गेल्या वर्षभरात इस्त्रायल-हमास युद्धात हजारो लोक मारले गेले; जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी
नवी दिल्ली: सध्या इराण-इस्त्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे. तसेच इस्त्रायल हिजबुल्लाहवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. तर दुसरीकडे गाझामध्ये हमासविद्ध युद्ध सुरू आहे. तर आज 7 ऑक्टोबरच्या रात्री हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ले केले होते. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेल तर 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतरच इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाले. गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाली. गाझामध्ये अनेक पॅलेस्टिनी नागरिक प्रमुख शहरांमध्ये एकत्र आले आहेत. गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांनी युद्धबंदीची मागणी केली आहे. आज आपण याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
इस्त्रायल-हमास युद्धास कशी सुरूवात झाली?
इस्त्रायल आणि हमास यांच्यात गेल्या वर्षभरापासून युद्ध सुरू असून या युद्धात 41,825 लोक मारले गेले आहेत. याची माहिती हमास संचलित गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिली. हा संघर्ष सुरू झाल्यापासून लाखो लोक बेघर झाले. हमासने इस्त्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्याचे इस्त्रायलने चोख प्रत्युत्तर दिले. हमासने इस्त्रायलवर हल्ले करून सीमांचे उल्लंघन केले आणि इस्त्रायली समुदायंवर आक्रमण केल यामुळे या युद्धास सुरूवात झाली. तसेच एका वर्षापासून गाझामध्ये 100 लोकांना ओलीस ठेवण्यात आले आहे.
या युदधामुळे पश्चिम आशियातील बदलेली परिस्थिती
इस्त्रायलचे गाझामध्ये हल्ले सुरू असतानाच लेबनॉनमध्ये संघर्ष सुरू झाला. इस्त्रायलने सीरिया, इराक आणि येमेनवरही हल्ले केले. त्यामुळे अनेक देशांची चिंता वाढली होती. इस्त्रायल-हमासच्या युद्धानंतर पश्चिम आशियातील परिस्थिती बदलली आहे. इस्त्रायलने गाझा, लेबनॉनमधील बेरूतवर अनेक हवाई हल्ले केले. तसेच त्यांनी हिजबुल्लाहच्या अनेक प्रमुखांची हत्या देखील केली. सध्या इराण-इस्त्रायल संघर्ष वाढला असून इस्त्रायल इराणच्या अनेक भागांवर हल्ले करत आहे.
अनेक ठिकाणी युद्धबंदीच्या मागणी साठी लोक रस्त्यावर
इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाल्या नंतर 40 हजार पॅलेस्टिनी समर्थकांनी देखील युद्धबंदीची मागणी केली आहे. पॅलेस्टिनी समर्थकांनी गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांवर होणारे हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पॅरिस, रोम, मनिला केपटाऊन आणि इतर अनेक शहरांमध्ये देखील मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. भारतानेही पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. इस्रायली पीडितांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात अनेक लोकांनी पुढे केला आहे.
नेत्याहून सरकारबद्दल पीडितांसामध्ये नाराजी
आजच्या दिवशी एका वर्षापूर्वी झालेल्या इस्त्रायलवरील हल्ले सुरक्षा यंत्रणांच्या अपयश होते असे इस्त्रायली आणि जगभरातील लोकांचे म्हणणे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर विभागाच्या प्रमुखाने राजीनामा दिला असून हल्ल्यानंतर लगेचच युद्ध सुरू झाल्यामुळे, अपयशासाठी जबाबदार असलेल्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे युद्धात पीडित झालेल्या लोकांमध्ये नेतान्याहू सरकारबद्दल नाराजी आहे. आजच्या दिवशी युद्धातील पीडितांसाठी अनेक संबंधित कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. पण 7 ऑक्टोबर हा देशाच्या 76 वर्षांच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता असे मानले जात आहे. सध्या तिसरे महायुद्ध सुरू होण्याची धग वाढली आहे.