Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War: ‘खामेनेई परत आले?’ इराणच्या ‘त्या’ AI व्हिडिओने अमेरिकेचे धाबे दणाणले; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल!

इराणमध्ये आतापर्यंत किमान १,३५० नागरिकांचा मृत्यू झाला असून १७,००० हून अधिक लोक जखमी झाल्याची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यांमध्ये १,१०० चिमुकल्यांचा समावेश आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 13, 2026 | 02:30 PM
Middle East War, Iran Vs USA, Khamenei Is Back, Viral Video,Israel War,

Middle East War, Iran Vs USA, Khamenei Is Back, Viral Video,Israel War,

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकन हल्ल्यात एक इमारत जमीनदोस्त होते.
  • डोनाल्ड ट्रम्प यांना खामेनेईंच्या मृत्यूची बातमी दिली जाते, ज्यामुळे ते आनंदी होतात.
  • मात्र, ढिगाऱ्यातून खामेनेईंचे प्रतीक असलेली अंगठी घातलेला हात बाहेर येतो आणि इराणचा ध्वज फडकतो.
  • खामेनेईंच्या एका इशाऱ्यावर अमेरिकेच्या दिशेने शेकडो क्षेपणास्त्रे झेपावताना दाखवली आहेत.

 

Khamenei Is Back.. Viral Video : मध्य-पूर्वेतील इराण-इस्त्रायल- अमेरिकेत सुरु असलेल्या युद्ध दिवसेंदिवस अधिकच भयानक वळणावर चालले आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला करत इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनेई यांच्या ठिकाणांवर हल्ला करत त्यांची हत्या केली. (US-Israel Iran War) आज युद्धाचा १४ दिवस आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेने खामेनेई यांची हत्या केल्यानंतर आज इराणकडून सोशल मीडियावर एक एआय व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये Khamenei Is Back… असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, या व्हिडीओमध्ये हल्ल्यांचेही काही दृश्य दाखवण्यात आली आहे. चारही बाजूंनी हल्ले आणि युद्धाची परिस्थिती दिसत आहे. इराणमधील एका इमारतीवर अमेरिकेकडून क्षेपणास्त्र हल्ला होताना दिसत आहे. या हल्ल्यात ही इमारत पूर्णपणे जमीनदोस्त होते. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर एक माणूस येतो आणि ‘खामेनेई इज डेड…’ असे सांगतो. त्याचे शब्द ऐकून ट्रम्प आनंदी होताना दिसत आहेत. पण पुढच्याच वेळी हल्ल्याच्या ठिकाणी एक माणूस पोहचल्याचे दिसते. तो खामेनेईंचे प्रतिक असलेली अंगठी घालताना दिसतो. तिथे इराणचा ध्वजही फडकावल्याचे दिसते. त्यानंतर खामेनेई हा ध्वज हातात धरतात आणि युद्धाच्या दिशेने इशारा करतात. इशारा करताच अमेरिकेच्या दिशेने इराणकडून शेकडो क्षेपणास्त्रे सोडली जातात. असे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.  काही जण या व्हिडिओला प्रचार म्हणत आहेत, परंतु इराणी माध्यमांनी त्याला “खामेनेई परत आले आहेत” असे शीर्षक दिले  आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर इस्रायलने पहिल्यांदाच पश्चात्ताप व्यक्त केला आहे आणि नवीन सर्वोच्च नेते यांना मारण्याची धमकी देखील दिली आहे.

