Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-UkraineWar: ट्रम्पच्या निर्णयामुळे युद्धाला फुटले तोंड! युक्रेनचा रशियन तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ला; मॉस्कोचे इंधन संकट गडद

Ukraine Drone Strike:युक्रेनने रशियन तेल डेपो आणि टँकरवर ड्रोन हल्ले करून रशियामधील इंधन संकट अधिकच गंभीर केले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे तयार करण्याचा परवाना देण्याचे आश्वासन दिले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 10, 2026 | 01:45 PM
ukraine drone strike on russia oil depots trump patriot missile license fuel crisis

ukraine drone strike on russia oil depots trump patriot missile license fuel crisis

Follow Us
Follow Us:
  • युक्रेनचा तीव्र ड्रोन हल्ला
  • ट्रम्प यांचा मोठा निर्णय
  • रशियाचा गंभीर इशारा

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) आता एका अत्यंत धोकादायक आणि आक्रमक टप्प्यावर पोहोचले आहे. नाटो शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला शक्तिशाली ‘पॅट्रियट’ (Patriot Missile System) हवाई संरक्षण प्रणालीची देशांतर्गत निर्मिती करण्याचा परवाना देण्याची घोषणा करताच, युद्धाची ठिणगी अधिकच भडकली आहे. या निर्णयानंतर अवघ्या २४ तासांत युक्रेनने रशियाच्या हद्दीत घुसून त्यांचे ऊर्जा प्रकल्प आणि तेलवाहू जहाजांवर भीषण ड्रोन हल्ले चढवले आहेत. या हल्ल्यांमुळे रशियातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे प्रचंड संकट निर्माण झाले आहे.

रशियन तेल प्रकल्पांवर युक्रेनचा अचूक निशाणा

युक्रेनियन ड्रोननी गुरुवारी रशियाच्या अंतर्गत भागातील तेल साठ्यांना लक्ष्य केले. पश्चिम रशियातील त्हेर (Tver) शहरातील एका मोठ्या तेल डेपोला ड्रोन हल्ल्यानंतर भीषण आग लागली. तसेच, दक्षिण स्टावरोपोल प्रदेशातील व्याझ्निकी येथील तेल साठ्यामध्ये झालेल्या प्रचंड स्फोटामुळे प्रशासनाला जवळील निवासी इमारतींमधील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे लागले.

एवढेच नव्हे तर, युक्रेनने अझोवच्या समुद्रात (Sea of Azov) रशियाची दोन मोठी तेलवाहू जहाजे (Oil Tankers) ड्रोनद्वारे उद्ध्वस्त केली. या सागरी हल्ल्यामुळे रशियाचा इंधन पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्हलोडिमिर झेलेन्स्की यांनी या कारवाईचे समर्थन करताना म्हटले की, “हे रशियावरील ‘दूरगामी आर्थिक निर्बंध’ आहेत. रशियाने युद्ध न थांबवल्यास युद्धाचे चटके त्यांना त्यांच्या घरात बसून सोसावे लागतील.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi: ऑस्ट्रेलियन महिला कॅमेरामनच्या ‘अशा’ इशाऱ्याने पंतप्रधान मोदींनाही लावले मागे वळायला; ‘या’ मजेदार प्रसंगाचा VIDEO VIRAL

रशियात पेट्रोलचे रेशनिंग; वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा

युक्रेनच्या या धोरणात्मक हल्ल्यांमुळे रशियामध्ये इंधनाचे मोठे संकट (Fuel Crisis) उभे राहिले आहे. रशियाच्या अनेक प्रांतांमध्ये पेट्रोलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, इंधनाचे रेशनिंग सुरू करण्यात आले आहे. रशियन वाहनचालकांना आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. या हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी मॉस्कोने युक्रेनच्या कीवसह १३ प्रमुख ठिकाणांवर लांब पल्ल्याचे ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला, ज्यामध्ये युक्रेनचेही मोठे नुकसान झाले आहे.

As of this morning, the oil depot in Russia’s Tver is still burning following yesterday’s drone strike. https://t.co/oUPL0pCYdY pic.twitter.com/NqlaLX9i6V — Anton Gerashchenko (@Gerashchenko_en) July 10, 2026

credit – social media and Twitter

डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘पॅट्रियट’ गेमचेंजर निर्णय

तुर्की येथील नाटो शिखर परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली बनवण्याचा अधिकृत परवाना (Production License) देण्याचे जाहीर केले. ट्रम्प म्हणाले, “आम्ही युक्रेनला स्वतःचे पॅट्रियट क्षेपणास्त्र तयार करण्याचा अधिकार देत आहोत, जेणेकरून ते रशियन क्षेपणास्त्रांचा अचूक वेध घेऊ शकतील.”

पॅट्रियट ही जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणाली मानली जाते, जी रशियन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्यास सक्षम आहे. मात्र, बोईंग आणि एल३हॅरिस सारख्या जागतिक कंपन्यांकडून सुट्या भागांचा पुरवठा होण्यास वेळ लागणार असल्याने, युक्रेनमध्ये याचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्यास काही महिने किंवा वर्षभराचा कालावधी लागू शकतो, असे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ebola Crisis Congo : काँगोत इबोलाचा उद्रेक! 1,700 हून अधिक बाधित, 625 जणांचा मृत्यू; युगांडातही पसरला प्रादुर्भाव

क्रेमलिनचा थेट इशारा: युद्ध आणखी भडकणार!

ट्रम्प यांच्या या भूमिकेवर रशियाने तीव्र आक्षेप घेतला आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी इशारा दिला की, “अमेरिकेचा हा निर्णय युद्धाची आग अधिक भडकावणारा आहे. जर युक्रेनकडून असे हल्ले वाढत राहिले, तर रशियाला युक्रेनच्या हद्दीत एक मोठा ‘सुरक्षा क्षेत्र’ म्हणजेच बफर झोन तयार करावा लागेल.” तसेच लष्करी दबावामुळे शांतता प्रस्थापित होणार नाही, तर युद्ध अधिक काळ लांबेल, असेही रशियाने स्पष्ट केले.

Web Title: Ukraine drone strike on russia oil depots trump patriot missile license fuel crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia and Ukraine war update
  • Russia Ukraine War

संबंधित बातम्या

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा
1

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ
2

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ

Korean Peninsula: ट्रम्प यांचे प्रयत्न निष्फळ? उत्तर कोरिया आक्रमक; US-South Korea लष्करी सरावावरून दिला थेट युद्धाचा इशारा
3

Korean Peninsula: ट्रम्प यांचे प्रयत्न निष्फळ? उत्तर कोरिया आक्रमक; US-South Korea लष्करी सरावावरून दिला थेट युद्धाचा इशारा

Iran Mocked Trump: ‘7000 मैल दूर बसून स्वप्ने पाहू नका’; होर्मुझ सामुद्रधुनीवरील ट्रम्प यांच्या दाव्याची इराणकडून उघडपणे खिल्ली
4

Iran Mocked Trump: ‘7000 मैल दूर बसून स्वप्ने पाहू नका’; होर्मुझ सामुद्रधुनीवरील ट्रम्प यांच्या दाव्याची इराणकडून उघडपणे खिल्ली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.