमुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आशिष लता यांना ३.२२ कोटींची मदत देऊ केली. परंतु त्यांना जेव्हा लक्षात आले की असा कोणताही माल किंवा शिपमेंट अस्तित्वात नाही. तसेच सर्व कागदपत्रे बनवटा आहेत त्यावेळी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या रामगोबिन यांना दोषी ठरवले आहे. या सहा वर्षे जुन्या प्रकरणा त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. याशिवाय त्यांना दोषनिर्याविरुद्ध अपील करण्याची परवानगी देखील नाकारण्यात आली आहे.

कोण आहेत आशिष लता रामगोबिन?

आशिष लता रामगोबिन या प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिन यांच्या कन्या आहेत. तसेच आशिष लता या पार्टिसिपेटिव्ह डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह नावाच्या एनजीओच्या संस्थापक आणि कार्यकारी संचालक होत्या. त्या स्वत:ला पर्यावरणीय, सामाजिक आणि राजकीय सुधारणा करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून संबोधतात. त्यांच्याव्यतिरिक्त महात्मा गांधींच्या कुटुंबातील अनेक लोक मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून देखील कार्य करतात. त्यांची आई लता इला यांना देखील जगभरात त्यांच्या समाजिक कार्यासाठी ओळखले जाते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांना मोठा सन्मान दिला जातो.

सोशल मीडियावर झाल्या ट्रोल

या घटनेनंतर महात्मा गांधींच्या पणतू आशिष लता रामगोबिन यांच्यावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. अनेकांनी गांधींजींचे कुटुंब पहिल्यापासूनच भष्ट्राचारी होते असे म्हटले आहे. तसेच गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेला आम्ही सलाम करतो, त्याने अत्यंत चांगले काम केले आहे असे लोकांनी म्हटले आहे. तर अनेकांनी दक्षिण आफ्रिकेतील लोक गांधींजींना देव मानतात आणि त्यांच्याच वंशजाने त्यांचे नाव खराब केले असल्याचे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- धक्कादायक! आणखी एका देशाची अणुशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल; रशियाचा मिळाला पाठिंबा

Web Title: Mahatma gandhis great granddaughter jailed for 7 years in 322 crore fraud case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • Mahatma Gandhi
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.