Miguel Uribe Turbay Colombia's presidential candidate shot in head, Suspect arrested
बोगोटा: दक्षिण अमेरिकन देश कोलंबियात एक धक्कादायक घटना घडली. राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. एका कार्यक्रमादरम्यान रॅलिला संबोधित करताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. उरीबे यांच्यावर हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी शुरु आहे. या घटनेने कोलंबियात खळबळ उडाली आहे.
उरीबे कोलंबियाची राजधानी बोगोट येथे एका रॅलीला संबोधित करत होते. यावेली त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला. एकाच वेळी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्यात. एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपाचर सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. ३९ वर्षी उरीबे हे विरोधी सेंट्रो डेमोक्रॅटिक कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत.
३९ वर्षीय उरीबे हे सेंट्रो डेमोक्रॅटिक कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहे. त्यांचा जन्म १९८६ मध्ये कोलंबियामध्ये झाला. त्यांनी बोगोटाचे नगरसेवक म्हणून आपला राडकीय प्रवास सुरु केला होता. या काळात त्यांनी शहरी विकास आणि सुरक्षेशी संबंधित अने मुद्द्यांवर काम केले. त्यांच्या आजोबा ज्युलिओ सीझर हे कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष राहिले आहे. ते १९७८ ते १९८२ पर्यंत कोलंबियाचे २५ वे राष्ट्रपती राहिले. तसेच मिगुएल उरीबे यांची आई एक प्रसिद्ध प्रत्रकार होत्या. त्यांचा मृत्यू १९९१मध्ये एस्कोबारच्या मेडिलन कार्टेलने केलेल्या अपहरणावेळी बचावादरम्यान झाला.
कॅलोबंयामध्ये २०२६ मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत. मिगुएल उरीबे टर्बे हे राष्ट्रपती पदाचे संभाव्य उमेदवार मानले जातात. यामुळे देशभरात निवडणूका आणि सभा घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती. दरम्यान त्यांच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराची चौकशी सुरु आहे.
Urgente 🇨🇴
Aquí está el momento del atentado al Dr Miguel Uribe
Que dolor de Patria
Gobierno miserable !Imágenes sensibles pic.twitter.com/tA3VWGap5V
— Luis Aníbal Rincón Arguello. ® 🇨🇴 (@Rincon001A) June 7, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, कोलंबियात यापूर्वी देखील राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांवर हल्ले झाले आहे. अमेरिकेच्या निवडणुकांदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. एका २० वर्षीय हल्ले खोराने ८ वेळा गोळीबार केला होता. आरोपीला जागीच ठार करण्यात आले होते. तसेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यामुळे उरीबेवरील हल्ल्याचा जागतिक स्तरावर निषेध केला जात आहे.
ट्रम्प प्रशासनाचे मार्को रुबियो यांनी उरीबे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी हा हल्ला लोकशाही धोका असल्याचे मानले आहे. हा हल्ला कोलंबियन उच्च पातळींकडून येणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या विधानाचा परिणाम असल्याचे रुबियो यांनी म्हटले आहे.