Vatican provides update on Pope Francis' health as pontiff battles pneumonia
कॅथोलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस पोप फ्रान्सिस यांची प्रकृती बिघडली असून काही दिवसांपूर्वी त्यांना रोमच्या पॉलिक्लिनिकमध्ये दाख करण्यात आले होते. पोप फ्रान्सिस यांना दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे व्हॅटिकनने सांगितले आहे. 88 वर्षीय पोप गेल्या आठवड्यापासून श्वसन संसर्गाच्या आजारशी झुंजत होते आणि उपचारासाठी त्यांना शुक्रवारी रोमच्या जेमेली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
न्यूमोनियामुळे दरवर्षी लाखो मृत्यू
वयाच्या या टप्प्यावर न्यूमोनिया जीवघेणा ठरू शकतो. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या अहवालानुसार, 2019मध्ये न्यूमोनियामुळे 25 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच या आजारामुळे प्रत्येत 13 सेकंदाला एक मृत्यू होचो. विशेष करुन लहान मुले आणि वृद्धांना न्यूमोनियाचा सर्वाधिक फटका बसतो. यामुळे 50% मृत्यू 50 वर्षांवरील व्यक्तींमध्ये होतात, तर 30% मृत्यू 5 वर्षांखालील बालकांमध्ये नोंदवले जातात.
कोविड-19 मुळे वाढलेला धोका
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये कोविड-19 मुळे न्यमोनियाशी संबंधित मृत्यूंचा आकडा 35 लाखांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे कोविड काळात सांसर्गिक आजारांमुळे 60 लाखांहून अधिक मृत्यू झाले होते.
न्यूमोनियामुळे सर्वाधिक प्रभावित देश
न्यूमोनियाच्या आजारामुळे होणाऱ्या दोन तृतीयांश मृत्यूंची नोंद फक्त 20 देशांमध्ये होते. यामध्ये भारत, चीन, नायजेरिया, जपान, ब्राझील, अमेरिका, पाकिस्तान, फिलिपाइन्स, इथिओपिया, काँगो, इंडोनेशिया, ब्रिटन, बांगलादेश, रशिया, टांझानिया, थायलंड, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, जर्मनी आणि बुर्किना फासो या देशांचा समावेश असून हे सर्वाधिक प्रभावित आहेत. निम्न-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो, तर विकसित देशांमध्ये वृद्धांना याचा अधिक फटका बसतो.
जागतिक उद्दिष्टे आणि आव्हाने
ग्लोबल ॲक्शन फॉर द प्रिव्हेन्शन (GAPPD) अँड कंट्रोल ऑफ न्योनिया अँड डायरिया च्या उद्देशानुसार, 2025 पर्यंत प्रत्येक हजार जन्मांमागे न्यमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 3 पेक्षा कमी करणे आवश्यक आहे. यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (SDG ) अंतर्गत 2030 पर्यंत हा आकडा 25 च्या खाली आणण्याचे लक्ष्य आहे. मात्र, अद्यापही हे उद्दिष्ट पूर्ण करणे आव्हानात्मक ठरत आहे.
न्यूमोनिया टाळता येऊ शकतो
न्यमोनिया जीवाणू, विषाणू किंवा बुरशीमुळे होतो. मात्र, हे संक्रमण लसीकरणाने टाळता येते. याशिवाय, योग्य उपचार, अँटीबायोटिक्स आणि ऑक्सिजन थेरपीद्वारे यावर प्रभावीपणे उपचार करता येतो.या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा धोका कमी करण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. सर्व देशांनी लसीकरण, स्वच्छता आणि आरोग्यसेवांवर भर दिल्यास, भविष्यात न्यूमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीयरीत्या कमी करता येईल.
सध्याच्या परिस्थितीत पोप फ्रान्सिस यांच्या आरोग्यासाठी जगभरातून प्रार्थना आणि शुभेच्छांचा ओघ सुरू असून, त्यांच्या लवकर बरे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.