War Update: अमेरिकेने इराणचा न्यूक्लियर प्रोग्रॅम मुळापासून उपटला? ‘Taleghan-2’ वर महाविनाशक हल्ला; शास्त्रज्ञही संपवले

मध्य-पूर्वेतील युद्ध भीषण वळणावर पोहोचले असून, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. अमेरिकेने इराणविरुद्ध प्रथमच १५ टन वजनाचे विनाशकारी बॉम्ब वापरून हल्ले केले आहेत. दुसरीकडे, इराणच्या ‘आयआरजीसी’ने (IRGC) इराकमध्ये अमेरिकन तेल टँकरवर समुद्री ड्रोनने यशस्वी हल्ला केल्याचा दावा केला आहे. (Iran Taleghan-2)

इराणमध्ये आतापर्यंत किमान १,३५० नागरिकांचा मृत्यू झाला असून १७,००० हून अधिक लोक जखमी झाल्याची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यांमध्ये १,१०० चिमुकल्यांचा समावेश आहे. इस्रायलमध्ये इराणी क्षेपणास्त्रांनी तेल अवीव, हैफा, बेत शेमेश आणि बेरशेबा या शहरांना लक्ष्य केले. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक जखमी झाले आहेत. तर इस्रायलने लेबनॉनवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. तिथे ६८७ लोकांचा बळी गेला आहे. यूएनएचसीआर (UNHCR) च्या अहवालानुसार, या युद्धामुळे इराणमध्ये सुमारे सव्वा तीन लाख लोक विस्थापित होण्याची भीती आहे. दरम्यान, इराणी माध्यमांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये ‘Khamenei Is Back…’ असा संदेश देत इस्रायलला इशारा दिला आहे.

🚨 BREAKING: Iranian media released anime-style footage said to depict the final moments of former Iranian Supreme Leader Ali Khamenei before his assassination. pic.twitter.com/QNnQkjMLKI — The Middle East (@A_M_R_M1) March 12, 2026

नेतन्याहूंचा इराणला कडक इशारा

पश्चिम आशियातील युद्ध भडकलेले असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराण आणि हिजबुल्लाहला थेट इशारा दिला आहे. “इराण आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, दोन आठवड्यांच्या बॉम्बफेकीमुळे तेहरानच्या ‘रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स’चे (IRGC) कंबरडे मोडले आहे,” असे प्रतिपादन त्यांनी आपल्या पहिल्या युद्धकालीन पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदेत इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्ताबा खामेनेई आणि हिजबुल्लाह प्रमुख नैम कासेम यांच्याबद्दल विचारले असता नेतन्याहू यांनी सूचक विधान केले. ते म्हणाले, “मी कोणत्याही दहशतवादी नेत्यासाठी कोणतीही ‘जीवन विमा पॉलिसी’ (Life Insurance Policy) जारी करणार नाही. आमच्या पुढील योजना काय आहेत, हे मी जाहीर करणार नाही, पण हल्ले सुरूच राहतील.”

 

 

Web Title: Middle east war has khamenei returned that iranian ai video sends shockwaves through the us goes massively viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • World War 3

संबंधित बातम्या

War Update: इराणचा अजेय किल्ला! मोहम्मद अली जाफरी यांची ‘Mosaic Defense System’ एक घातक चक्रव्यूह; ज्यात अडकलं अमेरिकन सैन्य
1

War Update: इराणचा अजेय किल्ला! मोहम्मद अली जाफरी यांची ‘Mosaic Defense System’ एक घातक चक्रव्यूह; ज्यात अडकलं अमेरिकन सैन्य

War Update: अमेरिकेने इराणचा न्यूक्लियर प्रोग्रॅम मुळापासून उपटला? ‘Taleghan-2’ वर महाविनाशक हल्ला; शास्त्रज्ञही संपवले
2

War Update: अमेरिकेने इराणचा न्यूक्लियर प्रोग्रॅम मुळापासून उपटला? ‘Taleghan-2’ वर महाविनाशक हल्ला; शास्त्रज्ञही संपवले

फक्त इराणच नाहीतर जगातील अनेक देशांना बसतोय युद्धाचा फटका; तेल, गॅस पुरवठ्यावर होणार मोठा परिणाम
3

फक्त इराणच नाहीतर जगातील अनेक देशांना बसतोय युद्धाचा फटका; तेल, गॅस पुरवठ्यावर होणार मोठा परिणाम

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न; अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष
4

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न; अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.