पुणे मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद (फोटो- सोशल मिडिया)
एकेकाळी विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर असलेले पुणे आज देशाचे प्रमुख आयटी आणि औद्योगिक केंद्र बनले आहे. मात्र, वाढत्या वाहनसंख्येमुळे हिंजवडी आयटी पार्क आणि मध्यवर्ती भाग यांदरम्यान होणारी वाहतूक कोंडी हा नागरिकांसाठी रोजचाच मनस्ताप ठरला होता. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका सुरू झाल्यानंतर हजारो आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुकर झाला आहे.
दिवाळीनिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बाजारपेठांमध्ये कपडे, मिठाई आणि भेटवस्तूंच्या खरेदीसाठी मोठी लगबग होती. सणासुदीच्या काळात खासगी वाहने घेऊन बाजारपेठ गाठताना वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होतो. मात्र, यंदा दिवाळीच्या तोंडावरच ‘पुणेरी मेट्रो’ सुरू झाल्याने हिंजवडी, माण परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कार्यालयीन प्रवासाबरोबरच दिवाळी खरेदी, नातेवाइकांच्या भेटीगाठी आणि कुटुंबासह फेरफटक्यासाठी नागरिकांनी खाजगी वाहनांऐवजी मेट्रोला पसंती दिली.
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील महिलांचा लक्षणीय सहभाग. या मार्गिकेवर सुमारे ९० महिला ट्रेन पायलट मेट्रोचे सारथ्य करत असून, प्रकल्पातील एकूण मनुष्यबळापैकी ५० टक्के कर्मचारी महिला आहेत. यामुळे या मार्गिकेला ‘पिंक मेट्रो’ म्हणूनही नवी ओळख मिळाली आहे. महिला प्रवाशांमध्ये सुरक्षित, आरामदायी आणि आत्मनिर्भर प्रवासाबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेचा संगम
केवळ वेगवान प्रवासच नव्हे, तर पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सुविधा हे पुणेरी मेट्रोचे बलस्थान ठरले आहे:
हरित ऊर्जा: प्रकल्पातील एक-तृतीयांश वीजपुरवठा सौर ऊर्जेच्या माध्यमातून केला जात आहे.
एकात्मिक सुविधा: स्थानकांवर ईव्ही चार्जिंग सुविधा, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि अत्याधुनिक सीबीटीसी (CBTC) सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
प्रवासीभिमुख रचना: आयटी कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी इन्फोसिस कंपनीशी जोडणारा थेट फूट ओव्हर ब्रिज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुपदरी उड्डाणपूल यांमुळे वाहतूक अधिक गतिमान झाली आहे.
पुणेरी मेट्रोचा ८ दिवसांचा प्रवासी आलेख (पीएमआरडीए आकडेवारीनुसार)
Narendra Modi : 2014 मध्ये 5 शहरांमध्ये मेट्रो; आता 26 शहरांपर्यंत विस्तार, पंतप्रधान मोदींची माहिती
दिनांक प्रवासी संख्या
०४ नोव्हेंबर ४८,६७९
०५ नोव्हेंबर ४०,३२९
०६ नोव्हेंबर ३४,६४७
०७ नोव्हेंबर ३४,२४३
०८ नोव्हेंबर १८,९०८
०९ नोव्हेंबर. ३२,९७९
१० नोव्हेंबर ३०,६९९
११ नोव्हेंबर २६,०७४
एकूण प्रवासी संख्या २,६६,५५८
ठळक चौकट : दिवाळी सुट्ट्यांमध्ये पुणे मेट्रोलाही मोठी पसंती
पुणे मेट्रोसोबतच महामेट्रोच्या पुणे मेट्रो मार्गिकांनाही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. ५ ते ११ नोव्हेंबर या सात दिवसांच्या कालावधीत पुणे मेट्रोतून एकूण १२ लाख १३ हजार ८६८ प्रवाशांनी प्रवास केला असून, या माध्यमातून प्रशासनाला १ कोटी ८६ लाख ३० हजार ९५१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
Ans: ४ ते ११ नोव्हेंबर या आठ दिवसांत तब्बल २ लाख ६६ हजार ५५८ प्रवाशांनी प्रवास केला.
Ans: ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो लाइनचे लोकार्पण झाले.






