Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील अनेक कोट्यधीश आपला देश सोडून ग्रीसच्या वाटेवर; कर प्रणाली ठरतेय मुख्य कारण

ग्रीसची आणखी एक मोठी ताकद म्हणजे तेथील जीवनशैली. समुद्र, सूर्यप्रकाश, उबदार हवामान, लहान शहरासारखे वातावरण आणि इतर युरोपीय देशांशी असलेली कनेक्टिव्हिटी या सर्व गोष्टी श्रीमंत व्यक्तींना आकर्षित करतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2026 | 01:32 PM
जगातील अनेक कोट्यधीश आपला देश सोडून ग्रीसच्या वाटेवर

जगातील अनेक कोट्यधीश आपला देश सोडून ग्रीसच्या वाटेवर

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : जगभरातील अनेक कोट्यधीश आणि अब्जाधीश करदाते आता ग्रीस (अथेन्स) येथे स्थलांतरित होत आहेत. गेल्या २-३ वर्षांत या प्रवृत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. अलीकडेच, ब्रिटिश अब्जाधीश हेज फंड मॅनेजर ख्रिस रोकोस यांनी लंडन सोडल्याच्या बातमीने हा देश पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांनी आपले कर निवासस्थान ग्रीसमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

रोकोस कॅपिटल मॅनेजमेंटचे संस्थापक असलेल्या रोकोस यांनी गेल्या वर्षी यूकेमध्ये अंदाजे ३३० कोटी पाउंड (अंदाजे ४२३५ कोटी रुपये) कर भरला होता. त्यांच्या ग्रीसमधील वास्तव्यामुळे, ग्रीस श्रीमंतांसाठी इतके आकर्षक का बनत आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे. रोकोस यांचा निर्णय केवळ एका व्यावसायिकाचा नाही. तर तो श्रीमंत युरोपियन लोकांच्या बदलत्या पसंतीचा एक भाग आहे. कमी कर, चांगले हवामान, समुद्रकिनारी जीवनशैली आणि युरोपमध्ये राहण्याची सोय शोधणाऱ्यांना ग्रीस आता आकर्षित करत आहे.

पण प्रश्न असा आहे की, किती कोट्यधीश ग्रीसमध्ये स्थलांतरित होत आहेत आणि यामागे खरे कारण काय आहे? संपत्तीच्या स्थलांतरावर काम करणाऱ्या ‘हेनले अॅण्ड पार्टनर्स’ या संस्थेच्या अहवालानुसार, २०२५ पर्यंत सुमारे १२०० कोट्यधीश ग्रीसमध्ये येण्याची अपेक्षा आहे. या संख्येमुळे ग्रीसचा समावेश जागतिक स्तरावर श्रीमंत व्यक्तींना आकर्षित करणाऱ्या देशांमध्ये होतो. २०२६ च्या हेनले अहवालातही आंतरराष्ट्रीय मालमत्ता असलेल्या व्यक्तींसाठी अधिकाधिक आकर्षक ठरणाऱ्या देशांपैकी एक म्हणून ग्रीसचा उल्लेख आहे.

दरवर्षी 1 लाख युरोचा एकसमान भरू शकतात कर

ग्रीसमध्ये येणाऱ्या श्रीमंत व्यक्तींमध्ये विविध देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. ग्रीसचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ‘नॉन-डोमिसाइल टॅक्स रेसिडेन्सी प्रोग्राम’. या कार्यक्रमांतर्गत, विशिष्ट अटींची पूर्तता करणारे नवीन परदेशी कर रहिवासी त्यांच्या परदेशी उत्पन्नावर दरवर्षी १ लाख युरोचा एकसमान कर भरू शकतात.

केवळ करच नव्हे, तर ग्रीसमधील जीवनशैलीही आकर्षक

ग्रीसची आणखी एक मोठी ताकद म्हणजे तेथील जीवनशैली. समुद्र, सूर्यप्रकाश, उबदार हवामान, लहान शहरासारखे वातावरण आणि इतर युरोपीय देशांशी असलेली कनेक्टिव्हिटी या सर्व गोष्टी श्रीमंत व्यक्तींना आकर्षित करतात. ग्रीस हा एक व्यवहार्य पर्याय बनत आहे, विशेषतः लंडनसारख्या महागड्या आणि गजबजलेल्या शहरांपासून विश्रांती घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी. शिवाय, ग्रीसमध्ये गोल्डन व्हिसा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत, काही विशिष्ट परदेशी गुंतवणूकदार ठराविक अटींनुसार गुंतवणूक करून रहिवासी दर्जा मिळवू शकतात.

BRICS Summit 2026 : इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच

Web Title: Many multimillionaires from around the world are leaving their countries and heading to greece

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Greece
  • international news

संबंधित बातम्या

Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण
1

Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण

Greece : करोडोंचे मालक ब्रिटन सोडून ग्रीसमध्ये का जात आहेत? जाणून घ्या कर सवलत अन् लक्झरी जीवनशैलीचे मुख्य रहस्य
2

Greece : करोडोंचे मालक ब्रिटन सोडून ग्रीसमध्ये का जात आहेत? जाणून घ्या कर सवलत अन् लक्झरी जीवनशैलीचे मुख्य रहस्य

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
3

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Delhi Building Collapse: Big Breaking!!! राजधानीत मोठी दुर्घटना! 5 मजली इमारत अचानक कोसळली; ५० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली
4

Delhi Building Collapse: Big Breaking!!! राजधानीत मोठी दुर्घटना! 5 मजली इमारत अचानक कोसळली; ५० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.