Mexican Crude Oil Company Searching For Market
मेक्सिको सिटी: डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोतून आयात होणाऱ्या उत्पादनांवर 25% टक्के कर लागू केला आहे. मात्र. याचा सर्वात जास्त फटका मेक्सिकोच्या तेल उत्पादन कंपन्यांना बसला आहे. मेक्सिको सरकारच्या मालकीची पेमेक्स तेल कंपनी ही जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे या कंपनीने तेलाच्या विक्रिसाठी नवीन बाजारपेठा शोधण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी या कंपनीचे कच्चे तेल अमेरिकेत निर्यात केले जात होते.
आशिया आणि युरोपमधील बाजारपेठांकडे मेक्सिकोचे लक्ष्य
सध्या चॅरिफमुळे ही कंपनी आता आशिया आणि युरोपमध्ये खरेदीदारांशी चर्चा करत आहे. पेमेक्स कंपनीचे 57% कच्चे तेल पूर्वी मेरिकेत निर्यात करण्यात येत होते. मात्र, जानेवारीच ही निर्यात 44% घसरलीआणि प्रतिदिन 5332,404 वर आली असून ही अत्तापर्यंतच्या दशकांतील सर्वात कमी किंमत आहे. या परिस्थितीमुळे मेक्सिको आशिया आणि युरोपमधील नवीन बाजारपेठांकडे लक्ष ठेवून आहे. त्यांचे मुख्य लक्ष्य भारत आणि दक्षिम कोरियासारख्या देशांकडे आहे.
युरोप आणि आशियाई देशात कच्चे तेल निर्यातीची योजना
पेमेक्स कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंनी आता चीन, भारत, दक्षिण कोरिया आणि युरोपमधील संभाव्य खरेदीदारांशी चर्चा करत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, चीनसोबतच्या चर्चांना यश आले असून आता कंपनी आशियाई देशांशा जड कच्चा तेलाच्या चर्चेसाठी वळत आहे. पेमेक्स पंनीचे कच्चे तेले रिफानरीज प्रक्रियेसाठी आशियात उत्तम मानले जाते. म्हमून आशिया आणि अमेरिकेने खरेदी केलेले कच्चे तेल आशियाई देशांमध्ये निर्यात केले जाण्याची योजना आहे.
कोणतीही सवलत नाही
टॅरिफमुळे पेमेक्सने आपल्या अमेरिकन ग्राहकांना कोणतीही सवलत देण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी करार संपल्यानंतर शिपमेंट आशिया आणि युरोपात पाठवले जाणार आहे. पेमेक्सच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, स्पर्धात्मक राहण्यासाठी कोणत्याही नवीन सवलती देण्यात येणार नाहीत.
मेक्सिको पुढील आव्हाने
मेक्सिको हा कच्च्या तेलाचा एक मोठ्या आणि प्रमुख उत्पादकापैंकी एक आहे. मात्र, त्यांच्या जुन्या तेल क्षेत्रांमध्ये विशेष करुन मेक्सिकोच्या आखातातील क्षेत्रांमध्ये उत्पादनात घट झाली आहे. तसेच तेलाची शुद्धीकरण प्रणाली देखील अडचणीत आहे. नवीन 3 लाख 40 हजार BDP क्षमतेच्या ओल्मेका रिफायनरीच्या विलंबामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. मेक्सिको सध्या कच्चे तेल निर्यात करत असून पेट्रोल आण डिझेल आयात करत आहे. यातील बहुतांशा आयात अमेरिकेतून होत आहे. यामुळे मेक्सिको समोर तेल उद्योग सुरळित करण्यासाठी नवीन बाजारपेठांची आवश्यकता आहे.