Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ट्रम्प यांची धमकी अन् २४ तासांत ॲक्शन सुरु; इराणच्या सर्वात मोठ्या लष्करी तळाचे झाले तुकडे, VIDEO VIRAL

US Iran War Update : मध्यपूर्व आता पेटून उठले आहे. अमेरिकेने ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणच्या सर्वात महत्त्वाच्या शहरावर हल्ले केले आहेत. यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. पश्चिम आशियात पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 31, 2026 | 12:14 PM
US Attack on Iran Isfahan

US Attack on Iran Isfahan

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचा इराणमध्ये तांडव सुरु
  • ट्रम्प यांच्या धमकीनंतर २४ तासांत मोठी कारवाई
  • इराणच्या मुख्य शहरावर भीषण प्रहार
US Attack on Iran : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझवरुन दिलेल्या इशाऱ्यानंतर २४ तासांत इराणविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. इराणच्या इस्फाहन शहरावर भयंकर हल्ला झाला असून याचा एक व्हिडिओ देखील ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे.

Donald Trump यांचा इराणला शेवटचा इशारा! ‘होर्मुज’ न उघडल्यास तेल विहिरी आणि पॉवर प्लांट उडवून देण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (३१ मार्च) पहाटे इराण(Iran) च्या इस्फाहन शहरातील दारुगोळ्याच्या कारखान्याला लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यासाठी अमेरिकेने २,००० पाऊं वजनाच्या शक्तिशाली बंकर बस्टरचा, पेनेट्रेटर बॉम्बचा वापर केला असल्याचे म्हटले जात आहे.

हे बॉम्ब थेट जमिनीखाली असलेल्या गुप्त ठिकाणांना उद्ध्वस्त करु शकतात. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पहिल्या हल्ल्यानंतर आफ्टरशॉकही जाणवले आहे. हल्ल्यामुळे रात्रीच्या वेळी आकाशाती आगीचे गोळे उडताना दिसला होते, ज्यामुळे संपूर्ण इस्फाहनमध्ये नारंगी प्रकारश पसरला होता.

ट्रम्प यांची धमकी अन् २४ तासांत कारवाई

हा हल्ला ट्रम्प यांनी होर्मुझ मार्ग खुला करण्यावरुन दिलेल्या इशाऱ्यानंतर अवघ्या २४ तासांत झाला आहे. ट्रम्प यांनी इराणला शेवटचा इशारा दिला होता की, स्ट्रेट ऑफ होर्मुझचा मार्ग उघड केला नाही, त्यांच्या उर्जा केंद्रांना नष्ट केले जाईल. तसेच युद्धाच्या अंतासाठी कोणतीही चर्चा न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

याच वेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी देखील, राष्ट्राध्यत्र ट्रम्प इराणला होर्मुझवर ताबा मिळवू देणार नाहीत, यासाठी त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत असा इशारा दिला होता.

इराणचे मोठे नुकसान

इस्फाहन शहर इराणचे अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. या शहरात सुमारे २.३ दशलक्ष इराणी नागरिक राहतात. याशिवाय या शहरात इराणचा ‘बद्र मिलिटरी एअरबेस’ आणि अनेक गुप्त लष्करी तळ आहेत. या ठिकाणी इराणने सुमारे ५४० किलो संवर्धित युरेनियमचा साठा एका भूमिगत तळामध्ये ठेवल्याचा संशयही आहे. इस्रायल-अमेरिकेच्या दाव्यानुसार, इराण अण्वस्त्र बनवण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. यामुळे या प्रदेशाला लक्ष्य करण्यात आले आङे.

पश्चिम आशिया युद्धाच्या खाईत

या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियात प्रचंड तणाव निर्माण झाला असून इराणही आक्रमक होण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा जागतिक बाजारपेठेत इंधन टंचाई आणि उर्जा संकट निर्माण होऊ शकते.

Trump posts a video of a massive explosion on his Truth Social. No details given pic.twitter.com/4ROua2ZhF — Sidhant Sibal (@sidhant) March 31, 2026


US Iran War : ‘होर्मुझवर इराणचा ताबा खपवून घेणार नाही’ ; अमेरिकेचा थेट युद्धाचा इशारा, मार्को रुबियो यांनी सांगितला ‘गेम प्लॅन’

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणमध्ये कुठे हल्ला केला?

    Ans: अमेरिकेने इराणच्या इस्फाहन या सर्वात महत्त्वाच्या शहरावर आणि लष्करी ठिकाणे असलेल्या भागावर हल्ले केले आहेत.

  • Que: अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे किती नुकसान झाले आहे?

    Ans: अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावा केला जात आहे. मात्र अद्याप याबाबत इराणकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

  • Que: इराणसाठी इस्फाहन शहर का महत्त्वाचे आहे?

    Ans: इस्फाहन शहर इराणचे अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. या शहरात सुमारे २.३ दशलक्ष इराणी नागरिक राहतात. याशिवाय या शहरात इराणचा 'बद्र मिलिटरी एअरबेस' आणि अनेक गुप्त लष्करी तळ आहेत. या ठिकाणी इराणने सुमारे ५४० किलो संवर्धित युरेनियमचा साठा एका भूमिगत तळामध्ये ठेवल्याचा संशय असल्याने हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Web Title: Middle east war us attack on iran isfahan after trumps warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.