Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War: इस्रायलवर 100 रॉकेटचा काळजाचा थरकाप उडवणारा पाऊस; हिजबुल्लाच्या हल्ल्यात नाहारिया हादरलं

Middle East War : हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर १०० रॉकेट डागले असून, त्यामुळे लेबनॉनच्या सीमेवर युद्ध पेटले आहे. या ताज्या हल्ल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. याबबत जाणून घ्या सविस्तर.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 27, 2026 | 11:35 AM
Iran-US War : इराण-अमेरिका युद्ध अद्यापही थांबेनाच ! इराणने अमेरिकेचे आणखी दोन जेटसह हेलिकॉप्टरही पाडले

Iran-US War : इराण-अमेरिका युद्ध अद्यापही थांबेनाच ! इराणने अमेरिकेचे आणखी दोन जेटसह हेलिकॉप्टरही पाडले

Follow Us
Follow Us:
  • हिजबुल्लाचा रॉकेट वर्षाव
  • इस्रायली सैन्याची आगेकूच
  • जागतिक ऊर्जा संकट

Hezbollah rocket attack on Israel March 2026 : मध्य-पूर्वेतील युद्धाची (US-Israel Iran War) धग आता दिवसेंदिवस अधिकच भीषण होत चालली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने आधीच जगाची झोप उडवली असताना, आता लेबनॉन सीमेवर हिजबुल्ला आणि इस्रायली सैन्य यांच्यात ‘आर-पार’ची लढाई सुरू झाली आहे. शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी हिजबुल्लाने उत्तर इस्रायलच्या दिशेने तब्बल १०० रॉकेट डागून संपूर्ण प्रदेशात घबराट निर्माण केली आहे. या हल्ल्यांमुळे इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजत असून नागरिक जीव मुठीत धरून बंकरमध्ये आश्रय घेत आहेत.

नाहारिया शहरात रक्ताचा सडा: एकाचा मृत्यू, अनेक जखमी

उत्तर इस्रायलमधील नाहारिया हे शहर हिजबुल्लाच्या रॉकेट हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य ठरले. आकाशातून पडणाऱ्या आगीच्या गोळ्यांनी एका क्षणात नागरी वस्त्यांचे रूपांतर युद्धभूमीत केले. अल जझीराच्या वृत्तानुसार, या भीषण हल्ल्यात एका सामान्य नागरिकाचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवळ नाहारियाच नाही, तर सीमेजवळील अनेक गावांमध्ये रॉकेट कोसळल्याने मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : युद्धविराम म्हणजे आत्महत्या! Saudi Arabia आणि UAE आता थेट मैदानात; अमेरिकेला दिलं विनाशाचं निमंत्रण

लेबनॉन सीमेवर इस्रायली रणगाडा उद्ध्वस्त

इस्रायली सैन्य सध्या दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे सरकत आहे. मात्र, हिजबुल्लाच्या लढवय्यांनी गनिमी काव्याने इस्रायली सैन्याला रोखण्याचा प्रयत्न केला. एका रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राने इस्रायली रणगाड्याला थेट लक्ष्य केले. या स्फोटात एक इस्रायली सैनिक ठार झाला असून इतर दोन सैनिक जखमी झाले आहेत. इस्रायली सैन्याने याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले सुरू केले असून परिसरात धुराचे लोट दिसत आहेत.

It’s 1:30 AM, and Hezbollah just fired rockets from Lebanon towards Tel Aviv and other cities in Central Israel, aiming to kill innocent families as they sleep. Hezbollah must be destroyed. pic.twitter.com/0Km1zPW56U — Vivid.🇮🇱 (@VividProwess) March 25, 2026

credit – social media and Twitter

इराण युद्धाचा चौथा आठवडा: जगाचं कंबरडं मोडणार?

हे युद्ध केवळ इस्रायल आणि लेबनॉनपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. २८ फेब्रुवारी रोजी जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आणि अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा खात्मा केला, तेव्हापासून या विनाशाच्या खेळाला सुरुवात झाली. आज या युद्धाचा चौथा आठवडा आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल अमेरिकेचे लष्करी तळ आणि आखाती देशांतील तेल साठ्यांना लक्ष्य केल्यामुळे जागतिक स्तरावर इंधन संकट निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Slavery Reparations : ‘आम्ही पैसे देणार नाही!’ ब्रिटनचा आरडाओरडा; पण भारताच्या एका मताने ‘असं’ बदललं जगाचं चित्र

होर्मुझची सामुद्रधुनी बंद: तुमचं बजेट कोलमडणार!

या युद्धाचा सर्वात मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. जगातील २० टक्के तेल आणि वायू ज्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीतून’ (Strait of Hormuz) वाहते, तो मार्ग इराणने बंद केला आहे. परिणामी, भारत, युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अनेक देशांमध्ये गॅस आणि वीज संकट उभे राहिले असून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. जर हे युद्ध लवकर थांबले नाही, तर जगाला इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिजबुल्लाने इस्रायलवर किती रॉकेट डागले?

    Ans: हिजबुल्लाने उत्तर इस्रायलवर १०० हून अधिक रॉकेट डागले असून नाहारिया शहराला मुख्य लक्ष्य केले आहे.

  • Que: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध कधी सुरू झाले?

    Ans: २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणच्या तळांवर झालेल्या हल्ल्यापासून या युद्धाची सुरुवात झाली असून आज याला ४ आठवडे पूर्ण झाले आहेत.

  • Que: होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याचा काय परिणाम झाला?

    Ans: जगातील २०% तेलाचा पुरवठा थांबला असून जागतिक स्तरावर इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत.

Web Title: Middle east war hezbollah 100 rocket attack israel nahariya iran usa conflict update 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Hezbollah
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
1

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

Iran-US Conflict: होर्मुझवरून महासत्तांमध्ये पुन्हा तणावाचा स्फोट; वाचा इराण-अमेरिका करारातील कलम  5 का बनले आहे वादाचे मूळ?
2

Iran-US Conflict: होर्मुझवरून महासत्तांमध्ये पुन्हा तणावाचा स्फोट; वाचा इराण-अमेरिका करारातील कलम 5 का बनले आहे वादाचे मूळ?

Iran Vs Italy : युद्ध अमेरिकेचे, डोकेदुखी Italyची! इराणच्या मंत्र्यांचा थेट इटलीला फोन; इस्माईल बाकाई यांच्या एका पोस्टने खळबळ
3

Iran Vs Italy : युद्ध अमेरिकेचे, डोकेदुखी Italyची! इराणच्या मंत्र्यांचा थेट इटलीला फोन; इस्माईल बाकाई यांच्या एका पोस्टने खळबळ

US-Iran Conflict: ‘जर हल्ले थांबले नाहीत, तर आता आर की पार! इराणला संपवण्याची वेळ आली; ट्रम्प यांची IRGC विरुद्ध रणगर्जना
4

US-Iran Conflict: ‘जर हल्ले थांबले नाहीत, तर आता आर की पार! इराणला संपवण्याची वेळ आली; ट्रम्प यांची IRGC विरुद्ध रणगर्जना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.