एलॉन मस्कचा यू टर्न? ट्रम्पवर आरोप करणारी पोस्ट केली डिलीट; सोशल मीडियावर चर्चेला उधाण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांचा वादात एक वेगळाच ट्विस्ट समोर आला आहे. यामुळे एलॉन मस्क पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दोघांमध्ये सोशल मीडियावर घमासान युद्ध सुरु असताना मस्क यांनी एक एक्सवरुन एक पोस्ट डिलीट केली आहे. यामुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. मस्क यांनी ट्रम्पवर आरोप केला होता की, जेफ्री एपस्टिन प्रकरणाशी संबंधित फाइल्समध्ये ट्रम्प यांचे नाव सामील आहे. परंतु आता ही पोस्ट मस्क यांच्या एक्स अकाऊंटवरुन डिलीट झाली आहे. यामुळे मस्क यांच्या यु-टर्नची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
एलॉन मस्क यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील अकाउंटवर, आता मोठा धमका टाकण्याची वेळ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाव एपस्टिन फाईलमध्ये आहे. यामुळेच ही फाईल सार्वजनिक केली जात नाही असे म्हटले होते. तसेच त्यांनी ही पोस्ट भविष्यासाठी जपून ठेवा, सत्य लवकरच बाहेर येईल असेही म्हटले होते. परंतु आता मस्क यांनी ही पोस्ट स्वत:हा डिलीट केली आहे. यामुळे पुन्हा एक खळबळ उडाली आहे.
अमेरिकेतील श्रीमंत उद्योक जेफ्री एपस्टिन याच्या हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय प्रकरणाशी संबंधित आहे. २०१९ मध्ये एपस्टिनवर व्हर्जिनिया ग्रिफे या महिलेने लैंगिक तस्करी आणि शोषणाचा आरोप केला होता. यामध्ये जेफ्रीला अटही करण्यात आली होती. परंतु जेफ्रीचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला. त्याने आतम्हत्या केली असल्याचे म्हटले जाते. दरवर्षी या प्रकरणाशी संबंधित माहितीचा खुलासा केला जाता. यामध्ये अनेक प्रभावशाली लोकांचा समावेस आहे.
Elon’s DELETED his post claiming Trump’s in the Epstein files https://t.co/cFOwyDWzSn pic.twitter.com/AzD2l6prh8
— RT (@RT_com) June 7, 2025
ट्रम्पशी वादादरम्यान मस्क यांनी या एपस्टिन फाइलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव असल्याचा दावा केला होता. मात्र मस्क यांनी ही पोस्ट डिलीट केली आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ट्रम्प यांचा खरंच या प्रकरणाशी संबंध आहे का? मस्क यांनी पोस्ट डिलीट का केली, कोणाच्या दबावाखाली येऊन मस्क यांनी पोस्ट डिलीट केली का, असे अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत.मस्क यांनी कोणत्याही पुराव्यासह ही पोस्ट केली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. ट्रम्पशी वादादरम्यान मस्क यांनी या एपस्टिन फाइलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव असल्याचा दावा केला होता. मात्र मस्क यांनी ही पोस्ट डिलीट केली आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ट्रम्प-मस्क वादामुळे चर्चेत आलेलं एपस्टिन प्रकरण नेमकं काय? इलॉनचे आरोप किती गंभीर? जाणून घ्या