धक्कादायक! आणखी एका देशाची अणुशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल; रशियाचा मिळाला पाठिंबा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
International News Marathi: सध्या मध्यपूर्वेत इराणच्या अणुकार्यक्रमावरुन युद्ध पेटले आहे. इराणच्या अणु कार्यक्रमाला रोखण्यासाठी इस्रायलने हल्ला चढवला आहे. इराणमधील अनेक अणु तळांवर इस्रायलने हल्ले केले आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणखी एक देश अणुशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी रशियाचा उघडपणे पाठिंबा या देशाला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कझाकस्तान हा अण्वस्रे बनवण्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. रशियाची अणुउर्जा क्षेत्रातील मोठी कंपनी रोसाटॉम कझाकिस्तानमध्ये बांधण्यात येणार आहे. कझाकस्तानमध्ये पहिले अणु क्रेंद्र स्थापन होणार आहे. या माहितीचा खुलासा मध्ये आशियाई देश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमी केला. त्यांनी सांगितले की, कझाकिस्तान पहिल्या अणुउर्जा केंद्रासाठी रशियाच्या रोसाटॉमला नामांकन मिळाले आहे.
कझाकस्तान हा जगातील सर्वात मोठा युरेनियम उत्पादक आहे. यामुळे रशियाला कझाकस्तानमध्ये अणु शस्त्रे बनवण्यावस कोणतीही अडचण येणार नाही. शिवाय मध्य आशियातील सर्वात जास्त संसाधनांनी समृद्ध असलेला देश म्हणून कझाकस्तानला ओळखले जाते. जगातील सर्वाधिक युरेनियमचा साठा कझाकस्तानमध्ये आढळतो. हा देश जगातील इतर देशांना 43 टक्के युरेनियम पुरवतो. तसेच देशांतर्गत याचा वापर वीज निर्मिती करण्यासाठी केला जातो.
कझाकिस्तानचे उर्जा केंद्राला २०२४ मध्ये मान्यता देण्यात आली. बाल्कश सरोवराजवळील उल्केन येथे कझाकिस्तानचे केंद्र बांधण्यात आले. बल्खाश सरोवर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सरोवर आहे.
यापूर्वी चीन, फ्रान्स, आणि दक्षिण कोरियानेही कझाकिस्तानमध्ये अणुउर्जा केंद्र बनवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यामध्ये कोणालाही यश आले नाही. चायना नॅशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशनच्या अहवालानुसार, फ्रान्सची ईडीएफ आणि दक्षिण कोरियाच्या हायड्रो न्यूक्लियर पॉवर कंपनीने यासाठी बोली लावली होती. परंतु याची मंजूर रशियाला मिळाली. कझाकस्तानच्या अधिकार्यांनी रोसाटॉमच्या नेतृत्त्वाखालील कन्सोटियममध्ये तिन्ही कंपन्यांना याची परवानगी मिळाली आहे.
कझाकस्तानचे राष्ट्रपती कासिम-जोमार्ट तोकायेव यांनी रशिया आणि दोन्ही देशांशी संबंध चांगले असल्याचे म्हटले. परंतु रशियाने अणु प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला. यामुळे ही संधी रशियाला मिळाली.
मीडिया रिपोर्टनुसार, कझाकस्तान हा सोव्हिएत युनियनचा भाग होता.त्यावेळी सोव्हिएक अणुउर्जा प्रकल्प कझाकिस्तानमध्ये होते. परंतु १९९१ मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन झाले आणि सोव्हिएत राज्यांसह बेलारुस, युक्रेन यांनी अण्वस्त्रे बनवण्याचे काम बंद केले. यामुळे ही अणुउर्जा केंद्र बंद करण्यात आली.