
अमेरिकेत प्रवासी बसला भीषण अपघात
ग्वाटेमला भागात दरीत कोसळली बस
15 ठार तर 19 जखमी
Guatemala Bus Accident: अमेरीकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेच्या ग्वाटेमला भागात एक भीषण अपघात झाला आहे. एक प्रवासी बसचे नियंत्रण सुटल्याने ती बस दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये 15 प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 19 प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे.
खराब हवामान असल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. जखमी लोकांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात ग्वाटेमला भागात इंटर अमेरिकन मार्गावर झाला आहे. या भगात बस थेट दरीत जाऊन कोसळली. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 11 पुरुष, 3 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. बस दरीत कोसळली असल्याचे यही फोटोज देखील सोशल मिडियावर पाहायला मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात
डहाणूमध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. डहाणू येथील महालक्षी येथे तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रकच्या मध्यभागी एक कार येऊन तिहेरी अपघात घडला आहे. गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे.
Accident News: कार दोन ट्रकमध्ये अडकली अन्…; मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात
गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर महालक्ष्मी येथील उड्डाण पुलावर अपघात घडला आहे. या घटनेत कारचा चक्काचुर झाला आहे. कार दोन्ही बाजूने दोन ट्रकच्या मध्ये दाबली गेली. या घटनेत कारमधील चालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना कासा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. त्या ठिकाणी जखमी लोकांवर उपचार केले जात आहेत.