Mark Zuckerberg big claim on Joe Rogan podcast saying 'Was almost sentenced to death in Pakistan’
एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी पाकिस्तानने त्यांच्या विरोधात चाललेल्या एका प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी जो रागनच्या पॉडकास्ट दरम्यान हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानात त्यांच्या विरोधात फाशीची शिक्षेची मागणी करण्यात आली होती. यामुळे त्यांचा आता पाकिस्तानला जाण्याचा कोणताही विचार नाही. त्यांच्या या खुलास्याने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे.
या कारणामुळे फाशीच्या शिक्षेची झाली होती मागणी
मार्क झुकरबर्ग यांनी या प्रकरणाबद्दल सांगताना म्हटले की, काही देशांमध्ये असे कायदे आहेत, जे त्यांना मान्य नाहीत. उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, फेसबुकवर एकाने पैगंबर मोहम्मद यांचे चित्र शेअर केले होते. तर याविरोधात या ईशनिंदा म्हणत पाकिस्तानने मार्क झुकरबर्ग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये झुकरबर्ग यांच्या फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली.
I was almost sentenced to death in #Pakistan because someone on Facebook posted a picture of the Prophet Mohammad and that’s Blasphemy, and I don’t plan to go to Pakistan, says Facebook’s CEO Mark Zuckerberg.#BlasphemyLaw pic.twitter.com/kXBntmHwXf
— Geo Political Updates (@GeoPolUpdates) February 12, 2025
वैयक्तिक सुरक्षा धोक्यात
पॉडकास्ट दरम्यान झुकरबर्ग यांनी सांगितले की, या घटनेनंतर त्या देशात परिस्थाती खूप चिंताजनक झाली होती. यामुळे त्यांची वैयक्तिक सुरक्षा देखील धोक्यात आली होती. मात्र, आता हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचले आहे याबद्दल माहिती नाही आणि आता झुकरबर्ग यांनी कोणतीही विशेष चिंता नाही. त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानला जाण्याचा आता त्यांच्या कोणताही विचार नाही.
तंत्रज्ञान कंपन्यांवर सरकारी दबाव
याशिवाय, पॉडकास्टमध्ये मार्क झुकरबर्ग यांनी जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांवर वाढत्या सरकारी दबावाविषयी देखील भाष्य केले. त्यांनी म्हटले की, जगातील अनेक देशांमध्ये असे कायदे आहेत, जे अभिव्यक्त स्वातंत्र्याच्या मूलभूत मूल्यांशी सुसंगत नाहीत. काही देश आपल्या मर्जीप्रमाणे कंटेंट हटविण्यास भाग पाडतात, कारण त्यांच्या मते अशा गोष्टी समाजासाठी चुकीच्या असतात. याविषयी बऱ्याच लोकांची मते वेगवेगळी आहेत.
जर सरकारने तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली तर हे अयोग्य ठरेल असे त्यांनी म्हटले. अमेरिकन सरकारने या प्रकरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि परदेशांमध्ये तंत्रज्ञान कंपन्यांना संरक्षण देणअयासाठी पावले उचलली पाहिजेत असेही, मार्क यांनी म्हटले. झुकरबर्ग यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा तंत्रज्ञान कंपन्यांवरील सरकारी दबावाचे प्रश्न पुढे आले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- शांतता करार फक्त नावालाच; चर्चेपूर्वीच झाला युक्रेनवर मिसाइल हल्ला