संयुक्त राष्ट्र : गेल्या दोन दशकातील माहितीच्या आधारावर जगात पुन्हा एकदा गोवर(measles) हा आजार डोके वर काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)(WHO) गंभीर इशाराही दिला आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार २०१९ मध्ये गोवरमुळे २ लाख नागरिक मृत्यूच्या दाढेत गेले आहेत. एवढेच नव्हे तर गेल्या दोन दशकात या आजाराच्या सर्वाधिक रुग्णांची नोंदही झाली आहे. हा आजार नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांवर करण्यात आलेल्या उपाययोजनांवर आता वाढत्या रुग्णसंख्येमुळे पाणी फेरले असल्याचेही दिसून येत आहे. डब्ल्यूएचओ आणि सीडीसीच्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षात लसीकरण ठप्प झाले असल्यानेच या आजारात वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
२०१९ मध्ये आजारामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येत घट नोंदविण्यात आली होती. २०१९ च्या आकडेवारीनुसार ५० टक्के रुग्णसंख्या वाढलेली दिसून येते. अहवालातील माहितीनुसार, वाढती प्रकरणे एक विशिष्ट देश वा विशिष्ट भागात नोंदविण्यात आले नसून जवळपास प्रत्येक देशात प्रकरणे वाढली आहेत. जगभरात गोवर आजाराचे साडेआठ रुग्ण आहेत. जागतिक महामारी कोविड-१९ मुळे जगातील विविध आजार रोखण्यासाठी जे लसीकरण केले जाते त्याचा वेग मंदावला असल्यामुळेच जुने आजार पुन्हा डोके वर काढत असल्याचे म्हटले आहे.
डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार कोविड-१९ मुळे लसीकरणाचा वेग मंदावला असून २६ देशातील जवळपास ९ कोटींपेक्षा अधिक लोकांना या आजाराने विळखा घातला आहे. काही देशांमध्ये गोवरने पुनश्च डोके वर काढल्याचे दिसत आहे. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, जॉर्जिया, समोआ, युक्रेन, कांगो, मैदागास्कर, उत्तर मॅसेडोनियासह अन्य मोठ्या देशांमध्येही या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरीएटा फोर यांनी गोवर आणि कोविड-१९ चा धोका अद्यापही टळलेला नाही याकडे लक्ष वेधले. जागतिक महामारीमुळे अन्य आजारांविरोधात लढा देण्यात अडचणी उद्भवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गोवर आजारावर उपचार आहे परंतु जोपर्यंत ९५ टक्के मुलांचे लसीकरण केले जात नाही तपोर्यंत त्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य आहे असेही हेनरीएटा म्हणाल्या.
सन २००० पासून आजवर गोवर प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे अडीच कोटी लोकांना वाचविण्यात यश आले आहे. तथापि मर्यादित प्रमाणात वॅक्सीन असल्यामुळे दरवर्षी हजारो मुले या आजाराला बळी पडत आहेत. त्यामुळेच आजार पसरण्यास सुरुवात होते. २०१९मध्ये अशी प्रकरणे समोर येताच पूर्वी मिळविलेले यशही झाकोळले गेले आहे. बहुतांश देशातील आरोग्य यंत्रणा ढेपाळल्या असल्याचे निदर्शनास आल्यामुळेही गोवर लसीकरण ठप्प झाले आहे. यासोबतच काही देश वॅक्सीनचा शोध घेण्याबाबत माघारही घेत असल्याबाबत अहवालात नमूद करण्यात आले आहे.
[read_also content=”कमला हॅरिस यांच्या पतीने नोकरी सोडण्याचा घेतला निर्णय, पत्नीला करणार मदत https://www.navarashtra.com/latest-news/kamala-harris-husband-took-decision-to-leave-job-for-his-wife-52754.html”]






